लग्नं
लग्नं म्हणजे काय असतं,
दोन जिवांचा मेळ असतो,
राजा राणी चा मांडलेला,
भातुकलीचा खेळ असतो.
म्हणतात मुलीला घर सोडताना,
तिचा साठी खूप अवघड असतं,
पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं,
हे मुलांसाठी पण तर जड असतं,
लग्नं म्हणजे एक अशी रेशीमगाठ,
जशी सोनेरी किराणाची पहाट,
कडू आणि गोड क्षणाची लाट,
जन्मभर समजूतदारपणाची साथ,
लग्नं म्हणजे एक मेकांना
एक मेकांचा वेळ,
त्यात मांडायचा असतो,
छोट्याशा संसाराचा खेळ,
लग्नं पाहिलं कि अर्धवट वाटतं,
केलं कि सोपं वाटतं,
अनुभवलं कि अवघड वाटतं,
आणि निभावलं तर संपूर्ण वाटतं,
सोप्या शब्दात सांगायचं तर,
लग्नं म्हणजे आयुष्य,
आयुष्य म्हणजे रुसवे फुगवे,
रुसवे फुगवे म्हटलं कि समजूतदारपणा,
समजूतदारपणा आला कि काळजी,
काळजी आली कि जाणीव,
जाणीव आली कि प्रेम,
आणि प्रेम म्हणजे फक्त तू आणि मी.