कोल्हा आणि खेकडा
समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि तो खेकड्याला मारून खाऊ लागला. तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला, 'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ? नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !'
तात्पर्य
- ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.