प्रेमाची वैज्ञानिक परिभाषा...
अपेक्षा ज्ञानेश्वर कोठे
Msc third sem RTMNU Campus.
प्रेमानी दिली शरिराला भेट,
डोळ्यानीही उघडला नजरेचा गेट,
वाटल अचानक झाली पहाट,
कुठंन आली ही निराळी लाट,
डोक्याने निर्माण केला कंप,
प्रेमाला बाहेर टाकण्यासाठी पुकारला त्याने संप,
केला त्याने त्वरीत संदेशांचा स्त्राव,
व immunity ला म्हणाला विल्हेवाट लाव,
पण प्रेमाच्या antigen चा कळत नव्हता आकार,
Antibody च उद्देश्य कसा होणार साकार?
अपयशी ठरत होते सारे डाव,
विजय मिळवत होता प्रेमाचा भाव,
पेशी, उती, संस्थेवर मिळवलं प्रेमाने राज्य,
धोक्यात येऊ लागल डोक्याच स्वराज्य,
वाहणारच होता डोक्यात हरण्याचा वारा,
त्वरीतच दिला त्याने कराराचा नारा,
आजपासुन दोन भागात असेल शरिराचा जीव,
डोक्यानंतर ह्रदयच असेल महत्त्वपुर्ण नींव,
Cardiac muscles मध्ये आहे तुझं सिंहासन,
तेथुनच कर तु आजपासुन शासन,
प्रेमानी झटकन ओळखली ह्रदय व हृदयाची शक्ती,
जेथून साध्य होणार होत्या साऱ्या युक्ती,
प्रेमाच्या त्रासाने डोक्याला होतो ताप,
तर प्रवेश देणाऱ्या डोळ्याला होतो पश्चाताप..