श्री सिद्धिविनायक बाजीपुऱ्यातील गणपती वसई
हे देवस्थान फार पुरातन पेशव्यांच्या अगोदरपासूनच आहे.
परंतु आता वाढत्या लोकवस्तीमुळे वसई एसटी स्टँडच्या परिसरातच आले आहे.
याठिकाणी तलाव खोदत असताना तलावात काळ्या पाषाणाची मूर्ती सापडली होती.
ही मूर्ती काळ्या दगडांची उजव्या सोंडेची आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून रिद्धी सिद्धी सहित ही मूर्ती आहे.
वसई स्थानकाहून मंदिराजवळ जाण्यासाठी अनेक बस मिळतात.