जपानी मांजर (Marathi)
महाकाल
खूप वर्षांपूर्वी जपान मधील समुद्रा जवळच्या एका गावात घडलेली गोष्ट आहे. त्या गावात योहेई नावाचा गरीब मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता. एकदा योहेईला चिखलात माखलेली एक पांढरी मांजर आपल्या दारात दिसली. त्याने त्या बेवारस मांजरीचे स्वागत केले आणि मांजर पसार होण्यापूर्वी त्याने त्याचे जेवण त्याच्याबरोबर वाटून घेतले. मग ती मांजर त्यांच्याकडेच राहू लागली. पुढे योहेईचे वडील आजारी पडले तेव्हा तो खूप उदास झाला. बापाची काळजी घेण्यासाठी तो घरीच राहिला असता तर हाता तोंडाची गाठ कशी पडणार होती? अशा वेळी त्या लहानशा पांढऱ्या मांजरीला योहेईचे औदार्य आठवले आणि ती प्रत्येक वेळी आपले पंजे हलवत हलवत काही न काही मदत घेऊन परत येत असे.READ ON NEW WEBSITE