Get it on Google Play
Download on the App Store

स्वातंत्र्याचा मार्ग

त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाअीना ।।
-तुकाराम

अेक-दीड वर्शापूर्वी जेव्हा महात्माजींनी प्रसिध्द केले की, आता आपण राजकारणात न पडता खादीच्या विधायक कार्यक्रमासच वाहून घेणार, तेव्हा त्यांच्या वेडगळ नि गमाअू राजकारणास कंटाळलेल्या नि त्या सावळागोंधळाच्या मागे लागल्याने राजकारणाचा गेल्या सहा वर्शात जो बोजवारा अुडाला नि त्याने स्वदेषाची जी भयंकर दिषाभूल झाली ती पाहून अत्यंत दुःखित झालेल्या प्रत्येक देषभ७ास थोडे तरी हायसे वाटले होते. वाटले होते की, आता तरी यापुढे महात्माजी त्यांच्या ज्ञानाबाहेर, त्यांच्या बुध्दीबाहेर नि त्यांच्या ष७ीबाहेर, असलेल्या राजकारणाच्या क्षेत्रात नसती अुठाठेव करून नि अहिंसा, असहकारिता विधायक कार्यक्रम अित्यादी भाराभर पोकळ षब्दांस चघळीत बसून राश्टंातील तरूण पिढीचा तेजोभंग करण्याचा देषघातक व्यापार करण्याचे सोडून आपला चरखा बरा की आपण बरे, असे वर्तन ठेवतील. पण पाहावे तो ‘राजकारणात आपण पडणार नाही’ हा निष्चय प्रसिध्द करूनही पुन्हा आपल्या राश्टंीय सभेत अुपस्थित राहून षक्यतो आपल्या त्या पूर्वीच्या वेडगळ कार्यक्रमास अुचलून धरण्यापासून ते नागपूरच्या सत्याग्रहाच्या प्रकरणी लिहिलेली भिकार पत्रे धाडण्यापर्यंत गांधीजींनी राजकारणात येता जाता ढवळाढवळ करण्याचे काम चालूच ठेवले आहे.

कारण त्यांनी ‘मी राजकारणात पडणार नाही’ म्हणून जे म्हटले ते देखील जेव्हा निरूपाय झाला तेव्हाच म्हटलेले होते. स्वराज्यपक्ष राश्टंीय सभेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतून अहमदाबादाच्या आॅ. अिं. कांॅ. क. च्या सभेतून अुठून गेले असताही मोठया तोन्́याने गांधीजींनी म्हटले होते, ‘चिंता नाही, नुसती खोगीरभरती हवी कषाला? दोन अनुयायी अुरले तरी पुरे!’ परंतु पढु े जेव्हा पुरते दोन अनुयायीदेखील असे खंबीर मिळेनात की, ज्यांच्या जोरावर राश्टंीय सभेस खादीप्रचारिणी सभा बनवून नि विधिमंडळात सरकारी विपक्षास आपले राज्य वाटेल तसे हाकण्यास मार्ग निश्कंटक करून देअून आपणास कृतकृत्य होता येअील, तेव्हा मग पाय लटपटू लागले. त्या बैठकीतच महंमदअल्लींची नि गांधीजींची ती रडारड, ती हप्́ी निराषेची आसवे नि षेवटची ती षरणागती ही ज्यांच्या ध्यानात आहेत, त्यांच्या हे तेव्हाच लक्षात येअील की, गांधीजींचा राजकारणातून पाय जेव्हा अुखडला गेला तेव्हाच, मी आता राजकारणाच्या क्षेत्रात पाय टाकीतच नाही म्हणून ते म्हणू लागले. मी क्रांतीकारकांस नामषेश करण्यासाठी बंगाल्यात जात आहे म्हणून अगडबंब प्रतिज्ञा करून ते सत्कृत्य करण्यासाठी हा साधुपुरूश सरकारच्या आषीर्वादासह बाहेर पडला. पण तीन महिने जीवाचा आटापिटा करूनही बंगाल्यातील राज्यक्रांतीच्या गुप्त चळवळींचा गळा घोटणे षक्य झाले नाही. तिकडे विधिमंडळात पूर्वीचे सर्व असहकारितावादी षिरले. हिंदू संघटनाच्या प्रचंड चळवळीचा अुदय होअून त्या खिलाफतीच्या आफतीचे प्रेत अेकदाचे जाळून टाकले गेले, अषा रीतीने क्रांतिकारकांत किंवा विधिमंडळांत, हिंदूत किंवा मुसलमानांत कोठेच कोणी विचारीत नाहीसे झाल्यावर मग जो संन्यास त्यांना घ्यावाच लागला होता, तो राजकारणाचा संन्यास आपण होअून घेण्याचा बहाणा करण्यात आला.

पण बळाबळाने ज्यास संन्यास देण्यात येतो त्या सर्व संन्याषांची जी दषा होते, तीच गांधीजींचीही होअून ते खादीकार्यात जरी गढलेले दिसत होते, तरी थोडा वाव मिळताच राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी त्यांचे मन सारखे चुळबूळ करीत आहे, ही गोश्ट मागे अनेक वेळा अुघडकीस आली होतीच. परंतु त्यांनी जेव्हा राजकारणात काही काळ पडत नाही म्हणून मागे म्हटले तेव्हाच, राश्टंहिताच्या प́श्टीने कर्तव्य असले तरी ते करताना मनास दुःख देणारे असे त्यांच्या देषविघातक राजकारणावर टीका करण्याचे कार्य, आपणास पुन्हा हाती घ्यावे लागणार नाही म्हणून आम्हास आनंदच झाला असल्याने, आम्ही गांधीजींच्या असहकारी भाशेच्या नि अहिंसात्मक सत्याग्रह अित्यादी षब्दांच्या अुच्चारासरषी मधून मधून येणान्́या या फेपन्́याच्या झटक्यांकडे दुर्लक्षच करीत गेलो. परंतु परवा त्यांनी नागपूरच्या सत्याग्रहाच्या प्रकरणी जी पत्रे नि ‘यंग अिंडिया’त जे लेख लिहिले आहेत, त्यांत त्यांत त्यांनी आयती तिरस्कार्य विधाने केली त्यांचा समाचार घेणे आता अगदी अपरिहार्यच झालेले असल्याने या विशारी तल्̈वज्ञानाचा साप आपली फडा पुन्हा वर करण्याच्या आधीच त्यास ठेचून टाकण्याचा प्रयत्न करणे प्राप्त होत आहे.

तत्वज्ञान कसले, ते तत्वज्ञान आहे? तत्वज्ञानचे गाढ अज्ञान हेच त्यातील अनन्य तत्व आहे. सत्याग्रहाची मीमांसा करताना हे साबरमतीचे श्रमण म्हणतात, ‘जो सत्याग्रही असेल तो षस्त्र घेअीलच कषाला? तो सत्यासाठी स्वतः काही अेक प्रतिकार न करता स्वतःचे बलिदान देअील. अषा सत्याग्रहालाच अहिंसात्मक सत्याग्रह म्हणता येअील!’ होय का? पण आपण अहिंसेची नुकतीच अेक व्याख्या केली होती ती अितकी ताजी आहे की, आपण पूर्वी काय बोललो होतो हे प्रसंग पडताच पूर्णपणे विसरून जाण्याची किंवा ती अेक पहाडी चूक झाली म्हणून स्वतास मूर्ख घेण्यास न कचरण्याची विसरभोळी कला ज्या आपणास अुत्कृश्टपणे अवगत आहे. त्या आपणासदेखील ती नाकारता किंवा विसरता येणे षक्य नाही. पिसाळलेली कुत्री मारावी किंवा नाही, का त्यांनाही घरजावयासारखे पाहुणचार करीत पोषीत बसणान्́या नि येत्या जात्या माणसास चावून मारू देणान्́या अहिंसेचे पुण्य संपादन करावे. या प्र९ााचे अुल्̈ार देताना आपण सांगितले होतेत की, अधिकतर अहिंसा टाळण्यासाठी जी अल्प हिंसा अपरिहार्यपणे करावी लागते ती धम्र्य होय नि त्याप्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्यांस बंदुकीच्या गोळया घालून जेव्हा मारण्यात आले, तेव्हा जैन समाजातील हजारो लोकांनी सभा भरवून आपला तीव्र निशेध करून आपल्यास ‘महात्मा’ म्हणण्यासही बंदी केली; तथापि आपण हिंसेची ती केलेली व्याख्या परत घेतली नाही किंवा त्या पिसाळलेल्यास बंदुकीने मारण्याचा निशेध केला नाही.

पण आता तुम्ही जे पत्रात लिहिलेत की, ‘सत्याग्रही षस्त्र असे कधी धरणारच नाही. त्याला नुसते सत्य आचरीत मरावयाचे तेवढे माहीत!’ त्यावरून तर पिसाळलेल्या कुत्र्यांस मारण्यासाठी देखील सत्याग्रही बंदुक किंवा कोणतेही षस्त्र घेणार नाही असे सिध्द होते! पिसाळलेले कुत्रे चावल्यावर तो सत्याग्रहीही जेव्हा पिसाळेल तेव्हा तो जो काय दातांचा अुपयोग करील तेवढाच षस्त्राग्रह मात्र सत्याग्रहाच्या पवित्र कक्षेत येअू षकतो! पिसाळलेल्या कुत्र्यांषी प्रसंग पडला असता त्यांचा प्रतिकार करणे म्हणजे षस्त्र न घेता त्यांच्यासमोर अुभे राहून त्यांस नुसते म्हणत रहावयाचे की, ‘अहो पिसाळलेल्या कुत्रोजी! चावणे असत्य आहे. मला चावू नका. याअुपर चावत असालच तर हा मी सत्याग्रही वीर तुम्ही चावत असताना अेक पाअुलभर देखील मागे न होता किंवा हाती षस्त्र घेअून तुमचा प्रतिकार न करता तसाच्या तसाच चावून घेतो नि तुम्हास अितरांना असेच चावत फिरण्यास मोकळे सोडतो!’ याचे नाव षुध्द सत्याग्रह!

जेव्हा अहिंसेची व्याख्या गांधीजींनी पिसाळलेल्या कुत्र्यांविशयी लिहिताना अषी केली की, अधिकतर हिंसा टाळावयास अपरिहार्य अषी अल्प हिंसा कर्तव्यच ठरते, तेव्हा आम्हास वाटले की, जन्मभर ठेचाळत का होअीना पण षेवटी या जन्मीच गांधीजींनाही अहिंसेचा अर्थ थोडा कळू लागला. गांधीजी त्यांच्या राजकारणी आयुश्यात जी काही षुध्दीवर असल्यासारखी अेक-दोन वाक्ये बोलले आहेत, त्यांत या वरील वाक्यांची गणना आम्ही केली; परंतु गांधीजींची षुध्दीदेखील त्यांच्या स्वाभविक बेषुध्दीतीलच अेक क्षण असतो. नवख्या मुलाचा नेम चेंडूफळीत जसा कधी चुकून बरोबर लागतो. तसे राजकारणाच्या डावात गांधीजी अेखाद्या वेळी जे बरोबर बोलून किंवा करून जातात ते देखील चुकूनच केलेले असते. कारण दुसन्́याच क्षणी ते त्या बरोबर कृत्यालाच चूक म्हणण्याची आणखी अेक चूक हटकून करीत असतात. जर सत्याग्रही हा अितका पूर्ण अहिंसात्मक प्राणी असतो. की, षस्त्र हातात धरणे हे देखील तो पाप समजतो, नीतिबां́ समजतो, तर मग पिसाळलेल्या पज्डाास कुत्र्यांस अेकत्र कोंडून त्यांस बंदुकीने ठार मारविण्याचे कृत्य करविणारा हा अेक हिंस्त्र हत्यारीच ठरत नाही काय? जर्मन लढाअीच्या वेळचा तो ‘सैन्यांत भरती व्हा! अिंग्रजास विनाअट सां́ देअून रणांगणांत युध्दास जा’ म्हणून ओरडत फिरणारा तो सैन्यभरतीसाठी नमे लेल्या सरकारी अडत्यांचा धुरीण! तो कोण? अिंग्रजांस विनाअट सां́ देण्यासाठी जर्मनांस षस्त्राने विनाअट मारण्यास अुल्̈ोजन देत आजारी पडेतो हिंडणारा तो वेडापीर-तोही अहिंसेचाच भ७ होता नाही? आपल्या देषाषी मित्रत्व जोडू अिच्छिणान्́या षेकडो जर्मनांना त्यांचे हिंदुस्थानषी वैर नसताना सपासप कापून काढणे ही हिंसा होत नाही? पण जे आमचे पिढीजात षत्रू -त्यांच्याविरूध्द केवळ आत्मसंरक्षणासाठी षस्त्र धरणे म्हणजे मात्र हिंसा होते! नुसते षस्त्र धरणे हीही गोश्ट सत्याग्रहास लाजिरवाणी असते! मग जेव्हा स्वतःच्या जिवावर बेतली तेव्हा का सषस्त्र डाॅक्टरास बोलावून पोटावर कर्तन करून घेतलेत? तुमच्या पोटात वसतीस येअून खाअून पिअून सुखी असलेल्या अेखाद्या आॅस्टेंलियाच्या वसाहतीप्रमाणे भरभराटत जाणारे ते रोगाणंूचे राश्टंाच्या राश्टं त्या डाॅक्टराच्या षस्त्राने तुम्ही कल्̈ाल करून टाकलेत नाही का? मग ती हिंसा कषी मानवली? त्या रोगाणूंच्या किंवा जर्मनांच्या पुढे, सत्याग्रही वीरांचे जे कर्तव्य आपण आता सांगत आहा, तसे नुसते अुभे राहून त्यांच्या कृत्याचा निशेध करीत आपण मरणी मेला का नाही?

परंतु महात्माजींचे ं̂दय जितके विषाल नि अुज्डात आहे, तितकीच त्यांची बुध्दी आकुंचित नि अपव आहे. अहिंसा, दया, क्षमा, अित्यादी कर्णमधुर षब्दांस त्यांचे कोमल ं̂दय भुलून जाते. परंतु त्या षब्दांतील सत्य तल्̈वाचे यथातथ्य आकलन करण्याचे सामथ्र्य त्यांच्या बुध्दीत नसल्याने नि तसे सामथ्र्य आपल्या बुध्दीत नाही हेही समजण्याअितकी विवेचनष७ी त्यांस अुरली नसल्याने ते केव्हा काही तर केव्हा काहीच बोलून जातात. वास्तविक पाहता अहिंसेची वर दिलेली व्याख्या हिंदू धर्मग्रंथांच्या पानापानांवर खोदलेली आहे. पण ती पज्डााषी अुलटल्यावर गांधीजी षिकू लागले नि लगेच षिकावयास लागल्यापासून अेक वर्श संपण्यापूर्वीच विसरूनही गेले. पुन्हा लिहू लागले की, ”खरा सत्याग्रही षस्त्राला षिवण्याचा विचारदेखील मनाला षिवू देत नाही. लाठीदेखील हाती घेणे हे सत्याग्रहाच्या विरूध्द आहे. मात्र आम्हास पारतंत्र्यात डांबून ठेवणान्́या अिंग्रजांच्या सां́ार्थ, आमच्या

स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यी साहा ̧य देअू अिच्छिणान्́या जर्मनांना बंदुकी तलवारींनिषी ठार मारणे हे सत्याग्रहाच्या तल्̈वास नि व्रतास साजेसेच असते! आजपर्यंत अषा प्रकारची परस्परविरूध्द भाश्ये नि कार्ये गांधीजींच्या हातून अितकी घडली आहेत की, त्यंाची अेक गाथाच गुंफता येअील. अर्थहीन षब्दांनी नि बुध्दिहीन अर्थांनी त्यांची वाक्ये नि कार्ये खचाखच भरलेली असतात. स्वराज्य, खादी, षुध्द स्वदेषी, असहयोग, सत्याग्रह, अहिंसा, असहकार अित्यादी षब्दांनी आज पाच-सहा वर्शे अुभ्या हिंदुस्थानात जो गांधी-गोंधळ माजविला आहे, त्याला हे महाराश्टं तरी आता विटून गेलेले आहे. या प्रत्येक षब्दाच्या अितक्या परस्परविरोधी व्याख्या नि अर्थ गांधीजींनी केलेले आहेत की, त्यांना अेकत्र गुंफले असता अेखाद्या पिसाटालाही पोट धरधरून हसू येअील. परंतु या गोंधळाने राश्टंकार्याचा अितका चुराडा करून टाकला आहे नि राश्टंाचा तेजोभंग करून त्यास अितके अकर्मण्य करून ठेवले आहे की, त्यामुळे त्या तिटकान्́यासरषी मनात विनोदी भावना अुत्पज्डा न होता गंभीर दुःखावेगाने नि क्रोधाने मनात तिरस्कारच अुत्पज्डा होतो. नागपुरच्या षस्त्राग्रहातील चुकीची कुसळे निवडीत गांधीजी म्हणतात की, सत्याग्रहाचा विशय षस्त्राचा निर्बंध 1⁄4आम्र्स अॅक्ट1⁄2 नसून त्याचे मुख्य ध्येय बंगालच्या राजबंदींची सुटका हे आहे. तेव्हा षस्त्रांचा निर्बंध तोडणे हे विशयांतर होत आहे. पण रौलेट निर्बंधाच्या विरूध्द जेव्हा सत्याग्रह सुरू करण्यात आला, तेव्हा रौलट निर्बंधाचा वचपा म्हणून मुंबअीला गांधीजींनी स्वतःच मुद्रण निर्बंध तोडला नि ते जप्त पुस्तके विकीत सुटले. त्यावेळी त्यावर काहींनी हाच आक्षेप घेतला होता की, रौलेट निर्बंध तोडा, त्याच्यासाठी हा दुसरा निर्बंध तोडणे हे विशयांतर आहे. पण तेव्हा जर कोणत्याही अन्या ̧य निर्बंधास केव्हाही तोडणे सयु७िक होअू षकले तर आजही षस्त्रनिर्बंधासारखा अत्यंत अपमानास्पद निर्बंध तोडणेही सयु७िक का होअू नये? पण मी म्हणेन ती पूर्व दिषा असली पाहिजे असे मानण्याचा अहंकार, स्वतः पूर्वी जी पूर्व दिषा म्हटली तीच आता प९ियम दिषा म्हणावयास न कचरण्याअितका निर्ढावलेला असतोच असतो.

याच्याही पुढे जाअून ते म्हणतात की, जे निर्बंध नीतिमूल असतात ते मोडण्याच्या चळवळीला सत्याग्रह हे नाव षोभतच नाही. चोरीचा निर्बंध तोडण्याप्रमाणेच षस्त्रनिर्बंध तोडणे हेही नीतीच्या प́श्टीने सत्याग्रहाच्या विरूध्द आहे! स्वसंरक्षणासाठीदेखील हातात षस्त्र धरणे -नुसते धरणे देखील! -ज्या मनुश्याला चोरी करण्याअितकेच पापप्रद वाटते त्याला जर्मनांची कल्̈ाल करण्यासाठी अिंग्रजी सैन्यात भरती होणे मात्र पापप्रद वाटत नाही, अषाच्या तोंडी तरी काय लागावे?
आणि तरीदेखील जोवर गेल्या पाच-सहा वर्शात अुत्पज्डा झालेला प्रज्ञाहीन भाबडयांचा असा अेक वर्ग देषात जिवंत आहे की, ज्यास तो पोकळ षब्दांचा सावळा गोंधळच कोण्या गूढ तल्̈वज्ञानासारखा भासून त्या बुध्दीच्या अंधकारात धडधडीत दिसणान्́या गोंष्टीही दिसेनाषा होतात- तोवर वरीलसारख्या बालिष षब्दच्छलाचीही अेखाद्या महल्̈वाच्या विशयाप्रमाणे चिकित्सा करीत बसणे प्राप्तच होते.
देषभ७ आवारी यांनी चालू केलेला हा सत्याग्रह असा निश्फळ, अनीतिकारक, अत्याचारी नि सत्याग्रही मनुश्यास न षोभण्यासारखा आहे म्हणून सांगितल्यानंतर बंगाली राजबंदीस सोडविणारा सफल, नीतिकारक, अनत्याचारी नि सत्याग्रही प्राण्यास षोभणारा असा दुसरा अेक अुपाय महात्माजी त्यास लेखात परम कारूणिकपणे सांगते झाला आहेत, तोही अगदी अैकण्यासारखा नि पदार्थसंग्रहालयात अेखाद्या प्रस्तरयुगातील हाडकाच्या कवटीषेजारी राखून ठेवण्यासारखा आहे. ते
म्हणतात, ‘नागपुराहून अेकेक मनुश्याने पायी चालत कलकल्̈यास जावे. पायी न चालता आले तर रेवे ने जावेण्ष् नि करावे काय? जेथे ते राजबंदी अटकेत असतील त्यांपैकी अेखाद्या ठिकाणावर लाखो
लोकांनी निकराचा हल्ला करून ल्́ेंचांनी बास्टाअिल तोडून टाकला तसे ते ठाणे तोडून फोडून राजबंदी मु७ करावे? षिव! तसे काही नाही! तर गांधीजी म्हणतात, ‘प्रत्येकाने नागपूरहून पायी निघावे; कलकल्̈यास जावे अन् थेट गव्हर्नरच्या बंगल्यावर चढू देतील तितके चढून ओरडावे, ‘राजबंदिवानांस सोडा!’ पुरे. अितके ओरडून स्वतःला बंद करून घे।̊न कारागारात पडावे. या रामबाण अुपायात अितक्यावरही काही कसूर राहील अषी षंका येअून गांधीली पुढे म्हणतात, ‘पण ं́ा सत्याग्रहीने संपूर्ण निरूपद्रवी नि निःषस्त्र असलेच पाहिजे!’
काय पण अुपाय सुचविला? नागपूरहून पायी कलकल्̈यास जावे म्हणजे तरूण मुलेदेखील त्यातच आल्याने सत्याग्रहाची अर्धी अधिक जीवनष७ी प्रवासाने सुकून जाणार-नाहीतर रेल्वेने जावे- म्हणजे प्रत्येक सत्याग्रं́ाचे भाडे भरता भरता त्याच्या तुटपुंजा निधीचे हजारो रूपये रेल्वेच्या विलायती कप्प्यात आयते पडणार नि हे हजारो रूपये किंवा त्या पायास फोड येअून सांडलेल्या र७ाच्या धारा खर्चून अंती करायचे काय? तर गव्हर्नरच्या दाराषी-जाअू देतील तर-जाअून नुसते ओरडायचे, ‘सोड, राजबंदिवानांस सोड!’ नुसते ओरडायचे!!!
जणू काय गव्हर्नर जन्मबधिर आहे. नागपूरला लोक आपल्या बायकांषी स्वयंपाकघरात काय बोलतात हे ज्या गव्हर्नरांना अचूक कळते, त्यांना त्यांच्या बंगल्यापाषी ओरडण्याने जणू काही अधिक अैकू येणार आहे! जणू काय नागपूरच्या सभेतून नि पथांतून ‘राजबंदिवानांस सोडा’ ही अुठलेली आरोळी त्या गव्हर्नरंना अैकूच गेली नाही-ती बंगल्यावर ओरडण्याने जाणार आहे!
पण मग आम्ही म्हणतो, असली संजीवनी सापडली असता ती केवळ राजबंद्याच्या सुटकेसारख्या अेका विवक्षित व्याधीवर का खर्च करा? सर्व रोगांचे मूळ जे पारतंत्र्य तेच का त्या अुपायाच्या अमोघ अस्त्राने 1⁄4चुकलो!! खादीच्या सुताने1⁄2 कापून काढू नये! कलकल्̈याच्या गव्हर्नरपर्यंतच का थांबा! आम्ही गांधाळलेल्या प्रत्येक सत्याग्रही वीरास असे सुचवितो की, प्रत्येकाने प्रथम काष्मीरला हिमालयापर्यंत चढून जावे. नंतर तेथून पायी निघून गोबीचे वाळवंट अुतरून, मृत समुद्र पोहून काॅकेषस ओलांडून नीट अिंग्लंडला पोचावे नि पायी पोचावे. मग कपडे बदलून, स्नान करून, मानसिक, कायिक नि वाचिक आत्मषुध्दी करीत करीत अगदी पूर्णपणे जीव निरस्त्र अन् निरूपद्रवी झाला म्हणजे अिंग्लंडचे राजे ज्या बकिंगहॅम राजमंदिरात राहतात त्याच मंदिराच्या अंगणात-जाअू देतील तेथपर्यंत- जावे नि ओरडावे, ‘स्वराज्य द्या!’
हो! ओरडूनच जर काम होते तर नुसते बंगालच्या राजबंदिवानांस सोडा, अेवढेच मागणे का मागा!-प्रत्यक्ष जाॅर्जमहाराजांच्या राजमंदिरापुढे जाअून स्वराज्याची भिक्षाच पदरात घेअून परत का न या! मागे सुताने सहा महिन्यांत स्वराज्य मिळविण्याचा अुपाय गांधीजींनी सांगितला होता. पण या नव्या ओरडण्याच्या अुपायापुढे त्या अुपायाचेही तेज फिव̂ेच पडते यात ष्ंाका नाही. स्वराज्यासाठी अुपायावर अुपाय बिचारा महात्मा सांगत आहे! पण करावे काय! ‘या महाराश्टंातील लोकांत श्रध्दाच नाही!’
अेक वेळ हे असले अुपायदेखील बालिष म्हणून थोडेसे हसत मनुश्य बाजूस सारू षकेल. पण त्या अुपायांचे मर्म सांगण्यासाठी जेव्हा गांधीजी त्यांच्या वेडसर तल्̈वज्ञानाची भाशा बोलू लागतात तेव्हा हसू येणेदेखील अषक्य होअून त्या विक्षिप्ततेची अगदी षिसारी येअू लागते. कारण त्यांच्या अुपायांनी भाबडया
लोकांची अितकी दिषाभूल होत नाही की, जितकी त्यांच्या वेडसर तल्̈वज्ञानाने होते! याच अुपायांविशयी ते पुढे म्हणतात, ‘वचित अषा कलकल्̈यास पायी जाअून ओरडण्याने कार्यसिध्दी लवकर होणार नाही; पण हे सर्वांनी ध्यानात धरावे की, आत्मत्याग अंती सफल होतो!’
वाहवारे आत्मत्याग! अहो ज्या साधनाने अितर सर्व साधनांतून अल्पतर त्यागाने अधिकतर प्रमाणात साध्य संपादिले जाते, त्या साधनासाठी जो करावा लागतो त्याला खरा स्वार्थत्याग नि यथार्थ आत्मत्याग म्हणतात. परंतु साध्य प्राप्त करण्यास जो मार्ग सर्वात अधिक कश्टदायी नि निश्फळ असतो तोच चोखाळण्याचे कश्ट जाणूनबुजून अंगीकारणारा मनुश्य आत्मत्याग करीत नसून आत्मनाष करीत असतो. मुंबअीहून मद्रासला जाणे तर मद्रास रेल्वेने न जाता प्रथम हिमालयाकडे जाअून, मग जपानमधून अमेरिकेत अुतरून युरोपमार्गे मद्रासला जाणारा वेडसर नि विक्षिप्तपणा ं́ाचा आत्मत्याग नसून आत्मनाष होय. केवळ आत्मत्याग व्यर्थ जात नाही म्हणून घरासमोरची सुपीक षेती टाकून देअून म्हणे सहाराच्या वाळवंटात षेती करा! केवळ आत्मत्यागाकरिताच असेल तर मग कलकल्̈यास जाण्यासाठी विलायती रेल्वेत पैसा तरी का ओता? नागपूरच्या अेका जुन्या विहिरीच्या काठावर अुभे रहावे,‘राजबंदिवानांस सोडा’ म्हणून ओरडावे नि त्या आडात गळयाषी दगड बांधून घेअून अुडी टाकावी नि जीव द्यावा!
छे! आत्मत्याग, आत्मबल, सत्याग्रह, अहिंसा सत्य अित्यादी गोंडस नावाखाली हितषत्रूसच षोभण्यासारखा राश्टंाचा जो तेजोभंग आजपर्यंत करण्यात आला तो पुरे झाला! राजकारणाचा पोरखेळ करून टाकला तो पुरे झाला. हा गांधी-गोंधळ आता पुरे झाला! म्हणे कलकल्̈यास पायी जा नि ओरडा! हो, जर तुम्हास राश्टंासाठी खरोखरच काही करून दाखवायचे असेल, तर हे बालिष तल्̈वज्ञान नि हे षंढतेचे षास्त्र पहिल्याने पायाखाली तुडवून टाका! हे कृत्य सत्याग्रह आहे की नाही’ हा प्रष्न अेखाद्या आजीसारखा विचारीत न बसता अेखाद्या षिवाजीसारखे अितकेच पाहा की, ते कृत्य अेकंदरीत आपणास अल्पात अल्प स्वार्थत्याग करावयास लावून दुश्ट विपक्षाची अधिकात अधिक हानी करीत आहे की नाही! मग त्यास भाबडेगिरी किंवा भामटेगिरी, सत्याग्रह म्हणो किंवा षस्त्राग्रह म्हणो!
तो मुसोलिनी पाहा; सूर्यास आच्छादून टाकील असे दाट लढाअू विमानांचे छत अिटालीस घालू पाहत आहे. तो लेनिन पाहा; तो टंाटस्की पाहा, बोलता बोलता झारषाही अुलथून पाडून युरोपातील राजांषी झुंज खेळणारे आर७ सैनिकांचे अेक राश्टंच्या राश्टं निर्माण करीत आहे. तो चीन पाहा; लाख लाख सेना अुत्कृश्ट षस्त्रास्त्रांनी सज्ज करून धारातीर्थी झुंजत परकीयांस पिटाळीत आहे. हे अिंग्लंड पाहा! रणतरी, पाणबुडया, विध्वंसके, विमाने, सैन्ये, यांवाचून षब्दही न अुच्चारिता, अेवढे साम्राज्य अेखाद्या घडयाळासारखे व्यवस्थित चालवीत आहे. प्रत्येक अिंग्लिष नागरिक अेक अेक मुसोलिनीच बनलेला आहे. ते बुटगे जपान पाहा, तो दाढीचा घोळ मुंडून तलवार अुपसलेला केमालपाषा पाहा; तो अिवलासा अफगाणचा अमीर येत्या जिहादची धर्मयुध्दाची गर्जना घरोघर करीत हिंडत आहे तो पाहा! अन् या अषा प्रचंड नि भयकं र धकाधकीच्या रणधुमाळीत या भारताचे भाग्य ज्यांच्या हातात तुम्ही दिले आहा, ते हे तुमचे भिकारडे चक्रवर्ती पाहा!हे नागपुराहून पायी चालत, कलकल्̈याच्या गव्हर्नरच्या बंगल्याषी ‘राजबंदिवानांस सोडा’ म्हणून नुसते ओरडून त्या क्रांतिकारकांची सुटका करणार! तुम्हास खादी विणायची असेल, फळे खाअून किंवा पाने खाअून जगावयाचे असेल, लगं ोटी नेसून राहावयाचे असेल, अुपासतापास करावयाचे असतील, तर तुम्ही सुखेनैव यांच्यामागे लागा. त्या सद्गुणात तेच अुपदेषक योग्य आहेत. पण तुम्हास स्वराज्य हवे असेल, स्वातंत्र्याची प्रबळ अिच्छा तुम्हास स्वस्थ बसू देत नसेल, या तुमच्या हिंदुस्थानच्या छातीवर अुडणान्́या परक्या ध्वजाकडे पाहताच तुमची तोंडे लज्जेने काळी ठिव̂र पडत असतील तर तरूणहो, अुठा नि तडक त्या रषियास, त्या अिटलीस, त्या आयर्लंडास, त्या षिवाजीस, त्या चंद्रगुप्तास, कारण ते स्वतःत्या त्या मार्गाने गेलेले आहेत; त्यांनी स्वातंत्र्य संपादन केलेले आहे. मग त्या मार्गांतून परिस्थितीस अनुरूप नि न्या ̧य असा मार्ग तुम्हास सहज निवडता येअील. भांडारकर कितीही विद्वान नि संस्कृतज्ज्ञ असले तरी जसे त्यांस राजवैद्याच्या जागी नेमता येणार नाही, त्याचप्रमाणे गांधीजींसही, ते महात्मे असले नि आम्हा सर्वांस त्या प́श्टीने नि जर ते त्यांच्या कक्षेबाहेर ढवळाढवळ करण्याचा मोह आवरतील तर पूज्यच आहेत-तरी त्यांच्यासारखी स्वातंत्र्ययुध्दाच्या रणधुमाळीत पहिल्या आवाजासरषी भेदरून नि गांगरून जाणारी नि राजकारणात सर्वस्वी अप्रबुध्द असणारी माणसेही तुमचे राजगुरू होअू षकणार नाहीत. त्याला चाणक्यच हवा असतो; त्याला समर्थ हवा असतो. जेनो काम तेनो थाय, दुजा करे सो गोता खाय!