Get it on Google Play
Download on the App Store

महाविद्यालयीन शिक्षण

वरिल फोटो कार्व्हर यांचा प्रयोगशाळेत काम करताना काढलेला आहे.

हायलँड युनिवर्सिटी कॅनसस मध्ये प्रवेश मिळण्याआधी अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला होता. जेंव्हा कार्व्हर कॉलेजमध्ये गेला तेव्हा तो कृष्णवर्णीय असल्यामुळे त्याला कोणीही वर्गात प्रवेश दिला नाही.कार्व्हर यांनी १८८५ मध्ये जे. एफ. बिलर बरोबर गाडीतुन हायलँड ते नेस काऊंटी कॅनसस मधील एडन टाऊनशीप पर्यंत प्रवास केला. बिलरच्या घराजवळ त्यांनी एक जमीन करारावर घेतली होती. तिथे कार्व्हर ने एक छोटी काचेच्या भिंती आणि काचेचे छप्पर असलेली संरक्षिका म्हणजेच कॉन्झरवेटरी बांधली होती. यामध्ये कार्व्हर यांनी झाडेझुडे, फुले आणि बरेच भौगोलिक संकलन ही ठेवले होते. त्यांनी तेथील जवळच्या १७ एकर म्हणजेच जवळजवळ ६५००० स्क्वेअर मीटर इतक्या जमीनीत भात, मका, भारतीय मका, भाज्या, फळे, काही जंगली वनस्पती, झुडपंही स्वतःच्या हाताने पेरले होते. तेंव्हा कार्व्हरने जवळच्या शहरात मिळेत ती नोकरी करुन उदरनिर्वाह चालवला. वेळप्रसंगी त्याने पैश्यासाठी गुराख्याचेही काम केले.

१८८८ च्या सुरवातीच्या काळात कार्व्हरने बँक ऑफ नेस सिटी या बँकेचे तिनशे डॉलरचे म्हणजे आत्ताच्या काळातले अंदाजे तीस हजार डॉलर इतके पैसे शिक्षणासाठी कर्जाऊ घेतले होते. १८८८ च्या जुन महिन्यापर्यंत त्याने ते शहर सोडुन दिले होते आणि आपले बस्तान नव्या शहरी बसवले होते.१८९० साली कार्व्हर पियानो आणि कला क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी लोवा येथील सिंपसन कॉलेज ऑफ ईंडियानोला येथे प्रवेश घेतला. त्याचे कला शिक्षक एट्टा बड यांनी कार्व्हरची झाडे आणि फुलांबद्दलची आवड हेरली. तिने कार्व्हरला एम्स मधील लोवा शहरातील स्टेट अॅग्रीकल्चरल कॉलेज (आत्ताचे लोवा विद्यापीठ ) येथे वनस्पतिशास्त्र शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

१८९१ साली शेतकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. त्याच्या वर्गातील कार्व्हंर हा पहिला आणि एकमेव कृष्णवर्णीय विद्यार्थी होता.त्याने १८९५ साली पदवी अभ्यासक्रमामधील प्रबंधासाठी "मानवाने परिवर्तन केलेली झाडे" हा विषय निवडला होता. लोवा महाविद्यालयाचे प्राचार्य जोसेफ बड आणि लुईस पॅमेल यांनी कार्व्हरची बुद्धिमत्ता आणि विषयांमधली आवड पाहुन त्याच महाविद्यालयातुन पदव्युत्तर पदवी घेण्याचा आग्रह केला.कार्व्हरने प्राचार्य पॅमेल यांच्या मार्गदर्शनाखाली  लोवा महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पुढची दोन वर्षे संशोधन केले. दोन वर्ष त्याने झाडांच्या रोगनिदानाबद्दल आणि बुरशी प्रक्रियेबद्दल संशोधन केले. या प्रयोगांमुळे त्याला प्रथमच राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळाला होता. कार्व्हरच्या याच कामगिरीमुळे त्याला प्रथमच वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणुन ओळखले गेले.१८९६ साली कार्व्हरचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पुर्ण झाले. कार्व्हर हे लोवा महाविद्यालयातील पहिले कृष्णवर्णीय प्राचार्य ठरले.

कार्व्हर यांचा बर्‍याचदा "डॉक्टर" असा उल्लेख केला जात असे, परंतु त्यांना कधीच अधिकृत डॉक्टरेट मिळाली नव्हती. त्यांच्या ओळखीचे लुईस पॅमेल हे एकदा म्हणाके होते की, "कार्व्हरला त्याच्या बुद्धीमत्तेमुळे, कौशल्य व वनस्पतिशास्त्र क्षेत्रातील विशिष्ट प्राविण्यमुळे अाणि कार्व्हरच्या शिक्षणाची अपुरी किंवा चुकीची माहिती असल्याने लोकांनी चुकुन दिलेले पदनाम आहे." लुईसच्या या वक्तव्या नंतर सिंपसन महाविद्यालय आणि सेलमा विद्यापीठाने "ऑनररी डॉक्टरेट ऑफ सायन्स" याने कार्व्हर यांना सन्मानित केले. लोवा विद्यापीठाने त्यांना १९९४ मध्ये "डॉक्टरेट ऑफ ह्युमन लेटर पोस्टह्युमसली" याने सन्मानित केले.