Get it on Google Play
Download on the App Store

बाळकृष्ण

मध्यरात्रीची वेळ. धनदाट अंधकार पडला होता. विजा चमकत होत्या. दग गडगडत होते. पावसाची झडी लागली होती. थंडी- मुळे सर्व जग अंगाची मुटकुळी करून गाद झोपी गेले होते. अशा वेळी कैदेतच देवकी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. कळीच्या नावाने येऊन त्याला प्रदक्षिणा केली. देवकीला शुभ लक्षणे भासू लागली. पण आपल्या भावाचा हट्ट आणि अत्याचार यांचा विचार मनांत येतांच तिच्या अंगाचा थरकाप उडाला. चेहेऱ्यावर निराशा पसरली. वसुदेवाचे हृदय मरून आलें. म्हणाला- “दे स्या तान्याला माझ्याकडे, कोठे तरी पोहोचवून येतो." 'डोळे भरून पाहू दे तरी थोडा वेळ." देवकी म्हणाली. आणि तेवढयांत कंसाच्या रूपाने त्याचा कर्दनकाळ येईल." वसुदेव म्हणाला. देवकीनें नीट गुंडाळून एका टोपलीत घाचन एका दुपयांत त्याच्या स्वाधीन केलें. वसुदेव काही विचार न करतां तक निघाला आणि जससजा तो जाऊं लागला तसससे एकेक दरवाजा उघडत गेला. पाहारे- कन्यांना गाढ झोप लागलेली होती. तो मथुरा नगरीच्या बाहेर निसटून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. पण अंधार म्हणजे मी म्हणत होता. पाटेचा अंदाज येत नव्हता. तरी सो मन घट्ट करून चालला होता. तेवळ्यांत त्याला प्रकाशाचा झोत दिसला. बाटले बहुतेक कंसाने आपल्या शोधासाठी मशाली घेऊन लोकांना पाठविलें आहे. त्याने तलवारीच्या मुठीवर हात ठेवून मागे वळून पाहिले. पण आजूबाजूला कोणीच नव्हते. प्रकाशाची किरण सुद्धा काटनाहि येत नव्हती. ती येत होती त्याच्या डोक्या- बरील टोपल्यातून. यमुना नदी दुथडी भरून वाहात होती. पाण्याच्या आवाजानें कांटनच्या बसत होत्या. प्रवाहांत मगर, सांप बगैरे जीव-जंतु बरेच होते. पाण्यात पाऊल टाकावयाची वसुदेवाला हिंमत होत नव्हती. पण दुसरा मार्ग नसल्या- मुळे तो तसाच पाण्यात शिरका. पाण्याला पाऊल लागतांच नदी दुभंग झाली आणि तिने त्याला वाट करून दिली. बसुदेव नदी पार करून पैलतिरी गेला. ल्याला आठवलें तेथून जवळच नंद नांवाच्या त्याच्या मित्राचे घर होते. त्या मित्राला वसुदेवाने कंसाच्या आज्ञेवरून मारले होते व साखळदंडाने जखडले होते. त्याच मित्राने आपल्या बाळाला संभाळले तर किती बरें होईल, त्याच्या मनांत आले. पण ते कसे जमणार ! असा विचार करीत तो बाट चालत होता. बोगायोग असा की त्याच वेळी नदंहि आपल्या मृत नवजात कन्येच्या अंत्य- क्रियेसाठी आला होता. बाळंतपणाच्या वेळी यशोदा बेशुद्ध पडल्यामुळे तिला काहीच कळले नाही.

दुसऱ्या दिवशी गांवांत इंद्र यज्ञाचा महोत्सव व्हावयाचा होता, पण या मुतकन्येची वार्ता गांवांत पसरली तर यज्ञांत बाधा होईल म्हणून तो मुकाट्याने तिला उचलून घेऊन आला होता. चाहूल ऐकून वसुदेव म्हणाला-"कोण ? नंदच की काय! परं झालं." "कोण वसुदेव ?" तो म्हणाला. त्याच्या मनांत आले, याच वसुदेवाने मला मरमर मारले आणि माझ्या हातां पायांत साखळ- दंड घातला आणि तोच........! पण छे। मी उगाच कशाला त्याला बोल लावू. कंस महाराजाची आज्ञा मोडण्याची त्याची माज्ञा नव्हती. त्याने किती तरी वेळा मला मदत नाही का केली! पण हा या वेळी येथे कसा येऊ शकला? आणि कशासाठी आला असावा. असा विचार करीत करीत तो वसुदेवाजवळ येऊन पोहोचला. दोघांनी एकदेकांना ओळखलें. " रात्रीच्या अशा तूं भयानक वेळी येथे कसा ! सर्व काही ठीक आहे ना नंदा!" बसुदेवाने प्रेमळ स्वरांत विचारले. नंदाने येण्याचे सविस्तर कारण सांगितले आणि म्हणाला " या मृत कन्येला फेकून देण्यासाठी आलो आहे." थोडा वेळ थांबून त्यानें वसुदेवाला विचारले-“ अन् तूं कसा?" " माझी कर्मकथा काय सांगू! तुला सर्व काही माहीतच आहे. पहिले सहा पुत्र कंसाने मारले. म्हणून सातव्याला घेऊन आलों आहे. तूंच याचे पालन कर." वसुदेव म्हणाला. "अरे पण कंसाला हे कळले तर तो मला जिवंत ठेवील तरी का?" असे म्हणत त्याच्या पोटची मुलगी मेलेली होती. यसुदेवाने कंसाच्या आजेने त्याला खुप मारले होते. तरी त्याचे हृदय कळवळले. एका अर्भकाला दुए कसाच्या हाती देण्यास त्याचे मन तयार होईना. म्हणून तो त्याला घेण्यास कबूल झाला. पण थांब मी अगोदर स्वच्छ स्नान करतो आणि मग घेतों स्थाला." नंद म्हणाला. इतक्यांत पाताळ गंगेने त्याला स्नान घातले. त्याने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले. "कोण कोणाला सांगायला जातो आहे! आपल्या दोघांतच हे" असे म्हणत त्याने शिशूला नंदाच्या स्वाधीन केलें, "माती चांगलीच जड दिसते आहे?" नंद म्हणाला. तोच विष्णु सेवक गरुड, शंख, चक्र, शाई कौमोदकी बगैरेंनी येऊन. त्या बालकाला नमस्कार केला. हे पाहून नंदानेंहि मस्तक बाकविलें, आश्चर्य ! त्याच क्षणी त्याची बेडी निखळून पडली व तो मोकळा झाला. दोषांना बालकाच्या खुणा समजल्या. “नन्दा बाळाला नीट संभाळ." "कांही काळजी करूं नकोस. पोटचा पोरच समज माझा. या गांवचा राजाच होणार माझा पाळ. गांवांत जेथे जाईल तेथे दूध, दही, कोणी मिळेल बाला." मैदानें सांगितलें व दोघे जड पावलांनी आपापल्या मार्गाला लागले.

वसुदेवाच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. पाहिले तर नदाची मुलगी रडत असलेली दिसली. वसुदेवाने विचार केला, मुलास मूल. हेंच देवकीच्या पुन्यांत ठेवावे. लगेच तो तिला उचलन घेऊन गेला आणि आपल्या चंदिगृहांत जाऊन देवकीच्या पुढे ठेवले. त्या दिवशी रात्री फैसाला भयंकर स्वमें पडत होती. त्याला दिसले की समुद्रात धके खाणान्या नावेप्रमाणे राजवाडा हालत आहे. धरणीकंपामुळे सारी मथुरा हेलकावे खात आहे. काळ्या कुरूप मातंग कन्या त्याच्या भोवती गोळा झाल्या असून त्याला मद्याचे प्याले भरभरून देऊन अंगलट करीत आहेत आणि कंस त्या किळसवाण्या खियांना दूर लोटत आहे. इतक्यांत त्याला दिसले की एक अकाळविक्राळ राक्षस आपल्याकडे येत आहे आणि म्हणत आहे की मी मधूक मुनीश्वराचा शाप आहे. आतां तुझे दिवस भरलेच समज. हा मी तुझ्यात प्रवेश करतो. अरे ए कंसाच्या भाच्या, तूं आतां येथून जा. संपलें तुझे काम. कंस एकदम खडबडून जागा झाला व पलंगावर उठून बसला आणि आपल्या यशोघरा नांवाच्या दासीला बोलावून विचारले की येथे मातंग खिया आल्या होत्या का! तिने 'नाही' म्हणून सांगतांच त्याने बालाकी नांबाच्या सेवकास पुरोहिताकडे पाठवून विचार विलें की धरणीकंप, उल्कापात, वादळ बगैरेंचे काय कारण आहे। त्याने परत येऊन सांगितले की ते म्हणत आहेत की आज आदिपुरुष मूतलावर अवतरले आहेत. कंसाचे काळीज चरकलें. तरी सुद्धा त्याने अवसान आणून त्याला पुरो- हिताकडे पाठविले, म्हणाला-" कोणाच्या घरी त्याने जन्म घेतला आहे आणि त्याला आतां अवतार घेण्याचे काय कारण?" चालाकी बाहेर गेला आणि मागे फिरून बातमी आणली की वसुदेवाला मुलगी झाली आहे. कंसाला त्यावर विश्वास झाला नाही म्हणून त्याने बसुदेवाला विचारले. तो म्हणाला “देवकीच्या कुशीत कन्याच आहे." त्या मुलीला न मारण्यासाठी सर्वांनी कंसाला सांगितले. परंतु त्याने कोणाचे ऐकलें नाही. " मुलगा बसू दे की मुलगी वसुदेवाचे संतान माशा काळ आहे. त्याला नष्ट केलेच पाहिज," म्हणून तावातावानें तो गेला.

वसुदेवाचे हृदय धडकले. त्याच्या मनात आले की आपण या मुलीला येथे आणल्या मुळेच ती मरणार. आपल्याला पाप लागणार. का आपण आपल्या मुलाला याच्या स्वाधीन करावें ।.....पण कां। नको. ही मुलगी तर मेलीच होती. म्हणून तिचा बाप तिला टाकून गेला होता. म्हणून आपल्याला पाप लागणार नाही. त्याने आपले मन शांत केलें. कंसाने देवकीच्या हातांतून त्या मुलीला ओढून घेतले. त्या सुलक्षणी मुलीला मार- ज्याची त्याला इच्छा होईना. परंतु देवकीचे सातवें संतान होतें तें. त्याला मारलेच पाहिजे. म्हणून त्याने जोराने तिला दगडावर आपटले, " कंसा, तुझ्या नाशासाठीच मी वसु- देवाच्या कुळी जन्मलें आहे." असे म्हणत त्या कन्येनें क्षणभर कात्यायिनीचे रूप धारण केले व अदृश्य होऊन गेली. पाहाट होऊ लागली. अशुभ टाळण्यासाठी तो अधीर होत चालला होता. कृष्णाच्या आगमनापासून सर्व गोकुळ आनंदसागरांत बुडून गेले होते. गाई, गवळी कृष्णलीलेत मस्त झाले होते. कृष्ण बहा दिवसांचाच होता. पूतनानें दूध पाजण्यासाठी त्याला घेतले. पण ती दुष्ट राक्षशीण तकाळ मरून गेली. एका महिन्याचा असतानाच त्यानें शकटासुराला मारून टाकले. पुढे कृष्णाच्या विरुद्ध दही लोण्याच्या चोरीच्या फार तकारी आल्याने यशोदा मातेने त्याला उखळाशी बांधले. तें उखळ ओढत ओबत माळकृष्ण दोन अर्जुन झाडांच्या मधे घेऊन गेला आणि ती दोन्ही झाडे पाडून टाकिली. त्या झाडाल यमल अर्जुन नांवाचे दोन राक्षस होते. ते मरून गेले. एकदा एक पलम्ब नांवाचा राक्षस नंदाचे रूप घेऊन आला व तो बलरामाला घेऊन जाऊ लागला. ते कपट बलरामाच्या ध्यानात येताच त्याने एक असा ठोसा त्याच्या नाकावर मारला की तो तिरिमिरी येऊन खाली पडला तो उठलाच नाही. असाच आणखी एके दिवशी धेनुक नावाचा राक्षस गाढवाच्या रूपाने ताडाच्या वनांत आला. त्यालाहि कृष्णाने पाय पकडून दगडावर आपटून मारले, केशी राक्षस घोड्याच्या रूपाने आला होता. त्याला कृष्णाने मारतांच त्याचे दोन भाग झाले व तो मरून गेला. एक दिवस कृष्ण गोपगोपींच्या बरोबर रासक्रीडा खेळत होता. त्यावेळी अरिष्टवृषभ आला. त्यामुळे सर्वजण घाबरून सैरावैरी पळू लागले. परंतु कृष्णाने त्याला मारून टाकून सर्वांचे संकट दूर केले. याच वेळी काही गोपाळांनी येऊन सांगितले की वलराम का लियाशी झुंज करीत आहे. हे ऐकून कृष्ण कसा स्वस्थ बसेल? तो धांवला कालियाच्या घराकडे. त्याचा गर्व भंग करण्यासाठी त्याने यमुनेंत उडी मारली. गोपगोपींनी तिरावर असलेल्या लोकांनी कृष्णाला पाण्यात न उतरण्याविषयी सांगितले, एक वृद्ध गृहस्थ म्हणाला-"अरे, हिंस पशु सुद्धा त्या ठिकाणी पाणी पिण्यास गेले तरी परत येत नाहीत. मग तू कशाला आपले प्राण घोक्यांत पाळतोस." पण कृष्णाने कोणाचे ऐकले नाही. कृष्ण कालियाच्या फणांवर उभा राहिला आणि त्याला पायाखाली असें दाबलें की त्याला कायमची आठवण राहील. कालिया त्याला शरण गेला व तेथून निघून जाण्याचे त्याने कबूल केले. पण म्हणाला-" मला गरुत्मन्ताची भीति वाटते" कृष्ण म्हणाला- 'तुझ्या डोक्यावर माझ्या पायाचे चिन्द्र उमटल्यामुळे तुला कोणी त्रास देणार नाही." त्यानंतर तो कालिया समुद्रात निघून गेला. 

तेव्हांच एका शिपायाने येऊन सांगितले को बलराम व कृष्णाला कंसानें 'धनुर्भह' उत्सब पाहाण्यासाठी बोलाविलें आहे. इकडे कंस स्यांची वाट पाहात होता. ते दोघे फार पराकमी आहेत असे त्याने ऐकले होते. ते दोचें मथुरेत येतांच मंत्र्यां- कडून स्यांच्यावर दोन मस्त हत्ती सोडले, कृष्णाने त्यांचे दांत उपटून त्या दातांनीच त्यांना भोसकून मारले. राजवाड्यांत जातांना वाटेंत त्यांना मदनिका नांवाची कुबडी दासी मेंटली. तिच्या जवळून त्यांनी अर्गजा घेतला व आपल्या शरिराला फासला. कृष्णानें तिच्या कुबडावर थप्पट मारली त्याबरोबर तिचे कुबड जाऊन ती चांगली झाली. तिच्या तबकांतील फुलांच्या माळा घेऊन त्यांनी गळ्यांत घातल्या व पुढे निघून गेले. शस्त्रा- गाराजवळ तेथील रक्षक सिंहबलयाने त्यांना अडविले. त्याला मारून त्याच्या बाणाचे तुकडे करून टाकून ते दोघे स्यामवनांत गेले. दोघा भावांनी माजविलेला गोंधळ कंसाच्या कानावर गेला. त्याने त्या दोघांना मारून टाकण्यासाठी चाणूर व मुष्टिक नांवाच्या दोन मल्लांना तयार राहण्यास सांगितले, दरबारांत प्रवेश करतांच शिपायांनी त्यांना कंसाकडे इशारा कनान सांगितले की तें कंस महाराज आहेत त्यांना प्रणाम करा. परंतु त्यांनी दुर्लक्ष करून ते टाळले. फेस त्या दोघांकडे निरखून पाहात होता. कृष्णाचे तें पिळदार शरीर पाहून त्याला वाटलं हाच तर आपला काळ नसेल? त्याचे हत्य भडकले. त्याने आपल्या मल्लांना इशारा केला. दोघे मल्ल दोघांच्यावर धावून गेले. पण त्यांनी त्या मल्लांच्या मानगुट्या पकहल्या आणि क्षणार्धात त्यांना यमपुरीस पाठविले. क्षणाचाहि विलंब न करतां कृष्ण सिंहास- नाकडे धांवला. कंसाच्या शिष्या ओदन त्याला खाली पाडले आणि “जा यमलोकांत त्या मल्लांच्या भेटीला" म्हणून त्याच्या छातीवर बसून त्याला मारून टाकले. कंसाचे नोकर दोघांवर बांबून गेले. पण वसुदेवाने सांगितले की हे दोघे माझे पुत्र आहेत. एक रोहिणीचा व एक देवकीचा यांना कोणीहि कांहीं कर शकणार नाही. नंतर कृष्णाच्या आज्ञेवरून लोकांनी वसुदेव देवकीना कैदेतून सोडविलें. उग- सेनालाहि बंधमुक्त केले आणि त्याला पुन्हा गादीवर बसवून राज्याभिषेक केला.