Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण एक ते बारा 23

(१) ह्याला मी एक उदाहरण देतो. कुत्र्याचे मास खाणार्‍या चांडाळाचा एक पुत्र मातंग या नावाने प्रसिद्ध होता.
(२) त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ यश मिळाले. त्याच्या सेवेस पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत.
(३) विषयवासनेचा क्षय करणार्‍या थोर मार्गाचा व देवयानाचा (समाधीचा) अवलंब करून तो ब्रह्मलोकाला गेला. ब्रह्मलोकी उत्पन्न होण्यास त्याचा जन्म त्याला आड आला नाही.

शंबूकाची कथा काल्पनिक

शंबूक नावाचा शूद्र अरण्यात तपश्चर्या करीत होता. त्यामुळे एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. रामाला ही गोष्ट समजल्यावर त्याने अरण्यात जाऊन शंबूकाचा शिरच्छेद केला आणि ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत केले. ही कथा रामायणात अत्यंत खुलवून वर्णिली आहे. काही सौम्य स्वरूप देऊन भवभूतीने हा प्रसंग उत्तररामचरितात देखील दाखल केला आहे. पण असा प्रकार बुद्धाच्या पूर्वी किंवा बौद्धर्म हिंदुस्थानात असेपर्यंत घडून आल्याचा कोठेच पुरावा सपडत नाही. राजाने असे वर्तन केले पाहिजे, एवढेच दाखविण्याचा ही कथा रचणार्‍याचा हेतू असावा.

श्रमण

जंगलात राहणार्‍या या ऋषिमुनींना तापस किंवा परिव्राजक म्हणत असत. ते तपश्चर्या कशी करीत याची विशेष माहिती सापडत नाही. याच तपस्वी लोकांच्या संघामधून लोकवस्तीत फिरून लोकांना उपदेश करणारे निरनिराळे श्रमणसंघ निघाले. श्रमण हा शब्द श्रमू धातूपासून निघाला आहे. त्याचा अर्थ कष्ट करणारा असा होतो. आज जसे शारीरिक कष्ट करणार्‍या मजुरांचे महत्त्व वाढत चालले आहे. तसे ते बुद्धसमकाली श्रमणांचे वाढत चालेले होते. पण मजुरांमध्ये आणि यांच्याध्ये फरक असा की, मजूर समाजाला उपयोगी पडणार्‍या वस्तू उत्पादन करण्यासाठी कष्ट करतात आणि हे श्रमण लोक समाजात आध्यात्मिक जागृति पैदा करण्यासाठी कष्ट करीत. कदाचित शरीराला तपश्चर्येच्या योगाने हे लोक श्रम देत असत, म्हणून यांना श्रमण ही संज्ञा लावण्यात येत असावी, पण जंगलात राहणारे ऋषिमुनी देखील तपश्चर्येने शरीर कष्टवीत असतच. तरी त्यांना श्रमण म्हणत असत. तेव्हा लोकांच्या हितासाठी स्वत: श्रम करणारे म्हणूनच यांना श्रमण म्हणत, हे अधिक संभवनीय दिसते.

त्रेसष्ट श्रमणपंथ


बुद्धसमकाली असे लहानमोठे त्रेसष्ट श्रमणसंघ अस्तित्वात होते. ‘यानि च तीणियानि च सटठि’ या वाक्यात जी तीन आणि साठ मते सांगितली आहेत त्यात बौद्धमताचा देखील समावेश होतो की काय हे सांगता येत नाही. तो होतो असे जर गृहीत धरले, तर पालिवाङमयात अनेक ठिकाणी सापडणार्‍या बासष्ट मतांच्या (द्वासटठिदिटठिगतानि) उल्लेखाचा अर्थ बरोबर लागतो. म्हणजे बुद्धाच्या श्रमणपंथाबाहेर या वेळी आणखी बासष्ट श्रमणपंथ अस्तित्वात होते, असे ठरते. या बासष्ट श्रमणपंथाची मते तपशीलवार दाखविण्याचा प्रयत्न दीघनिकायाच्या पहिल्या ब्रह्मजालसुत्तात केला आहे. पण तो कृत्रिम दिसतो. ज्या वेळी हे नव्हती तेव्हा सुत्त रचणार्‍याने बासष्ट ही संख्या भरून काढण्यासाठी नवीन तपशील रचून या सुत्तात घातला. या जुन्या बासष्ट श्रमणपंथांची माहिती नष्ट होण्याचे कारण असे दिसते की, त्यापैकी प्रसिद्ध असे फारच थोडे श्रमणपंथ होते आणि लहानसहान संप्रदायाचा मोठ्या संप्रदायात समावेश होत गेला. आजकालच्या बुवा, बैरागी वगैरे पंथांची नीट मोजणी केली तर ते किती तरी भरतील, पण त्यात नाव घेण्याजोगे कबीर, दादू, उदासी वगैरे हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक राहतील.

तपश्चर्येचे प्रकार

बुद्धाच्या वेळी सर्वात मोठे श्रमणसंघ सहाच होते आणि त्यात देखील निर्ग्रंथ श्रमणांच्या संप्रदायाचा नंबर पहिला लागतो. या पंथाचा ऐतिहासिक संस्थापक पार्श्वमुनि होय. त्याचे परिनिर्वाण बुद्धाच्या जन्मापूर्वी १९३ व्या वर्षी झाले, असे अनुमान करता येते. त्यापूर्वी चाळीस पन्नास वर्षे तरी पार्श्व तीर्थकर आपल्या धर्माचा उपदेश करीत असावा. याच्या आणि इतर श्रमणसंघनायकाच्या मताचा विचार पुढे करण्यात येईल. सध्या या लोकांच्या तपश्चर्येचे प्रकार कोणते होते हे निर्दिष्ट करणे इष्ट वाटते. का की, त्यामुळे तापसांच्या तपश्चर्येचा देखील अल्पस्वल्प बोध होऊ शकेल. श्रमणाच्या तपश्चर्येचे प्रकार अनेक सुत्तात सापडतात. पण त्यापैकी मज्झिनिकायातील महासीहनाद सुत्तात आलेले तपश्चर्येचे वर्ण विशेष महत्त्वाचे वाटल्याकारणाने त्याचा गोषवारा येथे देत आहे.

बुद्ध भगवान सारिपुत्ताला म्हणतो, “हे सारिपुत्ता मी चार तर्‍हेचे तप आचरले होते हे मला आठवते. मी तपस्वी झालो, रुक्ष झालो, जुगुप्सी झालो आणि प्रबिंबित झालो.

भगवान बुद्ध

धर्मानंद कोसंबी
Chapters
**प्रस्तावना 1 **प्रस्तावना 2 **प्रस्तावना 3 **प्रस्तावना 4 **प्रस्तावना 5 **प्रस्तावना 6 **प्रस्तावना 7 प्रकरण एक ते बारा 1 प्रकरण एक ते बारा 2 प्रकरण एक ते बारा 3 प्रकरण एक ते बारा 4 प्रकरण एक ते बारा 5 प्रकरण एक ते बारा 6 प्रकरण एक ते बारा 7 प्रकरण एक ते बारा 8 प्रकरण एक ते बारा 9 प्रकरण एक ते बारा 10 प्रकरण एक ते बारा 11 प्रकरण एक ते बारा 12 प्रकरण एक ते बारा 13 प्रकरण एक ते बारा 14 प्रकरण एक ते बारा 15 प्रकरण एक ते बारा 16 प्रकरण एक ते बारा 17 प्रकरण एक ते बारा 18 प्रकरण एक ते बारा 19 प्रकरण एक ते बारा 20 प्रकरण एक ते बारा 21 प्रकरण एक ते बारा 22 प्रकरण एक ते बारा 23 प्रकरण एक ते बारा 24 प्रकरण एक ते बारा 25 प्रकरण एक ते बारा 26 प्रकरण एक ते बारा 27 प्रकरण एक ते बारा 28 प्रकरण एक ते बारा 29 प्रकरण एक ते बारा 30 प्रकरण एक ते बारा 31 प्रकरण एक ते बारा 32 प्रकरण एक ते बारा 33 प्रकरण एक ते बारा 34 प्रकरण एक ते बारा 35 प्रकरण एक ते बारा 36 प्रकरण एक ते बारा 37 प्रकरण एक ते बारा 38 प्रकरण एक ते बारा 39 प्रकरण एक ते बारा 40 प्रकरण एक ते बारा 41 प्रकरण एक ते बारा 42 प्रकरण एक ते बारा 43 प्रकरण एक ते बारा 44 प्रकरण एक ते बारा 45 प्रकरण एक ते बारा 46 प्रकरण एक ते बारा 47 प्रकरण एक ते बारा 48 प्रकरण एक ते बारा 49 प्रकरण एक ते बारा 50 प्रकरण एक ते बारा 51 प्रकरण एक ते बारा 52 प्रकरण एक ते बारा 53 प्रकरण एक ते बारा 54 प्रकरण एक ते बारा 55 प्रकरण एक ते बारा 56 प्रकरण एक ते बारा 57 प्रकरण एक ते बारा 58 प्रकरण एक ते बारा 59 प्रकरण एक ते बारा 60 प्रकरण एक ते बारा 61 प्रकरण एक ते बारा 62 प्रकरण एक ते बारा 63 प्रकरण एक ते बारा 64 प्रकरण एक ते बारा 65 प्रकरण एक ते बारा 66 प्रकरण एक ते बारा 67 प्रकरण एक ते बारा 68 प्रकरण एक ते बारा 69 प्रकरण एक ते बारा 70 प्रकरण एक ते बारा 71 प्रकरण एक ते बारा 72 प्रकरण एक ते बारा 73 प्रकरण एक ते बारा 74 प्रकरण एक ते बारा 75 प्रकरण एक ते बारा 76 प्रकरण एक ते बारा 77 प्रकरण एक ते बारा 78 प्रकरण एक ते बारा 79 प्रकरण एक ते बारा 80 प्रकरण एक ते बारा 81 प्रकरण एक ते बारा 82 प्रकरण एक ते बारा 83 प्रकरण एक ते बारा 84 प्रकरण एक ते बारा 85 प्रकरण एक ते बारा 86 प्रकरण एक ते बारा 87 प्रकरण एक ते बारा 88 प्रकरण एक ते बारा 89 प्रकरण एक ते बारा 90 प्रकरण एक ते बारा 91 प्रकरण एक ते बारा 92 प्रकरण एक ते बारा 93 प्रकरण एक ते बारा 94 प्रकरण एक ते बारा 95 प्रकरण एक ते बारा 96 प्रकरण एक ते बारा 97 प्रकरण एक ते बारा 98 प्रकरण एक ते बारा 99 प्रकरण एक ते बारा 100 प्रकरण एक ते बारा 101 प्रकरण एक ते बारा 102 प्रकरण एक ते बारा 103 प्रकरण एक ते बारा 104 प्रकरण एक ते बारा 105 प्रकरण एक ते बारा 106 प्रकरण एक ते बारा 107 प्रकरण एक ते बारा 108 प्रकरण एक ते बारा 109 प्रकरण एक ते बारा 110 प्रकरण एक ते बारा 111 प्रकरण एक ते बारा 112 प्रकरण एक ते बारा 113 प्रकरण एक ते बारा 114 प्रकरण एक ते बारा 115 प्रकरण एक ते बारा 116 प्रकरण एक ते बारा 117 प्रकरण एक ते बारा 118 प्रकरण एक ते बारा 119 प्रकरण एक ते बारा 120 प्रकरण एक ते बारा 121 प्रकरण एक ते बारा 122 प्रकरण एक ते बारा 123 प्रकरण एक ते बारा 124 प्रकरण एक ते बारा 125 प्रकरण एक ते बारा 126 प्रकरण एक ते बारा 127 प्रकरण एक ते बारा 128 प्रकरण एक ते बारा 129 प्रकरण एक ते बारा 130 प्रकरण एक ते बारा 131 *परिशिष्ट एक ते तीन 1 *परिशिष्ट एक ते तीन 2 *परिशिष्ट एक ते तीन 3 *परिशिष्ट एक ते तीन 4 *परिशिष्ट एक ते तीन 5 *परिशिष्ट एक ते तीन 6 *परिशिष्ट एक ते तीन 7 *परिशिष्ट एक ते तीन 8 *परिशिष्ट एक ते तीन 9 *परिशिष्ट एक ते तीन 10 *परिशिष्ट एक ते तीन 11 *परिशिष्ट एक ते तीन 12 *परिशिष्ट एक ते तीन 13 *परिशिष्ट एक ते तीन 14 *परिशिष्ट एक ते तीन 15 *परिशिष्ट एक ते तीन 16 *परिशिष्ट एक ते तीन 17 *परिशिष्ट एक ते तीन 18