Get it on Google Play
Download on the App Store

रुह-ए-हजरत

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ.शेजवळ यांनी सांगितले की तिन्ही कवट्या पडझड झालेल्या मोडक्या घरामध्ये सापडल्या आहेत.

ही बातमी ऐकून अचानक माझ्या मनात एक विचार चमकला. तांत्रिक प्रयोगाच्या माध्यमातून कवटीच्या सहाय्याने रहस्य उलगडून पहावे. शेवटी काय झाले हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. म्हणून मी कचरूच्या माहितीतील एका मुसलमान तंत्रिकास पाचारण केले.त्याच्या  सांगण्यानुसार अमावास्येला एक विधी करायचा असे ठरले.एका आठवड्यानंतर अमावस्येची रात्र येणार होती. आम्ही  त्याच दिवशी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. पण मी या सगळ्या गोष्टी मी कचरू आणि तांत्रिक सोडून  कोणाला सांगितल्या नाहीत.

अमावस्येचा दिवस आला. आम्ही  दिवसभर तांत्रिक विधीच्या  गोष्टी गोळा करत राहिलो. पण संध्याकाळ होताच, आकाशात गडद ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि वीज पृथ्वीवर आदळली. राशी राशीमध्ये विखुरलेल्या अंधारात अंधुक प्रकाशाची व्याप्ती एकाएकी संकुचित झाली आणि पुन्हा पसरली.

आम्ही तीनही कवट्या तेलाने भरल्या आणि दिवा लावला. जेव्हा ते जळू लागले तेव्हा तिन्ही कवट्याना पुष्पहार घातला आणि दारूची एक बाटली, ताजे कोंबडीचे मांस आणि जायफळ, लिंबू इत्यादी समोर ठेवले. आणि शेवटी, मोठ्या आरशावर भरपूर प्रमाणात काजळ लावल्यानंतर, टाळूच्या पाठीमागे अशा प्रकारे ठेवले की मी ते व्यवस्थित पाहू शकेन.

इस्लामिक तंत्राच्या या कृतीला "रुह-ए-हजरत" असे म्हणतात. यावेळी आपल्या देशात क्वचितच कोणालाही या तांत्रिक प्रक्रियेबद्दल माहिती असेल. रुह-ए-हजरतद्वारे  कोणताही आत्मा  ज्याने कुठेही जन्म घेतला नसेल,  त्याला काजळ लावलेल्या आरशात बोलावून त्याच्याशी बोलता येईल. त्याच्या नश्वर शरीराचे प्रतिबिंब आरशात दिसते. पण हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा ज्याच्या आत्म्याला बोलावायचे आहे त्याची कवटी उपलब्ध असेल.

आमची तांत्रिक क्रिया सुरू झाली. पहिल्या कवटीतील जळणारा दिवा एकटक पाहत आम्ही  मंत्राचा जप सुरू केला. त्या कवट्या कोणाच्या आहेत? मला हे जाणून घ्यायचे होते.  त्या चंद्रकांत आणि सारिका यांच्या असतील तर नक्कीच एक गूढ रहस्य उलगडेल आणि मग पुढे काय झाले? या प्रश्नाचे उत्तरही सापडेल.

थोड्या वेळाने दिवा विझला आणि त्या कवटीचा आत्मा त्याच्या शरीराच्या प्रतिबिंबामध्ये आरशात आला. तो दत्ताराम खोत यांचा आत्मा आहे हे समजायला आम्हाला  वेळ लागला नाही.

त्याने सांगितले की त्याने आपला भावी जावई मानवी सांगाड्याच्या स्वरूपात पाहिला होता तो त्याच भीती आणि धक्क्यामुळे मरण पावला होता. तो अजूनही आपल्या मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने हळहळतो आहे.

मला लगेच समजले की इतर दोन कवट्या चंद्रकांत आणि सारिकाच्या असतील.