जीव गूदमरतोय
पहीलीच्या दारातच स्वागतासाठी तयार असते ऑलिम्पियाड चार चार सब्जेक्टचे! हळूहळू एमटीएस,मंथन...अमल,अँबँकससुरू होते.पाचवीत पाऊल पडते न पडते तोच अशा परीक्षा तोंडावर आदळतात की नाकाने श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही.मँथेक्स,फीटजी ,इंग्रजी मँरेथॉन आणि पारंपारिक नवोदय स्कॉलरशीप तर जोडीला आहेतच.आठवीला होमीभाभा,संडे सायन्स ....जेमतेम माणूस नववीची सहामाही देतो तो असा गोंधळ चालतो चारीबाजूंनी कानात काय वर्णावे.
नववीच्या सहामाहीत धड मिसरूडही फुटलेले नसते नि पालक ससेमिरा लावतात आताच फायनल कर तुला काय करायचयं?नीट की जेईई?सोपं आहे का आईबाबा हे इतके.शेवटी तो बिचारा जीव सांगतो तुम्ही सांगाल तसं.मग काय आईबाबा एकंदरीत पाल्याची कुवत पाहून झेंडा ठरवतात नीटचा की जेईईचा!
आईबाबा, तुम्ही कीती सुखी होतात.तुमच्या आयुष्यात एमटीएस, एनटीएस,स्कॉलरशिप आणि नवोदय सोडून काहीही नव्हते.तुम्हाला बारावीचा निकाल लागेपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ असायचा.कोणतीही एन्ट्रस नव्हती.पीसीएम आणि पीसीबी...कीती सोपं होतं.दोन ग्रुप ठेवायचे.ज्यात चांगले गुण मिळाले तेथे करीअर.तरीही तुमची पिढी सक्षम व गुणवत्ता धारक आहेच की.
मग आम्हालांच का एवढ्या कमी वयात निर्णयाची घाई.दहावी सुटत नाही तेवढ्यातच मेडिकल की इंजीनियर. हा अन्यायच नाही का आमच्या पिढीवरचा?भारंभार एन्ट्रस आणि क्लासेसचा बाजार. मग बारावी बोर्ड एक्झाम आहेतच कशासाठी?एन्ट्रस सिलँबस आणि बारावी स्टेटबोर्डचे थेअरी पेपर यांचा दूरदूरपर्यंत काही एक संबंध नाही... जानेवारीत जेईई द्यायची.आणि फेब्रुवारीच्या एका महिन्यात पुर्ण बारावीचा अभ्यास करून मार्चमध्ये पेपर द्यायचे.जीवघेणं आहे हे!
नांदेड,नाशिक,लातूर,पुणे,कोटा,औरंगाबाद या शहरांमध्ये झुंडीच्या झुंडी येत आहेत गावाकडून एन्ट्रस साठी...पण या शिक्षणप्रक्रीयेत जीव गुदमरतोय.गुंतागुंतीची निर्णयप्रक्रिया आयुष्य ढवळून टाकते आहे.ग्रामीण भागातील मुलांसाठी तर दहावी बोर्ड परीक्षा संपताच उच्चशिक्षण चालू होते जणू काही.मेस,क्लासचे खर्च अकरावीतच सुरू.एन्ट्रस शिवाय शिक्षण असू शकत नाही का.हल्ली तर टीवशन लावायला पण एन्ट्रस आणि मग डीसकाउंट.मग बोर्ड एक्झामच एन्ट्रसची जागा का घेत नाहीत ?
फ्रॉम अर्चना पाटील,
अमळनेर
फोन नंबर 8208917331