Get it on Google Play
Download on the App Store

ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड भाग १५

प्रकरण १५

 

पाणिनीपटवर्धन च्या ऑफिसात काया बसली होती.  “ किती वेळ हातात आहे आपल्या? ” तिने विचारले.

“ नाही सांगता येणार.,तुझ्या वडलाना अटक झाल्ये का आणि झाली असेल तर त्यांनी काय सांगितलंय पोलिसांना यावर ते अवलंबून आहे.”पाणिनी  म्हणाला.

“ मला नाही वाटत त्यांना अटक करण्या एवढे त्यांचेकडे काही आहे म्हणून ” कायाम्हणाली.

“ मला अत्ता सर्व काही सांगून टाक गोल गप्पा मारण्य पेक्षा.”पाणिनी  म्हणाला.

“ मी सर्व सांगितलं तर तुम्ही आमची वकिली घेणार नाही. ”कायाम्हणाली

“ मूर्खासारखे बोलू नको. या घडीला मी मागे घेऊ शकत नाही. तू स्वत: बरोबर सौम्या ला सुद्धा यात गुंतवल आहेस.” पाणिनी  म्हणाला.

“ ही घटना बाबांच्या आधीच्या आयुष्यात घडलेल्या घटनेशी  संबंधित आहे. जी दिव्व्यापुंडला माहीत होती.त्याचा वापर करून तिने  कायम माझ्या वडलाना तिच्या नवऱ्याच्या व्यवसायाला मदत करायला भाग पाडले.”कायाम्हणाली.

“ ब्लॅक मेल? ”पाणिनी ने विचारलं

“ अगदी तसच नाही पण अप्रत्यक्ष पणे तसेच ” कायाम्हणाली.

“ पुंडने कुक्कुट पालनाच्या व्यवसायासाठी बाबांकडे रकमेची मागणी केली.सम्यकगर्ग  नावाच्या माणसा बरोबर भागीदारीत धंदा करतोय असे त्याने सांगितले त्यासाठी पालेकर नावाच्या माणसाकडून धरण क्षेत्रातील जागा घेतोय असे सांगितले..प्रत्यक्षात चेक ने व्यवहार न करता  रोखीने व्यवहार केला  आणि खऱ्या किंमतीपेक्षा वाढवून किंमत बाबाना सांगितली व त्यावर रक्कम गुंतवण्यास सांगितले.बाबाना संशय आला म्हणून त्यांनी पालेकर ला शुक्रवारी दुपारी गाठले आणि खरे काय ते जाणून घेतले त्यात त्यांना कळले की पालेकर ला पुंड ने प्रत्यक्षात जेवढी रक्कम दिली होती  त्याच्या चौपट वाढवून बाबाना सांगितली गेली होती..त्यांना राग आला.शुक्रवारी सायंकाळी  त्यांनी पुंडला फोन करून त्याचा खोटारडेपणा कसा उघडा पडला आहे हे सांगितले.आपली भागीदारी तुटली तर .... याचे पुंड ला टेन्शन आले.तो म्हणाला की मी पालेकर ला तुमच्या समोर बोटीवर  हजर करतो ,तो सांगेल की तो तुमच्याशी खोटे बोलला दुपारी.मी टीमला जेवढी रक्कम दिली असे सांगितले आहे ती तो मान्य करेल.

अर्थात वडलाना हे पटल नाहीच.पुंडहा पालेकर ला लाच देऊन काहीही कबूल करायला लावेल हे त्यांना माहीत होते.” कायाम्हणाली ”

“ मग त्यानुसार पुंड बोटीवर गेला? ”पाणिनी ने विचारलं

“ गेला. त्याने तिथे वडिलांशी झटपट केली घाबरवण्याचा प्रयत्न प्रयत्न केलं,पण बाबांनी त्याला एका ठोशातच खाली पाडले, तो ज्या होडक्यातून बोटीवर आला होता त्याचे  बोटीला बांधलेले दोर  कापून ते होडके  बाबांनी  खाडीच्या पाण्यात सोडून दिले .स्वत:ची होडी घेऊन ते किनाऱ्याला आले.आता पुंड चा परतीचा मार्ग बंद झाला होता. तो बोटीवरच अडकणार होता.त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा बाबांचा विचार होता. पण त्यांनी मला फोन करून हकीगत सांगितली तेव्हा मी गाडीत बसून बाबाना भेटायला गेले.त्यांना मी सांगितले की पुंड काय अवस्थेत आहे अत्ता, हे समजल्याशिवाय पोलिसांना कळवणे योग्य होणार नाही.मी पुन्हा बाबांची छोटी होडी घेऊन बोटीत गेले, तिथे पुंड केबिन च्या उंबरठ्याला डोक टेकलेल्या अवस्थेत मृत होऊन पडलेला दिसला.”कायाम्हणाली.

“ तू पोलिसांना का कळवले नाहीस? ”पाणिनी ने विचारलं

“ बाबांच्या पूर्वीच्या आयुष्यात त्यांचे हातून एकाचा  झटापटीत मृत्यू झाला होता. कोणीच साक्षीदार नसल्याने त्यातून बाबा सुटले  तेव्हा परंतू आता हे प्रकरण पोलिसांना सांगितले असते तर त्यांनी कदाचित पूर्वीच्या प्रकरणाची पाळेमुळे  खणून काढली असती.”

“ मग तू काय केलंस? ”पाणिनी ने विचारलं

“ मी बाबाना पुंड काय अवस्थेत आहे हे सांगितलं .ते त्या बोटीवर नसल्याचा पुरावा निर्माण होणे आवश्यक होते.त्या दृष्टीने मी हालचाली चालू केल्या.प्रबोधआणि त्याच्या लोकांनी सर्फ अॅण्ड सन हॉटेल मधे बैठक ठेवली आहे हे मला समजले होते.कारण त्यानेच  शुक्रवारी  उशिरा आणि पुन्हा शनिवारी सकाळी फोन केला होता आणि बाबांना निरोप द्यायला सांगितले होते.मी बाबांचा उजवा हात जतीनभारद्वाजयाला, मला घेऊन  तातडीने हॉटेल वर चल असे सांगितले.पण तो पर्यंत प्रबोधने हॉटेल सोडले होते.”

“ मग तू काय केलंस? ”पाणिनी ने विचारलं

“भारद्वाज हा प्रबोध च्या च मित्र मंडळीपैकी एक आहे असे भासवून त्याला हॉटेल मधील तीच खोली आणखी एका दिवसासाठी घेण्यासाठी सांगितले. ”

“ आणि मग तू तिथे सर्व समान रचून मीटिंग चा आभास निर्माण केलास?”पाणिनी ने विचारलं

“ बरोबर ”कायाम्हणाली.

“ वडील कुठे होते तेव्हा?” पाणिनी ने विचारलं

“ आपण ज्या मोटेल मधे त्यांना शोधून काढल , हाय वे वरच्या तिथे  ”

“ पोलिसांना कस कळल ते तिथे आहेत म्हणून?”पाणिनी ने विचारलं

“ मीच जतीन ला  सांगितलं की पोलिसांना निनावी फोन कर करून वडील तिथे असल्याची टीप दे.”कायाम्हणाली.  “ हा फोन करण्याची वेळ आम्ही अशी साधली होती की आपण त्या हॉटेलात  पोचण्याच्या अगदी थोडाच वेळ आधी पोलीस तिथे पोचतील.”

“ ....आणि वडिलाना सर्फ हॉटेल च्या खोलीची किल्ली त्यांच्या  खिशात असल्याचा विसर पडणं आणि तू आठवण केल्यावर त्यांनी ती त्यांच्या खिशातून अनाहूत पणे बाहेर काढणं ही सर्व तुझी पूर्व नोयोजित खेळी होती?” पाणिनी ने विचारलं

“ हो .मी प्रबोध ला सुद्धा विनंती केली की त्याने त्या मीटिंग मधे कोण होते  विषय काय होता  वडील होते का या बद्दल काहीही वाच्यता करायची नाही . खोटे नाही सांगायचे परंतू बोलायचेच नाही.”

“ तू बोट क्लब वर किती वाजता पोचलीस ?”

“ वेळ नाही लक्षात पण अंधार होण्यापूर्वीच पोचले आणि बाबांकडून झटापटीचे कळल्या नंतर लगेचच होडीत बसून बाबांच्या बोटीत जायला निघाले.” काया म्हणाली.

“ पुंडचे प्रेत  केबिन च्या उंबरठ्या जवळ होते असे तू म्हणालीस .डोके उंबरठ्यावर होते का? ” पाणिनी ने विचारलं

“ वर नव्हते पण उंबऱ्याला लागून होते.” कायाम्हणाली.

“ पोलिसांना जेव्हा प्रेत सापडले तेव्हा ते त्या जागी नव्हते.”पाणिनी म्हणाला

“ बरोबर आहे जेव्हा भरती ओसरली तेव्हा प्रेत केबिन च्या उजवीकडच्या बाजूला सरकले.” कायाम्हणाली.

“ रक्त लागलेल्या पायांच्या ठशाचे काय? ”पाणिनी ने विचारलं

“ मला आधी जाणवलच नाही माझा पाय रक्ताच्या थारोळ्यात पडलाय म्हणून. थोड्या वेळाने मला पायातील बूट जमिनीला  चिकटत असल्याची जाणीव झाली तेव्हा कळले की बुटाला रक्त लागलं म्हणून.तिथून मी लगबगीने होडीत बसून परत जाताना बूट स्वच्छ धुतले पाण्यात.मला वाटलं होत की सर्व रक्त निघून गेलं असेल पण झालेलं नाही असं माझ्या लक्षात आलं म्हणून मग मी ते बूट कागदात गुंडाळून बस स्टँड  मधल्या लॉकर मधे ठेऊन दिले ”कायाम्हणाली.

पाणिनीने अस्वस्थ पणे येरझाऱ्या घालायला सुरवात केली. “ या सगळ्या घोळातून बाहेर पडायचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे.तुझ्या साठी किंवा तुझ्या वडिलांसाठी नाही पण सौम्या साठी.......” पाणिनीपुटपुटला.अचानक त्याला काहीतरी सुचलं म्हणून फोन हातात घेतला.

“ काया, ते डेलचा  पाठलाग करत नव्हते, तुझा करत होते. तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे लक्ष होते. म्हणजे एकापेक्षा जास्त हेर नेमले असावेत तुझ्यावर नजर ठेवायला.मला सांग, तुझ्या पर्स मधून लॉकर ची पावती पडली खाली तेव्हा तीज्या माणसाने उचलून सौम्या च्या हातात दिली तो कसा होता दिसायला?”पाणिनी ने विचारलं

“ पन्नाशीचा माणूस वाटत होता , करड्या  रंगाचा सुट घातला होता ”

“ पोषाखाचा तपशील नको. त्याचे डोळे कसे होते? डोक्यावरचे केस? ”पाणिनी ने विचारलं

कायाने संभ्रमाने  मान हलवली. “ त्याचं नाक जरा विचित्र वाटलं. खूपच जाड भरड होत.” कायाम्हणाली

“ तुटलेल असावं तसं ? ” पाणिनी ने विचारलं

“ बरोबर तसाच वाटत होतं ”

“ केवढा होतो उंचीला हा माणूस?”

“ मध्यम ” कायाम्हणाली.

“ वजनदार होता?” पाणिनी ने विचारलं

“ असावा खांदे रुंद होते.”

पाणिनीने मगच पासून हातात धरून ठेवलेल्या फोन वरून कनकओजस ला फोन लावला.कायाने केलेले त्या माणसाचे वर्णन त्याने ओजस ला लिहून घ्यायला लावले. “ कनक, पोलिसांच्या ताफ्यात मी वर्णन केलेला कोणी गुप्त हेर आहे का तपास काढ. पूर्वी म्हणजे त्याच्या ऐन तारुण्यात असताना तो मुष्टी युद्ध किंवा तत्सम स्पर्धा  खेळलेला असावा.कायाच्या पर्स मधून पडलेली लॉकर ची पावती याच माणसाने उचलून सौम्या च्या हातात दिली. तो पोलिसांचाच माणूस होता आणि पोलिसांनीच मुद्दामच सौम्या ला यात अडकवण्यासाठी ती  पावती सौम्या च्या हातात  कोंबली असं मी दाखवून देणार आहे. ” पाणिनी म्हणाला

“ लक्षात आलं माझ्या ” ओजसम्हणाला “ पण तुला वाटतं तेवढे हे सोपे नाही......”

दारावर टकटक झाली.पाणिनीने शांत पणे फोन ठेवला.दार उघडले.बाहेर इन्स्पेक्टर तारकर उभा होता.त्याच्या बरोबर दोन पोलीस होते.त्याच्या चेहेऱ्यावर मंद स्मित पसरले होते ,त्यात प्रचंड आत्मविश्वास होता.

“ तुला सांगितलं होतं मी पाणिनी, मी पुन्हा येईन , आणि त्यावेळी तू तिला वाचवू शकणार नाहीस. आम्ही आता तिच्यावर थेट आरोप पत्र ठेवतोय ”तारकरम्हणाला.

“ शेवटी हे झालच.” पाणिनीकाया कडे बघून कठोर पणे म्हणाला.

“ बाबा कुठे आहेत बघा आधी आणि......” कायाउद्गारली.

“ वेडेपणा करू नको.ज्या अर्थी तुझ्यावर आरोप करताहेत त्या अर्थी.......” पाणिनीम्हणाला

“ तुझ्या वडिलांशी आमचा संपर्क झालाय.” तारकरने वाक्य पुरे केले.

 

(प्रकरण पंधरा समाप्त)