Get it on Google Play
Download on the App Store

बेवारस शव

१ डिसेंबर,१९४८ रोजी सोमार्तन बीच ऑस्ट्रेलिया मध्ये सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एक शव आढळले. जणू काही झोपेत मेला असावा अश्या पद्धतीने शव होते. शवाच्या जवळ एक न वापरलेली सिगारेट होती. आधी, साधी सोपी वाटणारी हि घटना ह्या शतकांतील सर्वांत रहस्यमयी पोलिस केस अजून जगभर ती अभ्यासली जाते. आज सुद्धा ह्या केस चा तपास काही प्रमाणात चालू आहे.

शवाच्या कोटमध्ये एक सिगारेटचे पाकीट त्यात ७ सिगारेट होत्या, एक फणी, एक रेल्वेचे वापरलेले तिकीट, एक बसचे न वापरलेले तिकीट आणि एक माचीस सापडले. कपड्याची लेबल काढून टाकली गेलेली होती. क्तुहाल्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा पैसे त्याच्या शरीरावर नव्हते. प्रत्यक्ष दर्शी लोकांनी आधीच्या दिवशी सुमारे संध्याकाळी ७ वाजता मृत व्यक्तीप्रमाणे एका व्यक्तीला त्याच जागेवर झोपलेले पहिले होते. काही लोकांनी त्याला आपला हात उंचावताना पहिले होते आणि नंतर तोच हाथ खाली पडताना सुद्धा पहिले होते. अंधारामुळे मृत व्यक्ती तीच होती हे सांगणे अवघड होते.

१९५९ साली म्हणजे तब्बल दहा वर्षांनी काही लोकांनी पोलिसांना सांगितले कि आधीच्या रात्री एका अतिशय छान पैकी कपडे घातलेल्या माणसाला त्यांनी दुअसर्य माणसाला खांद्यावरून वाहून नेताना त्यांनी पहिले होते.