आठवण
दोन प्रेमाचे व्यक्ती,
एकत्र आलेले मला बघायचंय,
कधी तरी तशा पद्धतीने,
मला सुद्धा जगायचंय,
वाटतं कधी कधी ह्या एकटेपणाला,
कोणाचा तरी साथ हवा,
गर्दीतून चालताना,
हातात अलगद त्याचा हात हवा,
असेन तुझी अपराधी,
पण एकच सजा कर,
मला स्वतः मध्ये सामावून घे,
बाकी सगळं वजा कर...
तू जवळ असून ही,
तुझं मन माझा कडे कधीच वळत नाही,
खरं तर तुझ्या प्रेमाचं गणीत,
मला आज ही कळत नाही...
------------------------------------------‐-------
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर हास्य बनून येईन
--------------------------------------------------