प्रकरण १
१.आपण स्वप्नामध्ये मुंग्या पाहणे चांगले. स्वप्नातल्या मुंग्या द्रव्यलाभ दर्शवतात.
२. आपण मुंग्या एकामागून एक ओळीने चालताना पाहिल्यास- व्यापा-यांना द्रव्यलाभ होतो.
३.स्वप्नात मुंग्या जिकडे तिकडे पळत आहेत असे पाहिल्यास- पाहणाऱ्याला शरीर पीडा संभाव्य असते.
४.स्वप्नात मुंग्या तोंडात भक्ष्य धरून नेताना पाहिल्यास- पाहणाऱ्यावर संकट येऊ शकते.
५.स्वप्नात काळ्या मुंग्या पाहिल्यास- द्रव्यलाभ होणे निश्चित आहे.
६.तेच लाल मुंग्या पाहिल्यास- पाहणाऱ्याला धान्यलाभ होतो.
७.स्वप्नात मुंग्या आपल्या तोंडामध्ये अंडी धरून जात आहेत असे दिसल्यास- धननाश होणे शक्य आहे.
८.स्वप्नात मुंगळे पाहणे चांगले असते. मुंगळ्यानी आपल्याला दंश केलेला पाहिल्यास- द्रव्यलाभ होण्याची शक्यता असते.
९.स्वप्नात मुंगळे मेलेले पाहिल्यास- आपल्या प्रदेशात दुष्काळ पडेल.
१०.उवा व ढेकूण स्वप्नात पाहिले तर आपल्या उद्योगात विघ्न करण्याविषयी व आपला नाश करण्याविषयी कोणी प्रयत्न करीत आहेत असे समजावे.
११.स्वप्नात सरडा, पाल इ. दिसल्यास- वाईट बातमी कळते.