गर्वाचे घर खाली
एका राज्यांत एक पहिलवान होता. तो कुस्ती खेळण्यांत फार पटाईत होता. त्याच्या- कडे कुस्ती शिकण्यासाठी फार दूर दूरहून लोक येऊ लागले. त्याच्या शिष्यांत एक तरुण फार हुशार होता. म्हणून त्याने कुस्तीतील सर्व डावपेंच त्याला शिकविले. सर्व विद्या शिकून झाल्यावर तो राजाकडे गेला आणि म्हणाला- आपल्या राज्यांत माझ्यापेक्षां उसम पहिलवान कोणी नाही. मी आपल्या गुरूला सुद्धां चीत करीन, कारण ते आतां म्हातारे झाले आहेत." त्याचें तें उर्मटपणाचे बोलणे ऐकून राजाला राग आला. तो म्हणाला-" असे काय? पाहून या मग खरी गोष्ट, तुम्हां दोघांची कुस्ती ठेवूनच पाहूं." ठरल्या दिवशी कुस्ती पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. गुरुशिष्य आखाव्यांत उतरले. गुरु जाणत होता की शिष्याची शक्ति जास्त आहे. येथे युक्तीनेच काम केले पाहिले. शिष्य जोरात त्याच्यावर धावून येतांच तो बाजूला सरला व एक नवीनच पेंच घालून शिष्याला पाडले. तो चीत झाला. धूळ झाडींत गुरगुरत शिप्य म्हणाला-"वा! वा!! हा पेंच कधी मला शिकविला होतात?" “काही काही पेच तुझ्यासारख्या शिष्यांसाठी राखून ठेवावे लागतात." गुरूनें सडेतोड उत्तर दिले.