Get it on Google Play
Download on the App Store

भविष्यकथानाची सिद्धी 1

प्रत्येक मनुष्याला आपला भविष्यकाळ जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते . वास्तविक भविष्यकाळात अज्ञात आहे हेच एका अर्थी बरे आहे . कारण पुढे घडणाऱ्या सर्वच घटना चांगल्या व सुखप्रद असणे शक्य नाही . ' सुख पाहता जीवपाडे ; दुखः पर्वताएवढे '' असे सुख्दुखचे व्यस्त गणित आहे .म्हणून पुढच्या वाईट व दुखप्रद घटना अगोदरच समजून घेणे खरे म्हणजे शहाणपणाचे ठरणार नाही ; परंतु अज्ञाताचा पडदा फाडून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न मनुष्य सतत करीतच असतो व यापुढेही त्याचा हा उद्योग थांबेल असे वाटत नाही ! या भविष्यकाळात डोकावण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब केला जातो . यातला सर्वांना ठाऊक असलेला मार्ग म्हणजे ज्योतिष शास्त्र ! यामध्ये जन्मकुंडली वरून भविष्य सांगणे , हस्तरेषा पाहून भविष्य वर्तवणे , संख्याशास्त्र , चेहरा पाहून भविष्य सांगणे , रामाल विद्या असे अनेक प्रकार आहेत . जन्मकुंडलीतही सायन , निरयन असे आणखी पोट विभाग आहेतच ! या शास्त्राला काहीएक प्रकारची उपासनेची बैठक असल्याशिवाय वर्तवलेली भविष्ये बरोबर येत नाहीत . त्यामागे दैवी शक्तीचे अधिष्ठान असावेच लागते ! ज्योतिषशास्त्र विषयक इतर प्रकारांनाही हाच नियम कमी - अधिक प्रमाणात लावावा लागेल ! भविष्यकाळात डोकावण्यासाठी ' crystal ball ' मध्ये पाहणे हादेखील , विशेषतः पशत्य देशात सरस आढळणारा एक प्रकार आहे . हा प्रकार म्हणजे एक प्रकारचे त्राटक होय ! या मार्गाने भविष्य सनग्नर्यमध्ये अमेरिकेतील जीन डिक्सन या स्त्रीची विशेष प्रसिद्धी आहे . तिने च्र्य्स्तल बाल मध्ये वर्तवलेली सगळी भविष्य खरी झाली आहेत असे नसले तरी काही भविष्य आश्चर्य वाटावे इतकी तंतोतंत खरी ठरली आहेत . उदाहरणार्थ , अमेरिकेचे सर्वात तरुण राष्ट्रपती केनेडींचा खून , रूझवेल्ट यांचा मृत्यू , त्याचप्रमाणे भारताची फाळणी , हैद्राबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण तसेच , महात्मा गांधींचा खून इत्यादी घटना तिने आगाऊ वर्तव्ल्यप्रमनेच घडल्या व तो एक आश्चर्याचा व तो एक आश्चर्याचा व कुतूहलाचा विषय ठरला ! काही लोकांना भविष्य काळातील घटना काहीएक प्रकारच्या स्पंदनांच्या योगे आगौच वर्तवता येतात . अवकाशातील ही स्पंदने ग्रहण करण्याची विशेष शक्ती त्यांच्या जवळ असते . सुप्तावस्थेतील या घटना त्यांना काही वेळा या लोकांना प्रतिक रुपाने ही दिसतात व त्यांचा अर्थ योग्य प्रकारे ;लावता आला तरच त्यांनी वर्तवलेली भविष्ये खरी ठरतात . अन्यथा साफ चुकतात , असा अनुभव आहे ! नियती ने सर्व घटना कालावकाशात अगोदरच निश्चित केल्या जातात . त्या घडून येण्याची निश्चित वेळदेखील ठरलेली असते . या सुप्तावस्थेतील घटनानांचे सुक्ष तरंग अथवा त्यामधून बाहेर पडणारी स्पंदने अचूक पकडता आली , त्यांचा योग्य अर्थ लावता आला व त्या घटनांचा योग्य काल ठरविता आला तर भविष्य काळात घडणाऱ्या अनेक अज्ञात गोष्टी आगाऊच जाणता येतील . काही लोक एखाद्या मनुष्याच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही घटना , केवळ त्या माणसाकडे एकाग्र चित्ताने काहे वेळ पाहून अचूक सांगू शकतात . याचाच अर्थ असा की या लोकांना कलव्कशतिल भविष्यकालीन घटनांचे स्पंद पकडता येत नाहीत , तर फक्त घडून गेलेल्या काही घटनांच्या स्पन्दनचॆच नोंद घेता येते . अशा प्रकारे भूत व भविष्यकाळातील ' काही ' घटना तंतोतंत बरोबर सांगणाऱ्या काही व्यक्तींशी झाल्येल्या या गाठी - भेटी . त्यांची भूत - भविष्यात डोकावण्याची अद्भुत शक्ती आपल्याला आश्चर्य चकीत करून सोडल्यावाचून राहत नाही . १९७४ साली साप्तेम्बेर महिन्यात आमच्या ओफ्फिचे मध्ये एकेकी बदलाचे वारे वाहू लागले ; परंतु आपली बदली होईल असे फडक्यांना वाटत नव्हते . office मधील काही सहकार्यांचे देखील असेच मत होते .त्यामुळे ते पुष्कळ निश्चिंत होते ; परंतु याबाबत आमचे मित्र श्री . जोशी यांना एकदा विचारून घ्यावे असे फडक्यांना वाटले . कारण भविष्य काळातील काही घटना ते पाहू शकतात असा त्यांच्या विषयी अनुभव होता . फडके लगेचच त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हंटले , " जोशीबुवा, माझी बदली वगैरे होणार आहे का तेवढे सांगा . " त्यावर समोरच्या भिंती कडे एकाग्रतेने पाहत ते म्हणाले , तुम्ही काहीही म्हणालात तरी पुढच्या महिन्यात तुमची बदली नक्की होणार ! " जोशीबुवांच्या या उत्तराने फडके चांगलेच हबकू गेले . कारण जोशी बुवांनी सांगितलेल्या पुष्कळ गोष्टी अगदी बरोबर ठरल्या होत्या . फडक्यांनी विचारले , " माझी बदली साधारण कुठल्या बाजूला होईल असे तुम्हाला वाटते ? " त्यावर हातातला अडकित्ता चक्राकार फिरवीत जोशीबुवा पुन्हा समोरच्या भिंतीकडे क्षणभर एकाग्रतेने पाहत म्हणाले , " मला खूप देवळे दिसताहेत , म्हणजे तुमची बदली ज्या ठिकाणी खूप देवळे आहेत अशा गावी होईल ! " जोशीबुवांची ही दोन्ही भविष्ये पुढे तंतोतंत खरी ठरली . कारण ध्यानी मनी नसताना अगदी शेवटच्या क्षणी जी चार नावे बदलीच्या order मध्ये घालण्यात आली त्यात त्यांचे नाव होते .प्रथम माझही बदली कणकवली ला नंतर पुढे एकाच महिन्याने कोल्हापूर ला झाली . कोल्हापूर हे गाव साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असून आंबा बाईच्या मुख्य मंदिराच्या आवारातच इतर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत , हे वेगळ सांगायला नको . जोशी बुवा आणि फडक्यांची भेट पहिली भेट मुद्दाम सांगण्याजोगा आहे . तो त्यांच्याच शब्दात ... १९७० साली मी अशाच एक विलक्षण अडचणीत सापडलो. त्या अडचणीतून आपण कधीकाळी सुखरूप बाहेर पडू असे मला मुळीदेखील वाटत नव्हते. मी फारच चिंतेत होतो . त्या वेळी माझे गोडबोले नावाचे एक मित्र मला म्हणाले ," मी तुमची जोशी नावाच्या गृहस्थाशी गाठ घालून देतो. त्यांना काही एक प्रकारची दिव्यदृष्टी असून तुमच्या अडचणीत ते तुम्हाला काही मार्ग्र्दर्शन करू शकतील." त्या वेळी संध्याकाळचे सात वाजून गेले होते, तरी मी गोडबोल्यांबरोबर तसाच निघालो व जोशी बुवांकडे आलो. जोशीबुवांचे घर खूपच छोटेखाणी होते. आम्ही दोघे बसल्यावर ते भरूनच गेले! गोडबोल्यांनी माझी व त्यांची ओळख करून दिली व त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत" असे त्यांना सांगितले. जोशीबुवा त्यावेळी परगावी जायच्या गडबडीत होते.म्हणून ते म्हणाले "यांना पुन्हा केव्हातरी घेऊन या कि ! मग बोलू सावकाश ." त्यावर गोडबोले म्हणाले,"तसे नको . तसे केले तर मीच तुम्हाला यांच्याबद्दल सगळी माहिती मधल्या कळत दिली असे यांना वाटेल." " ठीक आहे मग आताच दहा मिनिटे सवड काढतो." जोशी बुवा म्हणाले. मग त्यामुळेच अर्थातच धीर आला व मी जोशीबुवांना म्हटले, "माझा प्रश्न सांगू का तुम्हाला ? " त्यावर जोशी बुवा मला अडवत म्हणाले,"छे छे ! अहो, तुमचा प्रश्नदेखील मीच सांगणार आहे." मी अवाकच झालो ! कारण हा अनुभव नवीन होता. उत्तरपूर्वी प्रश्नही सांगणारा मनुष्य मला अजून भेटला नव्हता. जोशीबुवा बाहेर आकाशाकडे एकाग्रतेने पाहत म्हणाले,"तुमच बाकी सगळ ठीक दिसतंय मला; परंतु राहत्या जागी त्रास होतोय आणि त्याबद्दलाचाच प्रश्न आहे तुमचा. काय? बरोबर ? " मी चकितच झालो. कारण माझा प्रश्न पण नेमका तोच होता. त्यामुळे मी म्हणालो."तुमचे उत्तर एकशे एक टक्के बरोबर आहे!" जोशीबुवा नुसतेच हसले. मग त्यांनी मला विचारले." का हो, तुमच्या मुलाच्या पाठीवर तुळशीपत्राएवढा पंधरा डाग आहे का ?" मी पुन्हा चकित झालो. कारण ती गोष्ट देखील पूर्णपणे खरी होती. एकदा अशीच गंमत झाली एकदा आमच्या ऑफिसमधील एक वरिष्ठसाहेब मुंबईच्या एका महत्त्वाच्या 'ट्रंककॉल' ची वाट पाहत होते; परंतु 'कॉल' येताच नव्हता. त्यामुळे ते चुळबुळ करत होते. त्यांची अस्वस्थता पाहून मी म्हणालो, "आपण जोशी बुवानांच विचारू." आम्ही दोघेही लागलीच जोशीबुवांकडेच आलो. साहेब मजकुरांनी आपला प्रश्न बुवांनाच विचारला तेव्हा जोशीबुवा क्षणभर आपली दृष्टी भिंतीवर एकाग्र करीत म्हणाले "आज दुपारी तीन वाजता 'ट्रंककॉल' येईल." आश्चर्य असे, कि खरोखरच दुपारी तीनच्या सुमारास तो 'ट्रंककॉल' आला; परंतु त्या 'कॉल' मध्ये एवढेच सांगण्यात आले, कि "आवश्यक ती माहिती अजून हाती आलेली नसल्याने उद्या सकाळी पुन्हा 'कॉल' करतो." परंतु दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे चार वाजले तरी 'कॉल' आला नाही. त्यामुळे ते वरिष्ठ पुन्हा अस्वस्थ झाले. त्यांची ती अवस्था पाहून मीच त्यांना म्हणालो,"मी जोशिबुवांकडे जाऊन येऊ का?" त्यांनी अर्थातच होकार दिला व मी लगेच जोशिबुवांकडे आलो व त्यांना सगळी हकीकत सांगून म्हटले, "आता पुढचा 'ट्रंककॉल' कधी येईल तेवढे सांगा. " जोशीबुवा म्हणाले, "रात्री साडेआठला येईल." मी त्याप्रमाणे वरिष्ठांना सांगितले. आणि पुन्हा आश्चर्य घडले ! त्या दिवशी खरोखरच रात्री साडेआठच्या सुमारास तो 'कॉल' आला. एक दिवस मी जोशीबुवांना म्हटले,"का हो जोशीबुवा, तुम्हाला हे सगळ काळात तरी कस ?" त्यावर एकदा खळखळून जोशीबुवा म्हणाले,"त्यासाठी मी बारा वर्ष खडतर साधना केली आहे. त्यायोगे पुढे होणाऱ्या घटनांची दृश्ये मला सिनेमा पाहावा त्याप्रमाणे आगपेटीच्या आकाराएवढ्या काल्पनिक पडद्यावर स्पष्ट दिसतात. ती पाहून मी तुम्हाला भविष्य सांगतो." "आपण साधना तरी काय केलीत?" क्रमश:

शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha

संकलित
Chapters
अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 1 कल्की अवतार अश्वत्थामा चिरंजीव आहे का? 2 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 1 हिमालयावर सिध्दपुरुष आहेत का? 2 योगसामर्थ्य 1 योगसामर्थ्य 2 तीर्थमंत्रातील सामर्थ्य ! 1 तीर्थमंत्रातील सामर्थ्य 2 कसबा गणपती इच्छापूर्ती मयुरेश्वर, मोरगाव रुद्राभिषेक भविष्यकथानाची सिद्धी 1 भविष्यकथानाची सिद्धी 2 भविष्यकथानाची सिद्धी 3 शोध अश्वत्थामाचा 3 Naustradamus 1 Naustradamus 2 कोकणेश्वर महादेव लावणी ६४ वी एका अप्सरेच्या मुली नेपाळमध्ये मोठा भूकंप मृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले जगातील सहा न उलगडलेले रहस्य . चेटकीण प्रथेचा काळा इतिहास संत नामदेव शिव भारतामधील Top 10 मंदिरे दैवी शक्ती पृथ्वीच्या पाठीवर सूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण पुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र वास्तुपुरुष गुढीपाडवा देवगड-विजयदुर्ग मार्गावर गिर्ये पोस्ट दैवी शक्तीं मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... संतांचा सहवास सध्या दैवी शक्ती ऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती।। ।।ॐ।। ओम नम: शिवाय। भारताने लावलेले शोध योगीराज संत सोहिरोबानाथ... महाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी द अंबेर रुम मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? हिंदू धर्म महाभारत एक प्राचीन ग्रंथ तीर्थस्थळाचे नाव महात्मा बसवेश्वर चैत्र शुद्ध नवमी गंगासागर भारतातील ऋषीमुनीं विमानाचा शोध भगवान श्रीकृष्ण महाराष्ट्रात महानुभाव अघोरी कुलइतिहास द्रौपदीला द्रौपदीचे वस्त्रहरण दत्ताची नावे आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था . आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा.. भाग २ रा ....रुपकुंड श्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला. भारतीय संस्कृती महाराज कोण होते, कोठून आले दैवी किंवा देवता ‘गावपळण!’ गणपती विषयी काळभैरव 13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा .... वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण गरुडपुराण प्राणायामातून होते कुंडलिनी जागृती... || गणपती बाप्पा मोरया || अंबरनाथचे पुरातन शिवमंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ... श्री.सोमनाथ मंदिर (गुजरात) मयंग : आसाम गावाचे नाव :- वालावल मल्हारी मार्तंड खंडोबा डॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख .. दत्तावतारी **** भूतांचे प्रकार **** भाग १- Part - 1 पिशाच्च रुद्राक्ष भाग २ माफ करा वाचकांनो आजचे अनुभव ||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी|| चक्र आपण जानता आहात का ? गुरु सामर्थ्य मी तन्वी रेडी नामस्मरण नामसाधनेची येळकोट-येळकोट-येळकोट-येळकोट-जय मल्हार ! १९२१ सालची गोष्ट दिनदर्शिकेप्रमाणे महाभारतातल्या हिमालयीन यती/ हिममानव:- अखंड नामस्मर मनुष्य हा कल्पना विलास तबकड्या बहुधा पाण्यावर ध्यानावस्थेत भगवान पतंजली महाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या सोमजाई देवीचा इतिहास लावणी ४४ वी