Get it on Google Play
Download on the App Store

इ.स. २००९

"कोण आहे मलाला?" स्कूल व्हॅन शोधत असताना तालिबानी सैनिकाने विचारले.

“मलाला ही एक अशी मुलगी आहे जी घाबरत नाही, मी ज्ञानाने स्वत:ला सक्षम करीन," ती म्हणाली.

तालिबानी सैनिकांनी स्वात खोऱ्यातील मुलींना शाळेत जाऊ नका, अभ्यास करू नका, असे सांगितले पण मुलींनी त्यांचे ऐकले नाही कारण त्या धाडसी मुली होत्या.

शाळेच्या खोलीत विद्यार्थ्यांचे ऊनपावसापासून आणि धोक्यापासून संरक्षण होत होते पण बाहेर शाळेपासून दूर मात्र सर्वत्र एक काळेकुट्ट ढग पसरले होते.

तालिबान दररोज धमक्या प्रसारित करत असत. "मुलींनी शाळेत जाऊ नये,". पण मलाला ही एक धाडसी मुलगी आहे जी त्यांच्या विरोधात लढली. "मला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मला वाजवण्याचा अधिकार आहे. मला गाण्याचा अधिकार आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बाजारात जाण्याचा अधिकार आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे."

स्वात खोऱ्यात अजिबात शांतता नव्हती. तालिबानी शाळा जाळत, बॉम्बस्फोट करत.

तरीही मलाला कडाडली. "अतिरेकींना पुस्तक आणि लेखणीची भीती वाटते. ते महिलांना घाबरतात. तालिबानला माझा शिक्षणाचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याची हिम्मत कशी झाली?"