प्रकरण १
स्वप्नात आग पाहणे नेहमीच चांगले असते. पण जर वरचेवर आग ज्या माणसाच्या स्वप्नात येते त्या माणसाचा स्वभाव तापट आणि रागीट होतो.
१.व्याधीग्रस्त मनुष्याने धुराशिवाय तेवणारा अग्नि पाहिल्यास- तो मनुष्य लवकर बरा होऊन त्याची तब्बेत अधिक सुधारते.
२.निरोगी माणसाने असं अग्नी पाहिल्यास- द्रव्यलाभ होतो आणि नातेवाईकांची भेट होइल.
३.अतिशयीत धूर आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा अग्निकुंड शिवाय पाहिल्यास- माणसाला वैमनस्य तयार होईल. शिवाय दु:खकारक बातमी ही कळेल.
४.स्वप्नात कोळसे किंवा राख पाहिल्यास- दारिद्रय येते, कुणाशीतरी आपले वाकडे होईल.
५.राख किंवा कोळश्याचे हे स्वप्न एखाद्या रोग्याने पाहिल्यास- त्याचे रोग आणि व्याधि निवारण होईल.
६.आपण एखाद्या होडीत किंवा जहाजात असताना दूर काठावरच्या गावात दिवे लागलेले आहेत असे स्वप्नात दिसल्यास- आपले पुढील दिवस सुखाने जातील.
७.दिवे, मशाली आणि दिवट्या असे काही चांगले तेवत असलेले पाहणे चांगले मानले जाते. शिवाय कार्यसिद्धीलं जाते, द्रव्यलाभ आणि संतानवृद्धी होईल. अविवाहित मनुष्याचे लग्न होईल आणि दीर्घायुषी संतती प्राप्ती होईल.
८.दिवे, मशाली आणि दिवट्या इह सगळे अंधूक जळताना पाहिल्यास- किंचित व्याधी येऊन लागलेच बरेही होईल.
९.दिवे ई.पैकी काही जर आपण हातात धरलेले पाहिल्यास- आपल्यावरच्या संकटांचे निवारण होईल, आपल्याच हातून आप्तेष्टांचे आदरातिथ्य होईल व समाजात मान मिळेल.
१०.आपल्या स्वप्नात दुस-यांना दिवे इत्यादी धरताना पाहिल्यास- आपल्याला त्रास देणारे लोकं पकडले जाऊन त्यांना योग्य तोई शिक्षा मिळेल.