गाढव आणि कावळा
एकदा एका गाढवाच्या पाठीवर एक कावळा बसला व त्याला चोचीने टोचू लागला. त्याच्या त्रासातून वाचण्यासाठी गाढवाने आपले अंग हालविण्यास सुरुवात केली. आणि तो मोठ्याने ओरडू लागला.
हे पाहून तिथेच असलेला एक लांडगा मनाशीच म्हणाला,
'हे लोक किती अन्यायी आहेत. या कावळ्याच्या जागी मी असतो तर लोकांनी माझा पाठलाग करून मला ठार मारलं असतं. पण हा कावळा जे करतोय त्याला लोक नुसते हसताहेत.
तात्पर्य
- सारख्याच अपराधाला, कमीअधिक शिक्षा होऊ शकते.