वरद विनायक, महड, रायगड
वरदविनायक हे महाराष्ट्रातील प्रसिध्द अष्टविनायकातील एक महत्त्वाचे गणेशस्थान आहे.
गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री गुत्सपद मुनी या स्थानाचे प्रतिस्ठापक आहेत.
१६६० साली एका गणेश भक्ताला तळ्यामध्ये गणेशमूर्ती सापडली होती. १७२५ मध्ये मंदिर उभारण्यात आले होते.
दगडी महिरपीच्या नक्षीदार सिंहासनाधिष्ठित डाव्या सोंडेची ही मूर्ती आहे.
१६९० सालापासून या स्थानास सनद आहे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईहून जाताना खोपोली आधी येणाऱ्या मार्गावर अगोदर तीन किलोमीटर महड हा फाटा लागतो.
या फाटय़ावरून किमान एक किलोमीटर आत हे मंदिर आहे.