पान ५
कित्येक तिरसट कलेक्टरांचे पुढें धूर्त शिरस्तेदाराची मात्ना चालत नसल्यास ते कांहीं आडमूठ अक्षरशून्य शेतकर्यांचीं प्रकरणें मुख्य सदर स्टेशनच्या ठिकाणी तयार न करितां त्यास गांवोगांव कलेक्टराचे स्वारीमागे पायाला पाने बांधून शिळे तुकडे खात खात फिरावयास लावून त्याचीं हाडे खिळखिळीं करून मस्ती जिरवितात. व कित्येक निवळ अज्ञानी शेतकर्यांच्या अर्ज्या फैलास एकदोन दिवस न लावतां, त्यांच्या प्रतिपक्षाकडून कांहीं चिरीमिरी मिळाल्यास त्या मुळींच गाळून टाकितात. अखेरीस दोन्ही पक्षांपैकीं जास्ती पैसा खर्च करणार्या पक्षास जेव्हां जय मिळतो, तेव्हां एकंदर सर्व गांवकरी लोकांत चुरस उत्पन्न होऊन गावांत दोन तट पडतात. नंतर पोळयाचे दिवशीं बैलाची उजवी बाजू व होळीस अर्धी पोळी कोणी द्यावी, यासंबंधीं दोन्ही तटांमध्यें मोठमोठया हाणामार्या होऊन त्यांतून कित्येकांचीं डोकीं फुटून जखमा जाल्याबरोबर भट ( एकंदर सर्व फौजदारी, दिवाणी वगैरे कज्जे अज्ञानी शेतकर्यांना उपस्थित करण्याचे कामीं कज्जाचे तळाशीं हे कळीचे नारद नाहींत असे फारच थोडे कज्जे सांपडतील ) कुळकर्णी दोन्ही तटवाल्यांस वरकांति शाबासक्या देऊन, आंतून पोंचट पोलिसपाटलास हातांत घेऊन तालुक्यांतील मुख्य पोलिस भुतावळास जागृत करितात. तेव्हां तेथून, आंतून काच्यांनीं पोटे आवळून वरून काळया पिवळया पाटलोनी व बूट, डगल्यापगडयांनीं सुशोभित होऊन, हातीं रंगीबेरंगी टिकोरीं घेतलेल्या बुभुक्षित शिपायांच्या पाठीमागें धापा देत एक दोन झिंगलेले आडमूठहवालदार व जमादार बगलेंत बोथलेल्या तरवारी वेऊन प्रथम गावांत येतांच महार व पोलीसपाटील यांस मदत घेऊन व एकंदर गावांतील दोन्ही पक्षांतील लोकांस पकडून आणून चावडीवर कैद करितात व पहारेकर्याशिवाय बाकी सर्व शिपायी व अम्मलदार अज्ञानी पाटीलसाहेबांचे मदतीनें, मारवाडयाच्या दुकानांतून मन मानेल त्या भावाने व मापाने सिधासामुग्री घेऊन चावडीवर परत येतां येतां, दारूच्या पिठयांत कोणी मेजवान्या दिल्यास, ऐन गुंगीच्या नादांत जेवून गार झाल्यानंतर, थोडीसी डामडौली पूसतपास करून त्यांच्या त्या सर्व कैदी लोकांस मुख्य ठाण्यांत आणून फौजदारासमोर उभे करून त्याच्या हुकुमाप्रमाणे त्याची पक्की चौकशी होईतोंपावेतो त्यास कच्चे कैदेत ठेवितात. यापुढे कैदी शेतकर्यांच्या घरची माणसे आपापल्या बायका-मुलाबाळांच्या अंगावरील किडूकमिडूक मोडून आणलेल्या रकमा फौजदारकचेरींतील कामगारांची समजूत करण्याचे भरीस कसकशा घालितांत, त्यापैकीं कांहीं
मासले येथे दाखवितों. जर एखाद्या पक्षांतील लोकांस जास्ती मोठाल्या जखमा झाल्या असल्यास धूर्त कामगार, कुळकर्ण्याचेद्वारें दुसर्या पक्षाकडून कांहीं रकमा घेवून त्यांच्या त्या सर्व जखमा बर्या होऊन त्यांचा मागमुद्दा मोडेतोंपावेतो तीं प्रकरणें तयार करून माजिस्त्नेटसाहेबाकडे पाठविण्यास विलंब लावतात. कधीं कधीं धूर्त कामगारांच्या मुठी गार झाल्यास ते दुसर्या पक्षांतील मुद्याचे साक्षीदारांनीं त्यांच्या खटल्यांत साक्षीच देऊं नये म्हणून त्यांच्या सावकारास भिडा घालितात. ते कधीं कधीं मुद्याचे साक्षिदारांनीं आपलीं सामाने रुजू करण्याचे पूर्वी त्यास कुळकर्ण्याचेमार्फत नानातर्हेच्या धाकधमक्या देऊन त्यास भलत्या एखाद्या दूर परगांवीं पळवून लावितात. त्यांतून कांहीं आडमूठ अज्ञानी शेकर्यांनीं कुळकर्ण्याचेद्वारें ब्राह्यणकामगारांच्या सूचनांचा अव्हेर करून आपल्या आपल्या साक्षी देण्याकरितां कचेरींत आल्यास, एक तर ते अक्षरशून्य असल्यामुळें त्यांच्या स्मरणशक्त्या धड नसतात व दुसरें त्यांस मागच्यापुढच्या सवालांचा संदर्भ जुळून जबान्या देण्याची स्फूर्ति नसते, यामुळें त्यांच्या जबान्या घेतेवेळीं धूर्त कमगार त्यांस इतके घाबरे करितात कीं, त्यास " दे माय धरणी ठाव " होतो. ते कधी कधीं अज्ञानी शेतकर्यांच्या जबान्या घेतांना त्यांच्या नानाप्रकारच्या चाळकचेष्टा करून त्यांस इतके घाबरे करितात कीं, त्यांनीं खरोखर जे कांहीं डोळयांनीं पाहिलें व कानांनीं ऐकलें असेल, त्याविषयीं इत्थंभूत साक्ष देण्याची त्यांची छातीच होत नाहीं. याशिवाय कित्येक धाडस कामगारांचे हातावर भक्कम दक्षिणा पडल्या कीं. ते कुळकर्ण्यांचे तयार करवून मन मानेल त्या त्या अज्ञानी शेतकर्यास दंड अथवा ठेपा करवितात. त्या वेळीं त्या सर्वांजवळ दंड भरण्यापुरत्या रकमा नसल्यामुळें, त्यांपैकीं बहुतेक शेतकरी, आपले इष्टमित्न, सोयरेधायर्यांपासून उसन्या रकमा घेऊन दंडाच्या भरीस चालून घरोघर आल्याबरोबर, उसन्या रकमा घेतलेल्या ज्यांच्या त्यांस परत देऊन इतर ठेपा झालेल्या मंडळीस तुरुंगातून सोडविण्याकरितां अपिलें लावण्यापुरत्या रकमा सावकारापाशीं कर्ज मागूं लागल्यास आमच्या सरकारच्या पक्षपाती शेतकर्यांचे कायद्यामुळे शेतकर्यास कोणी अब्रूवाले सावकार आपल्या दाराशीं उभेसुद्धां करीत नाहींत. कारण आपले पदरचे पैसे शेतकर्यास कर्जाऊ देऊन, त्यानंतर निवाडे करून घेतेवेळीं खिसे चापसणार्या आडमूठ शूद्र बेलिफांच्या समजुती काढून सामानें रुजूं करून आणलेल्या अज्ञानी शेतकर्यांसमक्ष भर कोडतांत सावकारास फजिती करून घ्यावी लागते. कित्येक तरूण गृहस्थांनीं नानाप्रकारचीं कायदेपुस्तकें राघूसारखीं तोंडपाठ केल्यामुळें त्यांच्या परीक्षा उतरतांच आमचें भोळसर सरकार त्यांस मोठमोठया टोलेजंग न्यायाधिशांच्या जागा देतें. परंतु हे लोक आपल्या सार्वजनिक मूळ महत्त्वाचा बांधवी संबंध तोडून, आपण येथील भूदेवाचे औरस वारसपुत्न बनुन, कोडतांत एकंदर सर्व परजातींतील वयोवृद्ध, वडील दुबळया गृहस्थांस तुच्छ मानून त्यांची हेळसांड करितात. प्रथम हे सरकारी रिवाजाप्रमाणें एकंदर सर्व साक्षीदार वगैरे लोकांस कोडतांत दहा वाजतां हजर होण्यास सामानें करून आपण सुमारें बारा वाजतां कोडतांत येऊन, तेथील एखादे खोलींत तास अर्धा तास उताणे पालथे पडून नंतर डोळे पुशीत बाहेर चौरंगावरील खुर्चीच्या आसनावर येऊन वसल्यबरोबर, खिशांतील पानपट्टी तोंडांत घालून माकडाचे परी दांत विचकून चावतां चावतां पायावर पाय ठेवून, पाकेटांतील डब्या बाहेर काढून तपकिरीचे फस्के नाकांत ठासतां ठासतां खालीं बसलेल्या मंडळीवर थोडीशी वांकडी नजर टाकून डोळे झांकीत आहेत, इतक्यांत तांबडी पगडी, काळी डगलीं, पाटलोणबुटांनीं चष्क बनून आलेल्या प्लीडरवकिलांनीं त्यांच्यापुढे उभे राहून मिशांवर ताव देऊन " युवर आनर " म्हणण्याची चोपदारी ललकारी ठोकल्याबरोबर हे भूदेव जज्जसाहेब, आपल्या पोटावर हात फिरवून आपले जातभाऊ वकिलास विचारतात कीं, " आज एका खुनी खटल्याच्या संबंधानें आम्हांस सेशनांत हाजर होणे आहे. सवव आपण मेहेरवान होऊन आमचे मार्फतचे येथील कज्जे आज तहकूब ठेवावेत." हें म्हणताच न्यायाधिशांनी माना हलवून गुढया दिल्याबरोबर वकीलसाहेब गाडयाघोडयावर स्वार होऊन आपला रस्ता धरितांच न्यायाधीश आपल्या कामाची सुरवात करितात. याविषयीं येथे थोडेसे नमुन्याकरितां घेतों. कित्येक भूदेव न्यायाधीश आपल्या ऊंच जातीच्य तोर्यांत किंवा कालच्या ताज्या अमलाच्या झोकात, न्याय करितांना, बाकी सर्व जातींतील बहुतेक लोकांबरोबर अरेतुरेशिवाय भाषणच करीत नाहींत. कित्येक अक्कडबाज गृहस्थांनीं कोडतांत आल्याबरोबर या राजबिंडया भूदेवास लवून मुजरे केले नाहींत, तर त्यांच्या जबान्या घेतेवेळीं त्यांस निरर्थक छळितात. तशांत ब्राह्यणी धर्माच्या विरूद्ध एखाद्या ठिकाणीं समाज उपस्थित होऊन त्यास सामील असणार्यांपैकीं थोर गृहस्थास कोडतांत हजर होण्य़ास थोडासा अवेळ झाला कीं, त्यांचा सूड ( येथे सुधारणा करणार्या लोकांनी सरकारच्या नांवाने कां शिमगा करावा ? ) उगविण्याकरितां त्यांच्या श्रीमंतीची अथवा त्याच्या वयोवृद्धपणाची काडीमात्न परवा न करितां, त्यांची भर कोडतांत जबान्या घेतेवेळीं रेवडी रेवडी करून सोडितात. त्यांतून हे भूदेव बीद्धधर्मी मारवाडयांची फटफजिती व पट्टाधूळ कसकशी उडवितात, हें जगजहिर आहेच. कधीं कधीं ह्या छद्मी भूदेवाच्या डोक्यांत वादीप्रतिवादींच्या बोलण्याचा भावार्थ बरोबर शिरेनासा झाला, म्हणजे हे स्नानसंध्याशील, श्वानासारखे चवताळून त्याच्या ह्लदयाला कठोर शब्दांनीं चावे घेतात. ते असे कीं -- " तू बेवकूब आहेस, तुला वीस फटके मारून एक मोजावा. तू लालतोंडयाचा भाऊ तीनशेंडया मोठा लुच्चा आहेस." त्यावर त्यांनीं कांहीं हूं चूं केल्यास त्या गरिबाचे दावे दद्द करितात. इतकेंच नव्हे परंतु या खुनशी न्यायाधिशांच्या तबेती गेल्या कीं, सर्व त्यांच्या जबान्या घरीं नेऊन त्यांतील कांहीं मुद्यांचीं कलमें गाळून त्याऐवजीं दुसर्या ताज्या अबान्या तयार करवून, त्यावर मन मानेल तसे निवाडे देत नसतील काय ? कारण हल्लीं कोणत्याही जबान्यांवर, जबान्या लिहून देणारांच्या सह्या सथवा निशाण्या करून घेण्याची वहिवाट अजी काढून टाकली आहे. सारांश, बहुतेक भूदेवन्यायाधीश मन मानेल तसे घाशीराम कोतवालासारखे निवाडे करूं लागल्यामुळें कित्येक खानदान चालील्या सभ्य सावकारांनीं आपला देवघेवीचा व्यापार बंद केला आहे. तथापि बहुतेक ब्राह्यण व मारवाडी सावकार सदरचे अपमानाचा विधिनिषेध मनांत न आणिता कित्येक अक्षरशून्य शेतकर्यांबरोबर देवघेवी करितात. त्या अशा कीं, प्रथम ते, अडचणींत पडलेल्या शेतकर्यांस फुटकी कवडी न देतां. त्याजपासून लिहून घेतलेल्या कर्जरोख्यांवरून त्याजवर सरकारी खात्यांतून हद्दपार झालेल्या खंगार पेनशनर्स लोकांनीं सुशोभित केलेल्या लवादकोर्टांत हुकुमनामे करून घेऊन नंतर व्याजमनुती कापून घेऊन बाकीच्या रकमा त्यांच्या पदरांत टाकितात. हल्लीं कित्येक ब्राह्यण व मारवाडी, सावकार नापतीच्या अक्षरशून्य शेतकर्यास सांगतात कीं," सरकारी कायद्यामुळें तुम्हांला गहाणावर कर्जाऊ रुपये आम्हांस देता येत नाहींत, यास्तव तुम्ही जर आपलीं शतें आम्हास खरेदी करून द्याल, तर आम्ही तुम्हास कर्ज देऊं व तुम्ही आमचे रुपयांची फेड केल्याबरोबर आम्ही तुमची शेतें परत खरेदी करून तुमच्या जाब्यांत देऊं," म्हणून शपथा घेऊन बोल्या मात्न करितात, परंतु या सोंवळया व अहिंसक सावकरापासून कुटुंबवत्सल अज्ञानी भोळया शेतकर्यांची शेते क्वचितच परत मिळतात. याशिवाय हे अट्टल धर्मशील सावकार, अक्षरशून्य शेतकर्यांस कर्ज देतांना त्यांचे दुसरे नानाप्रकारचें नुकसान करितात. सदरील सावकार अक्षरशून्य शेतकर्यांवर नानातर्हेच्या बनावट जमाखर्चाच्या वह्यांसहित रोख्यांचे पुरावे देऊन फिर्यादी जेव्हां ब्राह्यण मुनसफांच्या कोर्टांत आणितात, तेव्हां अज्ञानी शेतकरी आपणास खरे न्याय मिळावेत म्हणून आपले डागडागिने मोडून, पाहिजे तितक्या रकमा कज्जाच्या भरीस घालतात. परंतु त्यांस त्यांचे जातीचे विद्वान वशिले व खरी मसलत देणारे सूज्ञ गृहस्थ वकील नसल्यामुळे अखेर त्यावरच उलटे हुकुमनामे होतात, तेव्हां ते विचारशून्य, चार पोटबाबू बगलेवकिलांचे अपिले करितात; परंतु वरिष्ठ कोडतांतील बहुतेक युरोपियन कामगार ऐषआरामांत गुंग असल्यामुळें अज्ञानी शेतकर्यांस एकंदर सर्व सरकारी खात्य़ांतील ब्राह्यणकामगार किती नाडितात, याविषयीं येथें थोडेस मासलेवाईक नमुने घेतों, ते येणेंप्रमाणें :- प्रथम धूर्म वकील अज्ञानी शेतकर्यापासून स्टांपकागदावर वकीलपत्नें व बक्षिसादाखल कर्जाऊ रोखे लिहून घेतांच त्यांजपासून सरकार व मूळ फिर्यांदीकरितां स्टांप वगैरे किरकोळ खर्चाकरितां अगाऊ रोख पैसे घेतात. नंतर कित्येक धूर्त वकील, शिरस्तेदारांचे पाळीव रांडांचे घरीं शिरस्तेदारसाहेबांचे समोर त्यांचीं गाणीं करवून त्यांस शेतकर्यांपासून कांहीं रकमा देववितात.
अज्ञानी शेतकर्यांपासून आडवून लांच खाणार्या सरकारी कामगारास व लाचार झाल्यामुळें लांच देणार्या अक्षरशून्य शेतकर्यांस कायदेशीर क्षिक्षा मिळते. हत्यारबंद पोलिसांच्या उरावर दरवडे घालणार्या भट फडक्या रामोशास व लाचार झाल्यामुळें फडक्याबरोबर त्याच्या पातीदार भावास शिळेपाके भाकरीचे तुकडे देणार्या भित्न्या शस्त्नहीन कंगाल शेतकर्यांचे बोडक्यावर जशी कायदेशींर पोलीसखर्चाची रक्कम लादली जाते, व शेतकर्यांचे घरांत चोर्या करणार्या सर्व जातींच्या चोरटयांस जशी कायदेशीर शिक्षा मिळते, त्याचप्रमाणें जे शेतकरी आपल्या पहिल्या झोपेच्या भरांत असतां त्यांच्या घरांत चोरांनीं चोर्या केल्या असतां त्या
शेतकर्यांसही कायदेशीर शिक्षां का नसावी ?! एवढा कायदा मात्न आमचे कायदेकौन्सिलांनीं करून एकंदर सर्व पोंचट पोलिसांचा गळा मोकळा केल्याबरोबर आमचे न्यायशील सरकारचे स्वर्गाजवळच्या सिमल्यास घंटानाद होईल.