अधिकमास आणि जावई .. (Marathi)
Sangieta.Devkar.Print&Media Writer.
सुधीर ऑफिस वरून आला. सुधा भूक लागली आहे खायला दे म्हणतच आत आला. हा तुम्ही फ्रेश होऊन या देते.सुधा म्हणाली. तिला पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. इतके सजून धजून कुठे चाललीस? अहो ते सावंत काकुं कडे लक्ष्मी व्रता चे उद्यापन आहे त्याच हळदी कुंकू आहे बोलवले आहे. हळदी कुंकू ला इतके नटून जायची काय गरज? सुधीर रागात बोलला. तिच्या डोळयात पाणी आले. गपचूप त्याला नाष्टा दिला. जाऊन येते म्हणत सुधा बाहेर पडली. दहा वर्षे झाली त्यांच्या संसारा ला पण आज ही सुधीर चा स्वभाव जसाच्या तसाच होता. तो कायम सुधा वर संशय घ्यायचा. तिने चांगले दिसायचे नाही मैत्रीण सोबत जास्त बोलायचे नाही किंवा फिरायला ही जायचे नाही. तो कायम तीचा फोन ही चेक करत असायचा. लग्नानंतर दोन वर्षातच सुधा ला त्याच्या स्वभावाची कल्पना आली होती त्यावेळी ती गरोदर होती. मुल झाल्यावर तो सुधारेल अस तिला वाटत होते. आई ला ही गोष्ट तिने सांगितली पण तेव्हा आई बोलली असतो एखाद्याचा स्वभाव हळूहळू कमी होईल नको काळजी करुस. पण सतत सुधीर चे तिला टॉर्चर करणं कसे ही बोलणे ती आजतागायत सहन करत होती कारण पदरी दोन मुलं आणि माहेर ची परिस्थिती जेमतेमच! त्यात तिची वाहिनी खूप खाष्ट तिच्या हातात सगळी घराची सूत्र अशा परिस्थितीत आपले दुखणे आई वडिलांना सांगून अजून त्यांना का त्रास द्यायचा असा विचार सुधा करत असे. मुलां मध्ये आपले मन रमवत राहायची. आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर जगत होती. तिला नोकरी करायची ही परवानगी नवहती.खूप शांत आणि सोशिक अशी सुधा नवऱ्याचा संशयी स्वभाव सहन करत गप होती. त्याला सोडून जाण किंवा घटस्फोट घेणं तिला शक्य नवहते. मुलां साठी ती जगत होती. आज ना उद्या परिस्थिती बदलेल या आशेवर दिवस काढत होती. शक्यतो सुधीर तिला बाहेर जाऊ देत नसे किंवा तो सोबत जात असे आणि सहज जरी कोणी तिच्या कडे पाहिले तरी हा सुधा ला सूनवायचा .ती दिसायला छानच होती म्हणून तो स्वहताला खूप अनसेक्युर फील करत होता. सुधा कोणाच्या प्रेमात वगैरे पडली तर त्याचा कमी पणा होता त्यात .त्याच्या पुरुषार्थाला हे कदापि सहन झाले नसते. पण सुधा आपले घर आणि मुले यातच रमत होती हेच तीच जग होत. ती सावंत काकूंच्या घरून पटकन आली आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. दुसऱ्या दिवशी सुधा च्या आई चा फोन आला की पुढच्या आठवड्या पासून अधिक मास सुरू होत आहे तर तू आणि जावई बापू घरी या. जावयाचा मान पान करायचा असतो ना आणि तुला ही जोडवी घेऊन ठेवली आहेत . सुधा चिडली म्हणाली,आई अग दहा वर्षे झाली माझ्या लग्नाला अजून किती दिवस जावयाचा मान सन्मान सांभाळत बसणार आहेस आणि मुळात तो जावई त्या मान पाना ला लायक तरी आहे काय ग? नुसतं चांगले खाऊ पिऊ घातले कपडालत्ता दिला म्हणजे सुख असत का ग? माझ्या मनाचा विचार कर कधी तरी. मी कोणत्या मनस्तापा तुन जातेय हे तुला माहीत आहे का? सुधा सगळं माहीत आहे ग पण चालीरीती परंपरा नको का जपायला? कसा ही असला तरी जावई आहे तो आमचा. आई मला हे पटत नाही. बास आता इतकं वर्ष दिलास ना मानपान आता नाही. आणि तू त्यांना फोन करणार नाहीस .मी ही काही सांगणार नाही. सुधा पण असे कसे बोलतेस ग. हो आई तुझी मुलगी सासरी सुखी असती ना तर काही तरी अर्थ होता या मानपानाला . बास आता नको काही करुस. असे बोलून सुधा ने फोन ठेवला. आणि अश्रू ना वाट मोकळी करून दिली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.कोणाच्या ही भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही.पण आता अधिक मास सुरू झाला आहे त्या अनुषंगाने हा विचार मनात आला की अधिक मासात जावयाचा मानपान केला जातो पण मला वाटते हा सन्मान द्यायला मुळात ती व्यक्ती लायक हवी ना? काही ठिकाणी अपवाद ही असतो. काही जावई तर अगदी मुला प्रमाणे असतात तसे वागतात ही आणि आपल्या सासु सासरयांची सेवा ही करतात. आपल्या परंपरा रीती रिवाज जरूर पाळाव्यात पण त्या डोळस पणे इतकेच मला म्हणायचे आहे. एका मैत्रिणी च्या अनुभवा वरून ही कथा लिहावी वाटली. संगीता देवकर .प्रिंट & मिडिया रायटर पुणे.READ ON NEW WEBSITE