Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एक ते बारा 28

श्रमणांचा उत्कर्ष

या देवतांच्या मागे, पुराणे आणि पुजारी नसल्यामुळे त्यांना आजकालचे धार्मिक स्वरूप आले नव्हते. सर्व दर्जाचे लोक आपल्यावरची आपत्ति टाळण्यासाठी, किंवा आपण केलेल्या नवसाला देवता पावली म्हणून तिला बलिदान देत. पण हे कृत्य धार्मिक समजत नसत. ब्राह्मणांच्या यज्ञयागांना वेदांची आणि वैदिक वाङमयाची पुष्टि मिळाल्यामुळे त्यांची गणना धार्मिक कृत्यात होत होती. पण हे यज्ञयाग फारच खर्चाचे असल्यामुळे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यात शेकडो गाईबैल मारण्यात येत. शेतीला उपयोगी पडणारी ही जनावरे राजे आणि इतर प्रतिष्ठित लोकांना जबरदस्तीने हिरावून घ्यावी लागल्यामुळे सामान्य जनतेला हे यज्ञयाग अत्यंत अप्रिय होत चाललेले होते. याच्या उलट श्रमणांना सामान्य लोक आदरातिथ्याने वागवीत, चातुर्मासात झोपड्या वगैरे बांधून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत आणि त्यांचा उपदेश ऐकण्याला तत्पर असत. म्हणजे श्रमणसंघाची एकसारखी भरभराट होत चालली होती.

उपनिषत्कालीन ऋषि

सांप्रत अशी एक समजूत प्रचलित आहे की, वेदापासून उपनिषदे आणि त्यांच्यापासून बौद्ध, जैन वगैरे धर्म निघाल्यामुळे ते देखील वैदिक धर्मच आहेत. बौद्धांची आणि जैनांची परंपरा वेद किंवा उपनिषदे यापासून निघाली नसून ती वेदकालापूर्वी मध्य हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या ऋषिमुनींच्या परंपरेपासून निघाली हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल असा भरवसा वाटतो. तथापि उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांची बुद्धसमकाली कशी स्थिति होती याचा थोडक्यात विचार करणे प्रस्तुत होणार नाही. अरण्यके आणि उपनिषदे बुद्धकालानंतर बर्‍याच वर्षांनी रचण्यात आली हे मी ‘हिंदी सस्कृति आणि अहिंसा’ या पुस्तकात दाखवून दिले आहे. (पृ. ४८-५० पाहा)

परंतु बुद्धसमकाली उपनिषदात वर्णिलेल्या ब्राह्मणांसारखे काही ब्राह्मण आणि क्षत्रिय होते असे समजण्यास मुळीच हरकत नाही. पण त्यापैकी बहुतेक होमहवनाचा धर्म सोडून शुद्ध श्रमण होत असत. असे जातकातील पुष्कळशा गोष्टीवरून दिसून येते. उदाहरणार्थ, नंगुट्ठजातकाचा (नं. १४४) गोषवारा येथे देतो.

वाराणसीत ब्रह्मदत्त राज्य करीत असता बोधिसत्त्व औदिच्य ब्राह्मणकुलात जन्मला त्याच्या जन्मदिवशी आईबापांनी जाताग्नि ठेवला आणि तो सोळा वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला म्हटले, “बाबारे, तुझ्या जन्मदिवशी हा अग्नि स्थापित केला आहे. जर तुला गृहस्थ होऊन रहावयाचे असेल तर तीन वेदांचे अध्ययन कर, पण जर ब्रह्मलोकपरायण होण्याची इच्छा असेल तर हा अग्नि घेऊन अरण्यात जा आणि त्याच्या सेवेने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मलोकपरायण हो.”

बोधिसत्त्वाला गृहस्थाश्रम नको होता. आपला जाताग्नि घेऊन तो अरण्यात गेला आणि तेथे आश्रम बांधून त्या अग्नीची सेवा करीत राहिला. एके दिवशी बोधिसत्त्वाला एका शेतकर्‍याने दक्षिणेदाखल एक बैल दिला. त्याचा बळी देऊन अग्निभगवंताची पूजा करण्याचा बोधिसत्त्वाचा विचार होता. पण आश्रमात मीठ शिल्लक नव्हते. ते आणण्यासाठी तो गावात गेला असता इकडे काही गुंड लोकांनी त्या बैलाला मारून अग्निहोत्रावर आपणाला पाहिजे तेवढे त्याचे मास शिजवून खाल्ले व बाकीचे बरोबर नेले.
बोधिसत्त्व मीठ घेऊन परत आला आणि पाहतो, तो बैलाचे कातडे, शेपटू आणि हाडे तेवढी शिल्लक होती. तो स्वत:शीच म्हणाला, “हा अग्निभगवान याच्या बलीचेच रक्षण करू शकत नाही, मग माझे रक्षण कसे करील?” असे म्हणून त्याने आपले अग्निहोत्र पाण्यात फेकून दिले आणि ऋषिप्रव्रज्या घेतली.

बुद्धाचा उपदेश ऐकून उरुवेलकास्यप, नदीकास्यप आणि गयाकाश्यप या तिघा ब्राह्मणबंधूंनी आपली अग्निहोत्रे नदीत फेकून दिल्याची कथा बौद्धवङमयात प्रसिद्ध आहे.

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1 **प्रस्तावना 2 **प्रस्तावना 3 **प्रस्तावना 4 **प्रस्तावना 5 **प्रस्तावना 6 **प्रस्तावना 7 प्रकरण एक ते बारा 1 प्रकरण एक ते बारा 2 प्रकरण एक ते बारा 3 प्रकरण एक ते बारा 4 प्रकरण एक ते बारा 5 प्रकरण एक ते बारा 6 प्रकरण एक ते बारा 7 प्रकरण एक ते बारा 8 प्रकरण एक ते बारा 9 प्रकरण एक ते बारा 10 प्रकरण एक ते बारा 11 प्रकरण एक ते बारा 12 प्रकरण एक ते बारा 13 प्रकरण एक ते बारा 14 प्रकरण एक ते बारा 15 प्रकरण एक ते बारा 16 प्रकरण एक ते बारा 17 प्रकरण एक ते बारा 18 प्रकरण एक ते बारा 19 प्रकरण एक ते बारा 20 प्रकरण एक ते बारा 21 प्रकरण एक ते बारा 22 प्रकरण एक ते बारा 23 प्रकरण एक ते बारा 24 प्रकरण एक ते बारा 25 प्रकरण एक ते बारा 26 प्रकरण एक ते बारा 27 प्रकरण एक ते बारा 28 प्रकरण एक ते बारा 29 प्रकरण एक ते बारा 30 प्रकरण एक ते बारा 31 प्रकरण एक ते बारा 32 प्रकरण एक ते बारा 33 प्रकरण एक ते बारा 34 प्रकरण एक ते बारा 35 प्रकरण एक ते बारा 36 प्रकरण एक ते बारा 37 प्रकरण एक ते बारा 38 प्रकरण एक ते बारा 39 प्रकरण एक ते बारा 40 प्रकरण एक ते बारा 41 प्रकरण एक ते बारा 42 प्रकरण एक ते बारा 43 प्रकरण एक ते बारा 44 प्रकरण एक ते बारा 45 प्रकरण एक ते बारा 46 प्रकरण एक ते बारा 47 प्रकरण एक ते बारा 48 प्रकरण एक ते बारा 49 प्रकरण एक ते बारा 50 प्रकरण एक ते बारा 51 प्रकरण एक ते बारा 52 प्रकरण एक ते बारा 53 प्रकरण एक ते बारा 54 प्रकरण एक ते बारा 55 प्रकरण एक ते बारा 56 प्रकरण एक ते बारा 57 प्रकरण एक ते बारा 58 प्रकरण एक ते बारा 59 प्रकरण एक ते बारा 60 प्रकरण एक ते बारा 61 प्रकरण एक ते बारा 62 प्रकरण एक ते बारा 63 प्रकरण एक ते बारा 64 प्रकरण एक ते बारा 65 प्रकरण एक ते बारा 66 प्रकरण एक ते बारा 67 प्रकरण एक ते बारा 68 प्रकरण एक ते बारा 69 प्रकरण एक ते बारा 70 प्रकरण एक ते बारा 71 प्रकरण एक ते बारा 72 प्रकरण एक ते बारा 73 प्रकरण एक ते बारा 74 प्रकरण एक ते बारा 75 प्रकरण एक ते बारा 76 प्रकरण एक ते बारा 77 प्रकरण एक ते बारा 78 प्रकरण एक ते बारा 79 प्रकरण एक ते बारा 80 प्रकरण एक ते बारा 81 प्रकरण एक ते बारा 82 प्रकरण एक ते बारा 83 प्रकरण एक ते बारा 84 प्रकरण एक ते बारा 85 प्रकरण एक ते बारा 86 प्रकरण एक ते बारा 87 प्रकरण एक ते बारा 88 प्रकरण एक ते बारा 89 प्रकरण एक ते बारा 90 प्रकरण एक ते बारा 91 प्रकरण एक ते बारा 92 प्रकरण एक ते बारा 93 प्रकरण एक ते बारा 94 प्रकरण एक ते बारा 95 प्रकरण एक ते बारा 96 प्रकरण एक ते बारा 97 प्रकरण एक ते बारा 98 प्रकरण एक ते बारा 99 प्रकरण एक ते बारा 100 प्रकरण एक ते बारा 101 प्रकरण एक ते बारा 102 प्रकरण एक ते बारा 103 प्रकरण एक ते बारा 104 प्रकरण एक ते बारा 105 प्रकरण एक ते बारा 106 प्रकरण एक ते बारा 107 प्रकरण एक ते बारा 108 प्रकरण एक ते बारा 109 प्रकरण एक ते बारा 110 प्रकरण एक ते बारा 111 प्रकरण एक ते बारा 112 प्रकरण एक ते बारा 113 प्रकरण एक ते बारा 114 प्रकरण एक ते बारा 115 प्रकरण एक ते बारा 116 प्रकरण एक ते बारा 117 प्रकरण एक ते बारा 118 प्रकरण एक ते बारा 119 प्रकरण एक ते बारा 120 प्रकरण एक ते बारा 121 प्रकरण एक ते बारा 122 प्रकरण एक ते बारा 123 प्रकरण एक ते बारा 124 प्रकरण एक ते बारा 125 प्रकरण एक ते बारा 126 प्रकरण एक ते बारा 127 प्रकरण एक ते बारा 128 प्रकरण एक ते बारा 129 प्रकरण एक ते बारा 130 प्रकरण एक ते बारा 131 *परिशिष्ट एक ते तीन 1 *परिशिष्ट एक ते तीन 2 *परिशिष्ट एक ते तीन 3 *परिशिष्ट एक ते तीन 4 *परिशिष्ट एक ते तीन 5 *परिशिष्ट एक ते तीन 6 *परिशिष्ट एक ते तीन 7 *परिशिष्ट एक ते तीन 8 *परिशिष्ट एक ते तीन 9 *परिशिष्ट एक ते तीन 10 *परिशिष्ट एक ते तीन 11 *परिशिष्ट एक ते तीन 12 *परिशिष्ट एक ते तीन 13 *परिशिष्ट एक ते तीन 14 *परिशिष्ट एक ते तीन 15 *परिशिष्ट एक ते तीन 16 *परिशिष्ट एक ते तीन 17 *परिशिष्ट एक ते तीन 18