A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionn10pb1r55u2u0i7pip34jk1mrcmcg3lk): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 316
Function: require_once

काय वाटेल ते…….. | ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..

कधी अटेंड केलंय़  का एखादं भैय्याचं लग्नं ??- नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे ? नाही?? अरे यार.. तुम्ही जीवनातल्या एका अत्युच्च आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या भैय्या लोकांच्या लग्नामध्ये खुप मजा येते. इतकी मजा तर अगदी मारवाड्याच्या लग्नात पण येत नाही.

हे भैय्ये लोकं  कितीही शिकलेसवरले असले तरीही वागणुकीत फारसा फरक नसतो.  शेवटी वळणाचं पाणी वळणालाच मिळणार ना?

नुसती धमाल असते.. या लोकांच्या लग्नाची वेळ साधारण रात्री १ ते ४ च्या दरम्यान असते.    लग्न म्हणजे एक मोठा कार्यक्रम असतो. लग्न रात्री , म्हणजे दिवसभर फुल टू टाइम पास सुरु असतो. खाणं पिणं..इत्यादी इत्यादी.. इत्यादी  गोष्टींची रेलचेल असते. ज्याला जे वाटेल ते तो करित असतो.

तर अगदी पहिल्या पासून सुरु करु या आपण.. नवऱ्या मुलाला   कुठल्यातरी चांगल्याशा  हॉटेलमधे त्याच्या मित्रांसोबत उतरवलेले असते. आदल्या दि्वसापासूनच इथे त्यांची सरबराई सुरु असते. इतर बाराती पण तिथेच असतात, पण नवऱ्या मुलाच्या मित्रांना थोडा जास्तच मान दिला जातो.

लग्नाचा मंडप कुठे तरी दुसऱ्या एका ठिकाणी असतो. मंडपामध्ये सगळीकडे बसण्याची बैठक वगैरे व्यवस्था करुन ठेवलेली असते. जर जास्त झालीच तर झोपण्याची ही सोय असते. स्टेज बनवलेलं असतं, शक्यतो दोन भागात विभाजित असतं ते.  कशाला?? सांगतो!!पण पुढे , आत्ता नाही….!

लग्नाची वेळ व्हायची होती. नवरा मुलगा आय टी कंपनी  मधला- आणि मुलगी पण तिथलीच. मुलाचे सगळे मित्र आले होते कानपुरला लग्नासाठी . गप्पा, खाणं पिणं सुरु होतं सकाळपासून. शेवटी संध्याकाळी बारात निघायची तयारी झाली. अंदाजे सात- साडेसात झाले होते. हॉटेलच्या समोर बॅंडवाले  जोर जोरात बँड वाजवत होते. नवरा मुलगा खाली आला…. आणि एकदम स्मशान शांतता!!!! बॅंड वाजणे बंद झाले एकदम.. कोणालाच काही कळॆना.. काय झालं? तर बॅंडमास्टर पुढे आला, म्हणाल पैसा दो.. तो बॅंड बजेगा. ( पैसा दो.. हे म्हणताना डोक्यावरून ओवाळून टाकण्याची ऍक्शन करित होता तो).शेवटी हजार रुपये नवऱ्यामुलाकडून वसूल केल्यावर बॅंड परत सुरु झाला.

समोर एक सजवलेली कार होती. कारला बदकाचा आकार दिलेला होता. चकचकीत अल्युमिनियमच काम केलेलं होतं..वरचं टप उघडं होतं. त्यात नवरदेव बसणार तर पुन्हा तेच.. ड्रायव्हर खाली उतरला. पैसा दो… !तो ही गाडी चलेगी… इथे पण त्या नवऱ्यामुलाच्या भावाने हजार रुपये दिले, तरी पण तो कारवाला तयार होत नव्हता. १५०० रुपयांवर मांडवली झाली, आणि एकदाची समोर निघाली वरात.. थोडं पुढे गेल्यावर डोक्यावर लाइटींग घेउन चलणारे थांबले….

अगदी बरोबर ओळखलं.इथे पैसे उडवायची ऍक्शन केली त्या बत्ती वाल्यांनी.. म्हणजे  नवऱ्या मुलाच्या डोक्यावरून ओवाळून पैसे उडवा…. इथे दहाच्या आणि शंभराच्या नोटांचं बंडल होतंच त्या मुलाच्या भावाच्या हातात, म्हणजे त्याला पुर्ण खात्री होती की असं काहीतरी होणार म्हणून. डान्स बारमधे नोटा ऊडवतात तशा नवऱ्यावरून ओवाळून नोटा उडवणे सुरु झाले. ह्या बत्ती वाल्यांच्या बरोबर लहान मुलं पण होती. ती नोटा गोळा करुन आपापल्या आई बापाकडे देत होते. सोबतंच डोक्यावरच्या बत्त्या खाली ठेवून ते लोकं स्वतः पण नोटा गोळा करित होते.  नवरा मुलगा केविलवाण्या प्रमाणे हे सगळं पहात होता.

असं होता होता वरात एकदाची कण्हत कुथत लग्न मंडपा जवळ ( म्हणजे अर्धा कि.मी वर ) पोहोचली. तिथे एक सुंदर सजवलेला पांढरा घोडा, छानसं खोगीर घालुन तिथे उभा होता. त्या घोड्यावर मुलाला बसवलं.. अरे भाई…. बारात तो घोडीपेही आएंगी नां…. तर तो घोडा घेउन त्याचा मालक चालायला लागला. समोर फटाके उडवणं सुरु होतं..

घोडी चालत होती, तेवढ्यात एक गाणं सुरु झालं, आणि त्या घोडीच्या मालकाने घोडीच्या लगामाला विशिष्ट झटका दिला आणि ती घोडी नाचायला लागली. मोठं मजेशीर दृष्य होतं ते. घॊडीच्या पाठीवर नवरा मुलगा जीव मुठीत धरुन बसलाय , आणि ती घॊडी नाचते आहे. मला तर वाटलं की तो नवरा मुलगा पडणार आता. अहो घोडीवर बसायचं, आणि लगाम हातात नाही, नुसती आयाळ धरुन किती वेळ तोल सांभाळणार?????. नवरा बिचारा केविलवाणा चेहेरा करुन विनंती करतोय की  बस्स.. करो भाई.. मत नचाओ घोडी को….मला उतरव रे बाबा.. पण … नो वे.. तो घोडी वाला अजुन चेव आल्यासारखा त्या  घोडीला नाचवत होता…  शेवटी त्या मुलाचा भाउ पुढे आला, आणि त्या घोडीवाल्याला १००० रुपये दिले, तेंव्हा हा तमाशा थांबला…आणि  ती घॊडी दुडक्या चालिने मंडपाकडे निघाली.

नवऱ्या मुलाची सगळी हाडं खिळखीळी झालेली असावी त्या नाचण्यामुळे.चेहेरा अगदी पहाण्यासारखा झालेला.. त्याला पण वाटलं असावं, की कशाला आपल्या मित्रांना बोलावलं लग्नाला, उगीच शोभा करुन घ्यायला!!!परत गेल्यावर ते आपल्याला कसे चिडवतील हा पण एक प्रश्न होताच..

लग्न मंडपाच्या दाराशी, टिका लावणे हा प्रकार झाला. आणि नवरा मुलगा आत जाउन बसला. समोर जेवणाची व्यवस्था करुन ठेवलेली होती. स्नॅक्स वगैरे होतेच.. आणि कोणीतरी हळूच येउन सांगितलं की उपर व्यवस्था की गई है.. वरच्या मजल्यावर अपेय पानाची व्यवस्था होती. लोकं वर जाउन पिऊन येत होते, तर काही लोकं खालीच बाटल्या घेउन आलेले होते. समोर स्टेजवर मुलगा आणि मुलगी बसले होते. स्टेजच्या अर्द्याहुन जास्त भागात………!!!!!!!!!!!

तर स्टेजच्या दुसऱ्या अर्ध्या भागात डान्सकरिता स्टेज सजवलं होतं.समोर चार मोठे मिशीवाले गुंडासारखे दिसणारे लठैत होते. स्टेजवर बिडी जलाइले …. जिगरसे पिया…. गाण्यावर दोन अर्ध नग्न स्त्रिया नाच करित होत्या- तुम्ही सिनेमात पहाता ना, अगदी तस्संच…. स्टेजवरच एक मेक शिफ्ट पडदा लावलेला होता. नाच सुरु असतांनाच एखादा टुल्ली झालेला स्टेजवर चढायचा प्रयत्न करित होता….. आणि मग लगेच ते लठैत का आहेत याचा शोध लागला..

कोणी त्या स्टेज वर चढलं आणि त्या मुलींच्या अंगचटीला जाउ लागलं, तर ते लठैत त्या माणसाला खाली उतरवायचे… आणि तेवढ्यातच त्या स्त्रिया पडद्यामागे धावत जायच्या, आणि ते लोकं खाली उतरले की मग पुन्हा स्टेजवर  यायच्या… अशा चार मुली होत्या..आलटून पालटुन नाचायला.. :)

थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली, की आता १० मिनिटांचा ब्रेक आहे, आणि तेवढयात पाहुण्यांनी खान -पान करुन यावे. लोकं धावतंच माडिवर गेलेत पेय पान करायला…!आणि खायला..पुन्हा थोड्यावेळाने सिडी लाउन नाच सुरु झाला.आणि पुन्हा तेच सगळं.. लोकांचं ओरडणं .. वगैरे वगैरे….

जयमालेची वेळ रात्रीची एक वाजताची होती. जयमाला झाली आणि पुन्हा हा नाच सुरु झाला. रात्री मग इतर कार्यक्रम सुरु होतेच. बरेचसे लोकं तिथेच  टाकुन ठेवलेल्या बिछायतीवर आडवे होऊन घोरु लागले होते.. लग्नाचे इतर विधी पण झालेत रात्रभर चालणारा हा सोहोळा कधी संपला ते कळलंच नाही….. :) विदाईची वेळ सकाळी  आली, तो पर्यंत अर्धे लोकं आडवे झालेले होते… :)

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अटेंड करावा असा हा सोहोळा… मस्ट फॉर एव्हरी वन .. वन्स इन लाइफ टाइम…! :D बाय द वे.. मी नाही अटॆंड केलं हे, तर माझी बहीण आणि तिचा नवरा दोघे पण गेले होते या लग्नाला. ती दिल्लीला असते , आयटी मधेच :) तिने केलेले वर्णन इथे लिहुन काढलंय. आज आली होती  ती मुंबईला..

काय वाटेल ते……..

महेंद्र कुलकर्णी
Chapters
वात्रट मुलाची कथा..
मुली कशा पटवाव्या…
ऐसे असावे संसारी
बंदी घातलेली पुस्तकं..
चावट -वात्रट आणि आवाज.
आकाश कंदील.. पुन्हा एकदा..
’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..
लोकं लग्न का करतात?
मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..
एक कथा- १
एक कथा- २
कथा ३
द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद
छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)
रोमॅंटीक आयडीयाज..
खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?
तिच्या मनातलं…
नरेंद्र मोदींचे गुजरात मॉडेल…
प्रेम..
भविष्य..
चवीने खाणार हैद्राबादला…
कौतुक
डायटींग करताय ???
तुका म्हणे..
हर एक दोस्त जरूरी होता है…
दुःख…
तुम्ही मुंबईकर आहात जर…
पुणेरी पगडी…
पुण्याचं रानमळा
गमतीशीर म्हणी..
अब्रू ची किंमत किती आहे हो??
फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल
नॅशनल शेम!
झपाटलेले…
फुलपाखरु
तिच्या मनातलं…

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_write_close(): Failed to write session data (user). Please verify that the current setting of session.save_path is correct (/tmp)

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: