Get it on Google Play
Download on the App Store

संत बहिणाबाईचे अभंग

मजवरी दृष्टी कृपेची ओतिली । प्रेमाची गुंतली माय जैसी ॥ १ ॥

अंतरींची पूजा घेऊनी जयराम । गेला तो सप्रेम स्वस्थाना ॥ २ ॥

उगाची बैसला आसनीं समस्त । करोनियां स्वस्थ चित्तवृत्ति ॥ ३ ॥

तव कांहीं एक अपूर्व वर्तलें । तुकारामें दिलें दर्शनासी ॥ ४ ॥

केला नमस्कार भेटुनी आनंदें । अत्यंत आल्हादें स्वामी सखा ॥ ५ ॥

मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं ॥ ६ ॥

मज म्हणे आलों जयराम भेटीसी । तुजही मानसीं ओळखिलें ॥ ७ ॥

तुम्ही आतां येथें नको राहों कदा । आत्मज्ञानबोधा न संडी वो ॥ ८ ॥

बहिणी म्हणे दर्शन दुसरें । मनाच्या व्यापारें तुकोबाचें ॥ ९ ॥

संत बहिणाबाईचे अभंग

संत बहिणाबाई
Chapters
संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग गोष्ट सदुसष्ठावी