Get it on Google Play
Download on the App Store

तुम्ही मुंबईकर आहात जर…

मुंबईकर..

मुंबईकर..

तुम्ही मुंबईकर आहात जर…

१) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही.

२) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप.

३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने नाही तर, खरे कारण तुमच्या मनातले खरे कारण पावसाळा “सुरु = ट्रेकिंग सुरु= किंवा भटकंती सुरु “हे तुमचे समीकरण असते.

४) जगातले सर्वोत्कृष्ट स्नॅक कम स्टेपल फूड हे वडापाव आहे हे तुमचे ठाम मत असते. बेस्ट वडापाव वाला हा तुमच्या गल्लीतला (ज्याच्या कडून तुम्ही नेहेमी वडापाव घेता तो ) असतो हे तुमचे ठाम मत असते.

५) तुमचा वडापाव वाला जगातला उत्कृष्ट वडापाव बनवतो हे तुमचे पक्के मत असते. जर कधी चांगला वडा पाव हा मुद्दा डिस्कशन ला निघाला की तुम्ही आपल्या वडापाव वाल्याचे नाव पुढे करता आणि आपल्या मतावर ठाम असता. दुसरी गोष्ट म्हणजे वडा-पावाची तुलना कोणी मॅक डी बरोबर केली की तुमचा जळफळाट होतो.

६) तुम्ही कुठेही पाणीपुरी/भेळपुरी खाऊ शकता, पण पाणी प्यायची वेळ आली की बिसलेरी विकत घेता.

७)तुम्ही जिम मधे जाणे टाळता, कारण तुमच्या मते तुमचा दररोज जो लोकल मधे चढणे उतरणे, आणि ब्रिज चढणे उतरणे हा व्यायाम पुरेसा असतो, पण जर कोणी जातच असेल तर तो मात्र जिम पर्यंत बाईक/कार ने जातो..

८)लोकल मधे प्रवास करतांना जो पर्यंत कोणी तुमच्या पायावर पाय देत नाही तो पर्यंत लोकल मधे गर्दी आहे अशी तक्रार तुम्ही करत नाही.

९) क्रिकेट हा खेळण्याचा नाही तर बोलण्याचा /गप्पा मारण्याचा विषय आहे हे पुलं चे मत तुम्ही पुरेपूर सिद्ध करता. सचिन चे कसे चुकले? धोनी कसा वाईट कॅप्टन आहे वगैरे वगैरे विषयावर तुम्ही तास अन तास बोलू शकता.

१०) मुंबई बाहेरच्या लोकांशी बोलतांना तुम्ही मी कुलाब्याला जातोय हे न सांगता टाऊन साईडला जातोय हे सांगता, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे न समजल्याचे भाव एंजॉय करता.

११)तुम्हाला अगदी दादर पासून मुंबई सेंट्रल ( ३-४ स्टेशन )ला जायचे असले तरी पण तुम्ही फास्ट लोकलने प्रवास करता. त्या साठी तुम्ही आधीच्या दोन स्लो लोकल सोडून देता.

१२)पावसाळा सुरु झाला की तुमच्या बॅग मधे छत्री विराजमान होते. अगदी निरभ्र आकाश जरी असलं तुम्ही छत्री वागवत फिरता.

१३)भरपूर पाऊस पडल्याचे प्रुफ म्हणजे लोकल बंद पडणे. जो पर्यंत लोकल बंद पडत नाहीत तो पर्यंत तुम्ही खूप पाऊस खूप पडल्याचे मान्य करत नाही.

१४) टुम्ही पावसाळ्यात मिलन सबवे बंद झाला का? हिंदमाता जवळ पाणी भरलं का? कुर्ल्याच्या ट्रॅक वरच्या सिग्नल प्रणाली पाण्याखाली बुडाल्या का? यावर लक्ष ठेऊन असता.

१५) हापूस आंबा हा तुमचा विक पॉइंट असतो. तुम्ही जर मूळचे कोकणातले असाल, तर तुमच्या घरी दहा आंब्याची कलमं, २० सुपारीची आणि २० नारळ असतातच, पण तुमच्या जवळच्या नातेवाईकाने सगळे हडप केल्यामुळे तुम्हाला आंबे विकत घ्यावे लागतात हे तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत असता.

१६)तुम्ही बहुतेक मुंबईच्या हिंदी भाषेतच सगळ्यांशी बोलता, पण जेंव्हा एखाद्या हिंदी भाषीय माणसाबरोबर लोकल मधे भांडण होते, तेंव्हा तुम्ही आपल्या मराठीत बोलणे सुरु करता.

१७) ८-०६, ८-३५ ९-५१ ह्या सगळ्या वेळा तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात .

१८)तुमच्या दृष्टीने तुमच्या उत्तरेला (नॉर्थ बॉंबे ला) रहाणारे सगळे खालच्या दर्जाचे, आणि दक्षिणेला ( साऊथ बॉंबे साईडला) रहाणारे शायनिंग मारणारे असतात. सेंट्रल आणि वेस्टर्न लाइनला हे लागू होत असतं.

१९)तुमच्या दृष्टीने १० बाय १२ ची खोली म्हणजे हॉल असतो.

२०) स्टॉक मार्केट तुमचा विक पॉइंट असतो, तुमची इनव्हेस्टमेंट अगदी ५० हजार असेल तरी सुद्धा, तुम्ही स्टॉक च्या मुव्हमेंट्स वर नजर ठेऊन असता आणि लोकल मधे डिस्कशन सुरु झाले की हिरारीने आपली मतं मांडता.

२१)गर्दी नसली की तुम्ही नर्व्हस होता.

२२) पावसाळ्यात गुडघाभर घाणेरड्या पाण्यातून गर्लफ्रेंडला बाइक वर मागे बसवून ड्राइव्ह करणे ही तुमची रोमॅंटीझम ची अल्टीमेट आयडीया असते.

२३) ड्राइव्ह करतांना दहाव्या मिनिटाला तुम्ही इतरांना शिव्या देणे सुरु करता.

२४) तुमच्या दृष्टीने मुंबई मधे आत शिरतांना ३० रु टोल टॅक्स हा योग्यच आहे

२५)तुमच्या घरी पेपर वाला दर रवीवारी पेपर सोबत कमीत कमी ५ तरी निरनिराळे होम डीलिव्हरीचे मेन्यु टाकुन जातो, आणि तुमच्या कडे असे सांभाळून ठेवलेले कमीत कमी २० एक तरी होम डिलिव्हरी मेन्यु कार्ड्स असतात.

२६) तुमच्या स्पिड डायल वर एक किराणा दुकानदार नक्कीच असतो.

२७)तुम्ही राणीची बाग, तारापोरवाला मत्सालय, किंवा म्युझियम कधीतरी लहान असतांना एकदा पाहिलेले असते. नंतर तुम्ही या ठिकाणी कधीचे गेलेले नसता.

२८) तुमच्याशी कोणी अनोळखी व्यक्ती चांगलं वागायला लागली की तुम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल संशय वाटतो.

२९) निरनिराळ्या भाषेतल्या शिव्या तुम्ही आधी शिकता, आणि त्या शिकल्या की त्यांचा मुबलक वापर केल्यावर आपल्याला ती भाषा येते असा तुमचा समज असतो. ( जसे गांडाभाई, बोकाचोदा वगैरे वगैरे)

३०) तुमच्या फ़्लॅटला एक नेहेमीचे दार आणि एक वॉच डोअर ( जाळीचे दार) नक्कीच असते. बाहेर जातांना तुम्ही मुख्य दाराला, एक लॅच लॉक, दुसरे कडी घालून लॉक आणि तिसरे लॉक जाळीच्या दाराला लावून आणि प्रत्येक कुलुपं तीनदा चेक करूनच तुम्ही बाहेर पडता.

३१) बार मधे गेल्यावर ५५ रुपयांच्या बिअर साठी तुम्ही २०० रुपये अगदी विना तक्रार देता , पण रिक्षावाल्याला एक रुपया पण जास्त देत नाही.

३२) सुटी म्हणजे ट्रेकींगला जायचा दिवस हे तुमचे स्पष्ट मत असते.

३३) भांडताना हिंदी भाषीय वरचढ व्हायला लागला की तुम्ही भैय्या म्हणून हिणवता, आणि मराठी मधे भांडण मुद्दाम कंटीन्यु करता.

३४) हिवाळ्यात जेंव्हा १२ डिग्री तापमान असते तेंव्हा तुम्ही कितना चिल्ड है म्हणून स्वेटर शोधायला लागता.

३५) खूप पाऊस पडला की तुम्ही सकाळी बातम्या लावून बसता, कुठे पाणी भरलंय का हे बघायला, म्हणजे ऑफिशीअली ऑफिसला दांडी मारण्याची सोय होते.

३६) तुमचे दररोजचे ४-५ तास ऑफिसला जाण्या – येण्यात खर्च होतात.

३७)डिओडोरंट हे तुमच्या साठी मस्ट असते.

३८) किती अंतर आहे हे तुम्ही मिनिटांमध्ये सांगता – किमी मध्ये नाही.

३९) टॅक्सी , ऑटॊ चे मीटर चुकीचे आहे म्हणून तुम्ही कमीत कमी आठवड्यात एकदा तरी त्यांच्याशी भांडता.

४०) लोकल मधे प्रवास करतांना गर्दी असेल तर तुम्ही जागा मिळवण्याचा प्रयत्न करता, पण जेंव्हा बसण्यासाठी जागा रिकामी असते, तेंव्हा मात्र लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करता.

४१) सुटीच्या दिवशी मित्र मैत्रिणी सोबत बाहेर जाऊन खाणे ही तुमचा अल्टीमेट एंजॉयमेंट!

४२) तुम्ही संध्याकाळी ५-३२ ला लोकलच्या ब्रिज वरून जात असतांना तुम्हाला ईंडीकेटर वर एखादी फास्ट लोकल १ मिनिटात येत आहे असे दिसले तर तुम्ही धावत जाऊन ती लोकल पकडण्याचा प्रयत्न करता. त्या लोकल नंतर दोनच मिनिटांनी दुसरी लोकल आहे हे माहिती असून सुद्धा!

४३) कोणाला भेटण्याची जागा म्हणजे रेल्वे स्टेशन वरच्या प्लॅटफॉर्म वरच्या इंडिकेटर खाली ही जागा असते.

४४) कुठे टाऊन साईडला जायचे असल्यास तुम्ही घरी कार असूनही शक्यतो लोकल ने प्रवास करता.

४५) स्वतःच्याच बायकोला ऑफिस सुटल्यावर बाहेर भेटायला बोलावता, आणि डेट ला घेऊन जाता :)

४६) पुणेकर विरुद्ध मुंबईकर हा तुमचा आवडीचा डिस्कशनचा विषय असतो.

४७) तुम्ही कुठेही गेलात तरी आपण होऊन कोणी न सांगता पण रांगेत उभे रहाता .

४८) तुम्ही कितीही गर्दी असलेल्या लोकल मधून उतरला तरीही तुमच्या बुटांचे पॉलिश खराब झालेले नसते.

४९) प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे तुमचं ‘आराध्य दैवत’

५०) गणेशोत्सवात एकदा तरी लालबागला रांगेत उभे राहाता.

५१) तुमच्यासाठी बांद्रा रेक्लेमेनशन, मरीन ड्राईवच्या समुद्र किनाऱ्यापुढे हवाई आणि होनुलुलु ही ‘झक’ मारतं.

५२) मुंबईचा पाऊस + टपरी वरची चहा + चेतानाकडी (सिगरेट) = अल्टीमेट कॉम्बिनेशन !

५३) दर पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी माळशेजला जाता आणि दर उन्हाळ्यात एकदा तरी अलिबागला!

५४) नवरात्रात दांडिया खेळताना कितीही बोटं मोडली तरि तुम्ही दरवर्षी नचुकता दांडिया खेळायला जाता

५५) FM radio is your best Entertainment in Traffic

५६) दक्षिणेकडे रहाणारे सगळे ( कर्नाटकी , तामीळ तेलगू ) हे तुमच्या मते “मद्रासी” असतात/

५७)रिक्षावाल्याला “ए रिक्षा” म्हणणे

५८)वयस्कर taxi वाल्याला “अंधेरी जायेगा?” असं एकेरी विचारणे आणि त्याने देखील वाईट वाटून न घेता सरळ “नही” असं निर्विकारपणे सांगणे हे देखील मुंबईतच.

५९)आपल्या गावी गेल्यावर “आमच्या बॉम्बेला ” हि तर चाकरमान्यांची हमखास सुरुवात!

६०)आपल्या गावी गेल्यावर सगळे लोकं कसे संथ वागताहेत, कोणाला काहीच काम नाही का? अशा कॉमेंट्स करणे.

६१)स्त्रियांचे स्पेशल :- लोकल मधे क्लिपा, नेलपॉलिश वगैरे विकायला येणाऱ्याचा खजीना उचकटून पहाणे , आणि घरी गेल्यावर नवऱ्यापुढे खजीना रिता केल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी दाखवणे.

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा.. मुली कशा पटवाव्या… ऐसे असावे संसारी बंदी घातलेली पुस्तकं.. चावट -वात्रट आणि आवाज. आकाश कंदील.. पुन्हा एकदा.. ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट….. लोकं लग्न का करतात? मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं.. एक कथा- १ एक कथा- २ कथा ३ द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा) रोमॅंटीक आयडीयाज.. खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत? तिच्या मनातलं… नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल… प्रेम.. भविष्य.. चवीने खाणार हैद्राबादला… कौतुक डायटींग करताय ??? तुका म्हणे.. हर एक दोस्त जरूरी होता है… दुःख… तुम्ही मुंबईकर आहात जर… पुणेरी पगडी… पुण्याचं रानमळा गमतीशीर म्हणी.. अब्रू ची किंमत किती आहे हो?? फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल नॅशनल शेम! झपाटलेले… फुलपाखरु तिच्या मनातलं…