अक्षय्यतृतीया
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी पितरांचे पूजन केले जाते मातीचे मडके पाण्याने भरुन त्यावर एक टरबूज ठेवून सवाष्णीला दान देण्याची प्रथा अशी आख्यायिका ....पुण्याचा अक्षय संचय करण्याचा दिवस अक्षयतृतीया धन आरोग्य ऐश्वर्य सुख समृद्धी चा अनंत अक्षय संचय करणारी अक्षयतृतीया
ह्या दिवशी अन्नपूर्णा जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती असते.
या दिवशी भगवान व्यास यांनी "महाभारत "ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
प्रत्येक प्रदेशात तिचे महत्व दक्षिण भारतात या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन अन्न दानाचे महत्व तर ओरिसात देखील लक्ष्मीपूजन करुन शेतीच्या कामाची सुरुवात होते या दिवसाला "मुठी बहाणा" असे म्हणतात तर राजस्थानात "आखा तीज" तर महाराष्ट्रात चैत्रगौर पुजन हळदीकुंकू समाप्ती कैरीचे पन्हे डाळ हरभरे देवून करण्याची प्रथा ...या दिवशी केलेले कोणतेही काम चिरंतन टिकून राहते
आपण पुण्याईचा संचय रोजच्या दैनंदिन जीवनात सतत वापरत असतो आपल्या इच्छा साठी ...तो वाढत राहावा यासाठी अक्षयतृतीया ...नर-नारायणचा उल्लेख याच दिवशी तर कृषी संग्रहक "बलराम" याची पूजा यादिवशी केली जाते उत्तर भारतातील बद्रीनाथ मंदिराचे कवाड आजच उघडले जाते तर दिवाळीतील भाऊबीजेपर्यत ते उघडे असते
ज्योतिषशास्रात नवीन युगाची सुरुवात याच दिवशी होते देवयुगातील चार सतयुग त्रेतायुग द्वापारयुग अन् आत्ता चालू असलेले कलियुग ....अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.
360वर्ष =1दिव्य वर्ष मानतात सध्या कलियुग चालू कलियुग - 1200दिव्य वर्ष = 432000 वर्ष अशी गणना होईल
अक्षय सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य टिकून ठेवणारी अक्षयतृतीया या वर्षी कोरोनारुपी राक्षसाच्या सावटाखाली साजरी होतीये यातून लवकर बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करुन साजरी करुयात ..अक्षयतृतीया
अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा!