रहस्यकथा (युवराज कथा) भाग ३ (Marathi)
प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
युवराज हे एक प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत.ते खानदानी,राजघराण्यातील व श्रीमंत आहेत.त्यांचे वय सुमारे पस्तीस आहे .ते अविवाहित आहेत. अशील निर्दोष आहे अशी मनाची खात्री पटल्यानंतरच ते केस घेतात.न्यायालयात जाऊन केवळ वकिली न करता त्यांच्याकडे आलेल्या अशिलाला सोडविण्यासाठी ते गुन्ह्याचा तपास करून खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढतात.शामराव हे त्यांचे दोस्त पोलीस खात्यात इन्स्पेक्टर आहेत.संदेशची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे.संदेशची गुन्ह्याच्या तपासात माहिती गोळा करण्यासाठी बहुमोल मदत होते.तो गुप्तहेर असल्यामुळे त्याचे सर्व क्षेत्रात खबरे व मित्र आहेत.शामराव पोलिस खात्यात असल्यामुळे त्यांचीही युवराज यांना मदत होते.युवराजांचे कल्पनाचातुर्य व संदेशचे त्याच्या गुप्तहेर जाळ्यामार्फत प्रत्यक्ष काम यातून गुन्ह्य़ाची उकल होते.खरा गुन्हेगार सापडल्यामुळे कोर्टात क्वचित जावे लागते.READ ON NEW WEBSITE