Android app on Google Play

 

स्वयंभू मूर्ती

शनि शिंगणापूर येथे स्थित असलेली शनिदेवाची काळ्या रंगातील पाषाण मूर्ती (शिळा) स्वयंभू मानली जाते. या मूर्तीसंदर्भात एक कथा प्रचलित असून त्यानुसार, ही शिळा एका व्यक्तीला दिसली. शनिदेवाने त्याला आदेश दिला की, ही शिळा एका खुल्या परिसरात स्थापन करून यावर तेलाने अभिषेक केला जावा. देवाचा आदेश मानून त्या व्यक्तीने ही शिळा उघड्यावरच एका चौथर्‍यावर स्थापन केली. तेव्हापासून या मूर्तीची तेल वाहून पूजा केली जाते.