भारताच्या विविध राज्यात
दक्षिण भारत-
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शिवाचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
काश्मीर-
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात.पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.