पान ३
सदरीं लिहिलेल्या एकंदर सर्व भटब्राह्यणांच्या धर्मरूमी चरकांतून शेतकर्यांची मस्ती जिरली नाहीं, तर भटब्राह्यण बदरीकेदार वगैरे तीर्थयात्नेचे नादीं लावून शेवटीं त्यांस कशीप्रयागास नेऊन तेथें त्यास हजारों रुपयास नागवून त्यांच्या दाढयामिशा बोडून त्यांस ’ त्यांचे घरी आणून पोहोचवितात. व शेवटी त्याजपासून मांवद्याचे निमित्ताने मोठमोठाली ब्राह्यणभोजने घेतात. अखेर शेतकर्याचे मरणानंतर भटब्राह्यण स्मशानी कारटयांची सोंगे घेऊन त्यांचे पुत्नाकडून दररोज नानाप्रकारचे विधि करवून त्याचे घरीं दररोज गरुडपुराणे वाचन, दहावे दिवशी धनकवडी वगैरे डिपोवरील वतनदार कागभटजीस कॉव कॉ म्हणून, पिंडप्रयोजनाचा मानपान देऊन त्याजपासून गरुडपुराणाचे मजुरीसहित निदान तांबे, पितळया, छत्न्या, काठया, गाद्या व जोडे दान घेतात. पुढे शेतकर्यांची एकंदर सर्व मुले मरेपावेतो त्याजपासून मयताचे श्राद्धपक्षास पिंडदाने करवितेवेळी त्याचे ऐपतीवे, मानाने शिधे व दक्षिणांची वर्षासने घेण्याची वहिवाट त्यांनीं ठेविली आहे. ती ही कीं, शेतकरी यजमानास मोठी लाडीगोडी लावून कोणास कारभारी, कोणास पाटील, कोणास देशमुख वगैरे तोंडापुरत्या पोकळ पदव्या देऊन, त्यांजपासून भटब्राह्यण आपले मुलामुलींचे लग्न वगैरे समयीं केळीच्या पानांसह भाजीपाले फुकट उपटून, त्यांजवर आपली छाप ठेवण्याकरितां शेवटीं एखादे प्रयोजनांत त्या सर्वांस आमंत्नणें करून मांडवांत आणून बसवितात व प्रथम आपण आपले जातवाल्या स्त्नीपुरुषांसह भोजनें सारून उठल्यानंतर तेथील सर्व एकंदर पात्नांवरील खरकटयाची नीटनेटकी प्रतावर निवड करून त्यांस आपले शूद चाकरांचे पंक्तीस बसवून तीं सर्व खरकटीं मोठया काव्या-डाव्यानें नानातर्हेचे सोंवळेचाव करून दुरूनच वाढितात; परंतु बाजारबसव्या काडयामहालांतील शेतकर्यांच्या हंगामी वेसवारांडांच्या मुखास चुंबनतुंबडया लावून त्यांच्या मुखरसाचे धुडके घेण्याचा काडीमात्न विधिनिषेध न करतां, ते आपले यजमान शेतकर्यांस इतके नीच मानितात कीं, ते आपल्या अंगणांतील हौदास व आडास शेतकर्याला स्पर्शसुद्धां करूं देत नाहींत; मग त्यांच्याशीं रोटी व बेटीव्यवहार कोण करितो ?
एकंदर सर्व सदरचे हकिगतीवरून कोणी अशी शंका घेतील कीं, शेतकरी लोक आज दिवसपावेतों इतके अज्ञानी राहून भटब्राह्यणांकडून कसे लुटले जातात ? यास माझें उत्तर असें आहे कीं, पूर्वी मूळच्य आर्य भटब्राह्यणांचा या देशांत अम्मल चालू होतांच त्यांनीं आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकर्यास विद्या देण्याची अटोकाट बंदी करून, त्यास हजारों वर्षे मन मानेल तसा त्नास देऊन लुटून खाल्लें, याविषयीं त्यांच्या मनुसंहितेसारखे मतलबी ग्रंथांत लेख सांपडतात. पुढें कांहीं काळानें चार निःपक्षपाती पवित्न विद्वानांस ब्रह्यकपटाविषयीं बरें न वाटून त्यांनीं बौद्ध धर्माची स्थापना करून, आर्य ब्राह्यणांच्या कृत्निमी धर्माचा बोजंवार करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकर्यांस आर्यभटांचे पाशांतून मुक्त करण्याचा झपाटा चालविला होता. इतक्यांत आर्य मुगुटमण्यांतील महाधूर्त शंकराचार्यांनीं बौद्धधर्मी सज्जनांबरोबर नानाप्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानांत मोड करण्याविषयीं दीर्घ प्रयत्न केला. तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तिलप्राय धोका न बसतां उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त वढती होत चालली. तेव्हां अखेरीस शंकराचार्यांनें तुर्की लोकांस मराठयांत सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोरानें येथील बौद्ध लोकांचा मोड केला. पुढें आर्य भटजींस गोमांस व मद्य पिण्याची बंदी करून, अज्ञानी शेतकरी लोकांचे मनावर वेदमंत्न जादूसहित भटब्राह्यणांचा दरारा बसविला.
त्यावर कांहीं काळ लोटल्यानंतर हजरत महमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्य भटांचे कृत्निमि धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीचे प्रहारांनीं विध्वंस करून, शूद शेतकर्यांस आर्यांचे ब्रह्यकपटांतून मुक्त करूं लागल्यामुळें, भटब्राह्यणांतील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरींतील कांहीं कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेंत विवेकसिंधु व ज्ञानेश्र्वरी या नांवाचे डावपेची ग्रंथ करून शेतकर्यांचीं मनें इतकी भ्रमिष्ट केलीं. कीं, ते कुराणासहित महमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करूं लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नांवाचा साधु शेतकर्यांमध्यें निर्माण झाला. तो शेतकर्यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्यणांच्या कृत्निमी धर्माची उचलबांगडी करून शेतकर्यास त्यांच्या पाशांतून सोडवील, या भयास्तव भटब्राह्यणांतील अट्टल वेदांती रामदासस्वामींनीं महाधूर्त गागाभटाचे संगन्मत्तानें अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचें सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाहीं. पुढें शिवाजी राजाचे पाठीमागें त्याच्या मुख्य भटपेशव्या सेवकानें शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटकेंत ठेविलें. पेशव्याचे अखेरीचे कारकीर्दीत त्यांनीं गाजररताळांची वरू व चटणीभाकरीवर गुजारा करणार्या रकटयालंगोटया शेतकर्यापासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यांतून, त्यांच्या शेतीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरणें वगैरे बांधकामाकडे एक छदाम खर्च न घालतां, पर्वतीचे रमण्यांत वीसवीस पंचवीसपंचवीस हजार भटब्राह्यणांस मात्न शालजोडया वगैरे बक्षिसें देण्याचा भडिमार उठविला व हमेशा पेंढार्यांनीं लुटून फस्त केलेल्या शेतकर्यांपासून
सक्तीनें वसूल केलेल्या जामदारखान्यांतून अज्ञानी शेतकर्यांस निदान प्राकृत विद्या देण्याकरितांही दमडीच्या कवडया खर्ची न घालतां, ब्राह्यणांचीं उडवून, पर्वतीचे रमण्यांतील कोंडवाडयांत मात्न एकंदर ओगराळयांनीं मोहरापुतळयांची खिचडी वाटत नाहीं. कारण रावबाजी हे अस्सल आर्य जातीचे ब्राह्यण होते. सबव तसल्या पक्षपाती दानशूरानें पर्वतीसारख्या एखाद्या संस्थानांत शेतकर्यांपैकीं कांहीं अनाथ रांडमुंडींची व निराश्रित पोरक्या मुलीमुलांची सोय केली नाहीं, फक्त आपल्या
जातींतील भटब्राह्यण, गवई पुजारी व चारपांच हिमायती अगांतुक भटब्राह्यणांस दररोज प्रातःकाळीं अंघोळीस ऊन पाणी व दोन वेळां प्रतिदिवशीं पहिल्या प्रतीचीं भोजनें मिळण्याची सोय करून, हरएक निरशनास दूध पेढे वगैरे फराळाची आणि पारण्यांस व एकंदर सर्व सणावारांस त्यांचे इच्छेप्रमाणें पक्वान्नांची रेलचेल उडवून त्या सर्वांस अष्टोप्रहर चौघडयासहित गवयांचीं गाणींबजावणीं ऐकत बसवून मौजा मारण्याची यथास्थित व्यवस्था लावून ठेवली आहे.
या वहिवाटी आमचें भेकड इंग्रज सरकार जशाच्या तशाच आज दिवसपावेतो चालू ठेवून त्याप्रीत्यर्थ कष्टाळू शूद्रादि अतिशूद्र शेतकर्यांचे निढळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यांतून हजारों रुपये सालदरसाल खर्ची घालते.
सांप्रत कित्येक शूद्रादि अतिशूद्र शेतकरी ख्रिस्ति धर्म स्वीकारून मनुष्यपदास पावल्यानें, भटब्राह्यणांचें महत्त्व कमी होऊन त्यांना स्वतः मोलमजुरीचीं कामें करून पोटें भरण्याचे प्रसंग गुदरत चालले आहेत, हें पाहून कित्येक धूर्त भटब्राह्यण खुळया हिंदुधर्मास पाठीशीं घालून नानाप्रकारचे नवे समाज उपस्थित करून त्यांमध्यें अपरोक्ष रितीनें महमदी व खिस्ति धर्माच्या नालस्त्या करून त्यांविषयीं शेतकर्यांचीं मनें भ्रष्ट करीत आहेत. असो. परंतु पुरातन मूर्तिपूजोतेजक ब्रह्यवृंदांतील काका व सार्वजनिक सभेचे पुढारी जोशीबुवा यांनीं हिंदुधर्मांतील जातीभेदाच्या दुरभिमानाचें पटल आपल्या डोळयांवरून एकीकडे काढून शेतकरी लोकांची स्थिति पाहिली असती तर, त्यांच्यानें एकपक्षीय धर्माच्या प्रतिबंधानें नाडलेल्या बिचार्या दुदैंवी शेतकर्यांस अज्ञानी म्हणण्यास धजवलें नसतें; व जर ते आमच्या इंग्रज सरकारास शेतकर्यांवर होणार्या धर्माच्या जुलमाची यथातथ्य माहिती करून देते, तर कदाचित त्यास दयेचा पाझर कुटून तें भूदेव भटब्राह्यण कामगारांची शूद्रास विद्या देण्याच्या कामांत मसलत न घेतां, त्यांस ती देण्याकरितां निराळे उपाय योजितें.
सारांश, पिढीजात अज्ञानी शेतकर्यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्यणांकडून इतकी हानि होते कीं, त्यांजला आपलीं लहान मुलेंसुद्धां शाळेंत पाठविण्याचें त्नाण उरत नाहीं व याशिवाय आर्यभटॠषींनीं फार पुरातन काळापासून " शूद्र शेतकर्यास ज्ञान देऊं नये " म्हणून सुरूं केलेल्या वहिवाटीची अज्ञानी शेतकर्यांचे मनावर जशीची तशीच धास्ती असल्यामुळे त्यांना आपलीं मुलें शाळेंत पाठविण्याचा हिय्या होत नाहीं आणि हल्लींचे आमचे दयाळू गव्हनंर जनरलसाहेबांनीं पाताळचे अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यांतील महाप्रतापी जॉर्ज वाशिंगटन ताताचा कित्ता घेऊन, येथील ब्राह्यण सांगतील तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे मानणार्या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस, विद्वान भटब्राह्यणांप्रमाणेंच म्युनिसिपालिटींत आपले वतीनें मुखत्यार निवडून देण्याचा अधिकार दिला आहे खरा, परंतु या प्रकरणांत भटब्राह्यण आपले विद्येचे मदांत सोवळया ओवळयाच्या तोर्यांनीं अज्ञानी शूद्रादि अतिशूद्र लोकांशीं छक्केपंजे करून त्यांना पुढे ठकवूं लागल्यास आमचे दयाळू गव्हर्नर जनरलसाहेबांचे माथ्यावर कदाचित् अपयशाचे खापर न फुटो, म्हणजे भटब्राह्यणांचें गंगेंत घोडे नाहले, असे आम्ही समजू.