Get it on Google Play
Download on the App Store

न....न...नमस्काराचा......

!प्रभाते करदर्शनम! म्हणत दिवसाची सुरुवात करताना आपल्या दोन हाताची ओंजळ समर्पण शिकवते त्या त्या दिवसाला समृद्ध करत सगळ्या च ऋण आदरभावाने मानत जोडले जातात हात आणि होतो नमस्कार ....!!

नमस्कार या शब्दाचा जन्म संस्कृत शब्द नमस्कारातून झाला आहे, ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे आभार मानणे आहे., एका आत्मा ने दुसऱ्या आत्मा ला केलेले अभिवादन ...म्हणजे नमस्कार ....!!

जसे एखाद्या ची पोस्ट आपल्याला आवडली तर आपण आपल्या भावना नकळत पोहचवत आदर व्यक्त करतो..मनापासून त्या व्यक्तीप्रतीचा आदरभाव हा देखील एक मनस्वी नमस्कार च...व्यक्ती व्यक्ती नुसार बदलत जातो इतकेच भावना समान....तो ही नमस्कार उर्जेचे स्थानांतरणच....एकमेकांना दिलेले चैतन्य आँक्सिजनच....!!

आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल्या आत्मभावाचे समर्पणही त्यात असते. त्यात नम्रता असते,
. दुसऱ्याचा आदर, स्वीकार आणि स्वतःचं समर्पण, नम्रता .!  ही सगळी व्यक्त करतो मनापासून केलेला एक नमस्कार. नमस्कारात एक शक्ती असते. मनापासून केलेला नमस्कार समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला सुद्धा जिंकून घेऊ शकतो. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्याचे उत्तर म्हणून ती व्यक्ती सुद्धा आपल्याला प्रतिनमस्कार करते. ती व्यक्ती आपल्या नमस्कारातून जणू सांगते की मी तुझ्या नमस्काराचा स्वीकार केला आहे. देवासमोर उभे राहून जेव्हा आपण नमस्कार करतो, तेव्हा आपल्या मनात हीच भावना असते. मनातून आपण जणू त्याला म्हणत असतो, ' हे परमेश्वरा , माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. ' देवाला नमस्कार करताना आपली मान किंचित झुकते, डोळे मिटले जातात आणि नमस्कार असतो हृदयापासून.त्यासाठी हातात हात न घेता आपलेच दोन्ही हात जोडता येतात सध्याच्या या काळात स्पर्श करणं हातात हात देणं धोक्याचच.....मग अशा वेळेस पुरातन काळापासून माहित असलेला हा नमस्कार ......!!!!

जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना नमस्कार करतात तेव्हा दोघांच्या उर्जाची नकळत देवाणघेवाण होत असते.

आपण आपल्या ला देखील आत्मचिंतन ध्यान करत असताना नकळत नमस्कार करत असतो तेव्हा ही अशाच सकारात्मक ऊर्जेची आदलाबदली होत असावी म्हणून ध्यानधारणेचे हे महत्व स्वबदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.

नमस्कार करण्यासाठी व्यक्ती नामवांतच असावी असा शिरस्ता नसावा ...तो मनातून आलेला एक भावनिकृ पडसाद असतो...एखाद्या सामान्य लोकांसाठी अनभिज्ञअसलेला ही एखाद्या उत्तम विचार देवून जातो तेव्हा त्यालाही मनस्वी नमस्कार होतो..नम्रतेचे दर्शन नमस्कार ....

दोन्ही हात जोडून ते हृदयचक्रापाशी विसावून आपण नमस्कार करतो तेव्हा नकळत डोळे मिटले जातात ..आपल्यातील परमेश्वरापुढे आपण प्रथम नतमस्तक होतो नंतर तो नमस्कार दुसऱ्या च्या हृदयातील आत्मारुपी परमेश्वराप्रती सादर होतो सविनयाने तो नमस्कार ....!

काळानुसार नमस्काराच्या अर्थात आणि कृतीत थोडा बदल काळानुसार होत गेला आहे. आता समोरच्या व्यक्तीला नमस्कार करताना वर वर्णन केलेल्या सगळ्या भावना असतीलच असे नाही. ब लाचारीने, काही मिळवण्याच्या उद्देशाने केलेला नमस्कार वेगळा. कोपरापासून केलेला नमस्कार वेगळा. राजकीय पुढाऱ्यांचा नमस्कार वेगळा. त्या प्रत्येक कृतीमागे काही अर्थ असतो. पण काहीही असले तरी आदरपूर्वक आणि मनापासून केलेला नमस्कार हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. पाश्चात्य पद्धतीत समोरच्या व्यक्तीचे स्वागत हस्तांदोलन अर्थात शेकहॅण्ड करून केले जाते. त्यामागे देखील स्वीकाराची आणि आदराची भावना असतेच. पण आज काळाच्या कसोटीवर घासून पाहिले तर भारतीय नमस्कार श्रेष्ठ ठरला आहे. करोनासारख्या साथीच्या रोगाचा संसर्ग टाळायचा असेल, तर नमस्काराला पर्याय नाही....म्हणून तर हाताचे महत्वही तेवढेच कारण नमस्कार होतो तो हाताने...

हातात हात घेतला तर मैत्री होते..
दोन्ही हात जोडले तर भक्ति होते..
कुणाला हात दिला तर मदत होते..
हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर...
अशक्य तेही शक्य होते.

नमस्कार  ....!!!

©मधुरा धायगुडे