Get it on Google Play
Download on the App Store

प्रास्ताविक

मलाला युसुफझाईचा जन्म पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील मिंगोरा या छोट्याशा गावात झाला. ती तिचे आई वडील आणि दोन भावांसह राहत होती. मलालाने ठराविक वयाच्या अगोदरच शाळेत जायला सुरुवात केली कारण तिचे वडील तिथे शाळा चालवत होते. मलाला अभ्यासात खूप हुशार होती. तालिबान या मुस्लीम अतिरेक्यांच्या गटाने स्वात खोऱ्यात सत्ता मिळवली तेव्हा त्यांनी मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले.

मलालाने तिच्या वडिलांना विचारले, "मुलींनी शाळेत जावे असे त्यांना का वाटत नाही?"

"त्यांना लेखणीची भीती वाटते." त्याच्या वडिलांनी उत्तर दिले.

मलाला केवळ अकरा वर्षांची होती  तेव्हा तिने पहिल्यांदा मुलींच्या शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल सार्वजनिकरित्या आवाज उठवला होता. तालिबानी अधिकधिक आक्रमक होत असतानाही मलालाने आपले मत सार्वजनिकरित्या मांडणे सुरूच ठेवले. तिला दिल्या जाणाऱ्या धमक्यांची मालिका सुरूच होती, पण तरीही तालिबान मलालाला बोलण्यापासून रोखू शकले नाहीत.

एक दिवस मलाला शाळेच्या व्हॅनमध्ये जात होती तेव्हा एका तालिबानी सैनिकाने मलालावर गोळीबार केला. गोळी तिच्या डोक्याला आणि मानेला चाटून खांद्यात घुसली. त्यानंतर मलालावर अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.

अखेरीस इंग्लंडमधील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल बर्मिंगहॅममध्ये ती बरी झाली. आता मलाला तिच्या कुटुंबासह तिथेच राहते. तिची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच चित्तथरारक आहे.

मलाला

महाकाल
Chapters
प्रास्ताविक इ.स. २००९ ऑक्टोबर २०१२