Get it on Google Play
Download on the App Store

बेवारस थडग्यावरची फुले

१९४९ साली ते मृतशरीर पुरण्यात आले. अचानक त्याच्या थडग्यावर कोणी तरी फुले ठेवू लागला. पोलिसांनी एक महिलेला फुले ठेवताना पहिले पण सदर महिलेने त्या मासाची आपला काहीही संबंध नाही हे स्पष्ट केले.

त्याच वेळी एक दुसरी महिला जी एका हॉटेल मध्ये कामाला होती तिने हा माणूस आदल्या रात्री आपल्या हॉटेल मध्ये राहिला होता अशी माहिती पोलिसांना दिली. तो इंग्रजी बोलणारा असून त्याच्याकडे एक काळ्या रंगाची पेटी होती आणि त्यात आपण पहिले असता आपल्याला एक सुई (डॉक्टर वापरतात तसली) प्रमाणे  वस्तू दिसली होती असे सांगितले.

१९५९ साली एका भयंकर कैद्याला ह्या माणसाची ओळख ठावूक आहे असे प्रकाशित झाले पण त्यात काही तथ्य होते असे समोर आले नाही.

मृत्यू नंतर ६० वर्षे पर्यंत जगातील अनेक तज्ञ लोकांनी त्या पुस्तकावरील कोडचे उत्तर शोडण्याचा प्रयत्न केला. आर्मी, नेवी आणि संगणकतज्ञ ह्यांना त्यात यश आले नाही. केस चा तपास करण्यार्या एका अधिकार्याच्या प्रमाणे "ITTMTSAMSTGAB" ह्या चा अर्थ "It's Time To Move To South Australia Moseley Street" असा होतो असे सांगितले आणि ती नर्स सुद्धा त्याच पत्त्यावर राहत होती.

२००६ रेचल नावाच्या मुलीने टी.वी.वर मुलाखत दिली ज्यात तिने आपण त्या नर्सची मुलगी असून आपल्या आईला त्या मृत व्यक्तीची ओळख ठावून होती असे सांगितले. आपली आई कडची रशियाची हेर असावी असा तिचा अंदाज होता. रेचल ने ह्या केस वर तपास करणाऱ्या एका प्राध्यापाकाशी शेवटी लग्न केले होते.

२०११ साली एका महिलेने आपल्या वडिलांच्या वास्तूमध्ये सापडलेले एक ओळख पत्र एका प्राध्यापकाला दिले. सदर ओळखपत्र अमेरिकेत दिले गेले होते. त्यात व्यक्तीचे नाव एच.सी.रेनॉल्ड असे लिहिले होते, नागरिकत्व ब्रिटीश आणि फोटो एकदम मिळता जुळता होता.

आज सुद्धा ऑस्ट्रलियन पोलीस ह्या ओळखीचा तपास करत आहे