संग्रह २
देवघ्ररात तेवतो नंदादिप समाधानाचा
--- च नाव घेते आशिर्वाद मागते अखंड सौभाग्याचा
शब्दा शब्दानी बनते वाक्य
वाक्या वाक्यानी बनते कविता
.....माझे सागर मी त्यांची सरिता
जशी आकाशात चंद्राची कोर .....
पती मिळायला माझे नशीब थोर
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
मि देतो ...... ला श्रिखंड चा घास
गोर्या गोर्या हातावर रेखाटली मी सुबक मेंदी,
....चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.....च नाव आहे लाख रुपये तोळा
चांदीच्या ताटात फणसाचे गरे .....
राव दिसतात बरे पण वाकतील तेव्हा खरे