शनी शिंगणापूर (Marathi)
संकलित
भारतामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाचे अनेक मंदिरे आहेत. यामधील एक प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिंगणापूर येथे आहे. जगप्रसिद्ध या शनि मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनिदेवाची पाषाण मूर्ती खुल्या आकाशाखाली उघड्यावरच संगमरवराच्या एक चौथर्यावर विराजित आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती उंचीला पाच फुट नऊ इंच आणि लांबीला एक फुट सहा इंच आहे. शनि शिंगणापूरचे महत्त्व शनिदेवाच्या इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या गावातील लोक घरांना कुलूप लावत नाहीत.READ ON NEW WEBSITE