Get it on Google Play
Download on the App Store

काय तुझ्या मनांत

सागं माझ्या कानांत...!

घर प्रत्येकाचे विसाव्याचे स्थान.नोकरी करुन जेव्हां आपणं थकून ,भागून घरी येतो तेव्हां आईच्या किंवा पत्नीच्या हातच्या चहाने आपला थकवा चहाच्या वाफेत विरुन जातो. त्या घरातं आपली हक्काची माणंस असतातं ,घराला घरपण देणारी.आपण कामावर निघालो किंवा कामावारुन घरी आलो कि आपल्या पुढ्यात चहा-नास्ता देण्या करीता घरच्या मंडळींची लगबग आपण नित्य अनुभवत असतो.

अगदी तशीच लगबग घरातल्या नित्य उपयोगी वस्तूंची ही दररोज होत असते.हे आपणांस ठाऊक आहे कां ? आज मी त्यांच्यातील अनोखा संवाद,विनोदी शैलीत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

चला तर पाहूयां काय चाललंय किचन मध्ये

अनेक गृहिणींना प्रत्येकवस्तू त्या त्या ठिकाणी ठेवण्याच्या सवयी मुळे त्यांना ते सहज सापडतं...ताईचे सरावलेले हात,बैठकिचे कामे उरकित होते...तोच कोणी तरी शुक शूक करुन त्यांना बोलावित आहे असे वाटले.. माझे कान टवकारले...

पातेले : का गं ताई , आज तुझी घाई ? चहाचे आंदण ठेवत म्हणाले.

शेगडी : आज तिला आहे घाई !!!
लायटर : कां गं बाई ?

डबा : अगं बायांनों, आज आपल्या ताईचा वाढदिवस आहे नां ..!

सर्वे : खरचं की..

आणि सायंकाळी तिला तिच्या ह्यांच्या सोबत लाँगं ड्राईव्हलां जायायचें आहे.चहाचे पातेले उतरवित साणसी  म्हणाली...

अगं ब-याच वर्षांनी दोघे निघाले फिरायला,तुम्ही लागा तिच्या मदतीला... केरसुणीने कचरा आवरत म्हटलें.

मगं तर आजचा मेनू लयभारीचं म्हणायचं ! ताईच्या घशांत चहाचा घोट जाताचं ओठाला लागलेले कप म्हणाले...

लाटणे : अगंबाई..सूनबाई...

ताई तशीच्..सूनबाई...

लगबग सुरु दोघींची
कसरत आम्हा सर्वांची

पुरणपोळी परतवतांना तुप सोडत कावीलता म्हणें तव्याला खरपुस भाज रे पुरणपोळीला.

कढई :  मी तळते पु-या अन् भजे...

कढईतंले तेल नाचू लागताचं..

झारा :  मी काढतो पु-या अन् भजे तो अलगद परातीत ठेऊ लागला.

कांदेचीरता,चीरता विळी म्हणाली आज बट्याट्याचीच भाजी नां... आमरस,शेवय्या त्यावर साजूक तुपाची धार इति चमचें मंडळी

उदर तृप्त होता..
नाव घ्यावे गृहिणींचे...

वामकुक्षी त्यांची
आणि...आमचीही

संगीतमय वातावरणांत गीटारच्या गाण्यांवर सर्वांनींच ताल धरला...

बार.. बार...दिंन यें आयें....
Happy Bday to you

थाळी-चमच्यानेही संगीताला साथ देत सर्वांचे तोंड केले गोड.

Well-Come आरश्यावर लिपेस्टीकने लिहीलेलें ते वाक्य पाहून ती Flashback मध्ये गेली..तोच...
हम जब होंगे साठ सालके और तुम होगी पचपन की...बोलो..प्रित... बाहेर आमचे  हे...गाणं गुणगुणतं होते...

कंगवा ताईकडे एक कटाक्ष टाकत... हसतं..हसतं...साहेबांची आवडती हेअर स्टाईल नां...
किंचीत लाजतं...हंs..ही...साडी नेसू कि...ही..?
टिकली : अ..हं..साडी नाही हं..ड्रेस त्यावर ही उभी टिकली लयभारी...

सगळ्यांना बायsss

चप्पल : ताई,राहूदे मला आज घरी...सँडलच शोभे तुला लयभारी...

स्मित हास्य करीत बाईक वर बसताच् बाईक म्हंणाले,ताई तुझे दिसणे,हसणें सायबांनी टिपले बरें...

यें...रातें ये..बातें नदीकां किनारा.. ये.. चंचल..हवा...
बाईक हवेच्या वेगानें  निघाली...

( अरे हे कायं...तुमच्याही घरच्या वस्तू बोलतातं कि...निट कानं देऊन ऐंका बरें )

समाप्त   

लेखक : विनोद डंबे-डोंबिवली.
१२/०४/२०२१.

माझे लेख

विनोद डंबे
Chapters
पती स्वर अरुण मित्रायनमः काय तुझ्या मनांत