आयुष्य आणि नाती
कार्व्हर यांनी वयाच्या चाळीशी पर्यंत लग्नाच केले नव्हते. पण चाळीशी असताना त्यांना सारा एल. हंट नामक एक प्रायमरि स्कुल टीचर आवडायला लागली होती. ती टस्केगी युनिवर्सिटीच्या खजिनदाराची म्हणजेच वॉरन लोगन यांची मेहुणी होती. त्याचे प्रेमसंबंधांचे धागे तीन वर्ष तुटले नाहित. साराला कॅलिफोर्नियात काम मिळाल्याने ती तिकडे रुजु झाली.
कार्व्हर यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी एका इसमाला आपल्या संशोधन कार्याचे वारसदार घोषित केले होते. शास्त्रज्ञ अॉस्टिन डब्लु करटिस ज्यु. हे कृष्णवर्णीय होते. त्यांचे शिक्षण कॉर्नवेल युनिवर्सिटी मधुन झाले होते. त्यांच्याकडे अध्यापनाचा अनुभवही होता. ते टस्केगी युनिवर्सिटीमध्ये येण्या आधी पासुन शिकवायचे. कार्व्हर यांनी आपल्या शोधंची रॉयल्टी कर्टिस यांना दिली होती.असे वक्तव्य त्यांच्या एका चरित्रात केले गेले आहे. कार्व्हर यांच्या निधनानंतर कर्टिसला टस्केगी मधुन काढण्यात आले. नंतर कर्टिस डेट्रॉईटला निघुन गेला. तिथे त्याने शेंगदाण्या पासुन ब्युटि प्रॉडक्टस बनवण्याची कंपनी चालु केली.