Get it on Google Play
Download on the App Store

मल्हारी मार्तंड खंडोबा

" आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, gprs वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घ्या . जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला . हे झालं तळी भंडार . आत्ता खंडोबा विषयी थोडेसे , खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला. पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात. खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे . दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे. खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला . खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर . खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी . खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे . लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते . मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा . आत्ता साठी एव्‍हढंच अजून बराच काही लिहणार आहे सध्या एवढी माहिती पुरेशी आहे -----माहिती संकलन (संकेतसिंह भंडारी )

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी