Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २

११.हेच इतरांनी धरलेले दिवे अंधुक दिसल्‍यास- आपल्याला त्रास देणारे पकडले न जाता उलटपक्षी जास्‍त कष्‍ट प्राप्‍त होतील.
१२.आपण लावलेल्या दिवा किंवा दिवटीचा चांगला प्रकाश पडल्याचे दिसल्यास- मुलगा जन्माला येतो आणि वंशाची भरभराट होते.
१३.हेच दिव्याचे स्वप्न स्‍त्रीने पाहिल्‍यास- ती लवकरच गरोदर होऊन तिला पुत्ररत्न होण्याची शंका असते.
१४.आपणच दिवा लावण्‍याच्या प्रयत्‍नात असताना मध्येमध्ये विझला असे पाहिल्‍यास- अनेक संकटे येऊन पुत्र वियोग होईल.
१५.कोणत्यातरी सभेमध्‍ये स्‍वत: दिवा नेत आहोत असे पाहिल्‍यास- समाजात आणि देशभरात आपली ख्याती होईल.
१६.स्वप्नामध्ये आपले घर धुराशिवाय आणि ठिणगी न पडता जळताना पाहिल्यास- हे शुभ स्वप्न समजले जाते आणि भरभराट होते. 
१७.घर जळताना खूप धूर झाला आहेत शिवाय विस्‍तवाच्‍या ठिणग्‍या उडत आहेत आणि घर जळून राख झाली आहे असे दिसल्यास- आपल्यावर काहीतरी संकट येईल व विनाशकाल येईल.
१८.स्‍वयंपाकघर जळत आहे असे पाहिल्‍यास- स्‍वंयपाक करणा-या माणसाला दु:ख प्राप्‍त होईल.
१९.कुण्या घराचे छप्‍पर जळताना पाहिल्‍यास- आपली एखादी वस्तू, वाहन ई. चोर लुटून नेतील किंवा मित्राला मरण येण्याची शक्यता आहे.
२०.स्‍वप्‍नात घराचा पुढचा भाग किंवा दरवाजा जळताना पाहिल्‍यास- त्या घरच्‍या मालकला किंवा आपल्यावर संकट येईल.

स्वप्नफल- अग्निसंबंधी

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
प्रकरण १ प्रकरण २ प्रकरण ३