Get it on Google Play
Download on the App Store

भाग २

सकाळी घड्याळाचा सहाचा ठोका झाला . सागरचे कान गच्च झाले . तो दचकून उठला . शितल अजूनही गाढ झोपेत होती . तिला हलवून हलवून उठवत सागर म्हणाला , " शितल ऽऽ ए शितल ऽऽ चल उठ आणि मला चटकन नाश्ता करून दे . मला आज लौकर जायचय . महत्वाची मिटींग आहे . " शितलने नाश्ता करून दिला . सागरने उभ्या उभ्याच कसबसं थोडसं खाल्ला नि गेला . जाताना " दुपारी मी जेवणाला उशीरा येणार . तेव्हा माझी वाट बघू नका . " असे म्हणाला . दुपारी जेवून शितलचे आई - बाबा आपल्या गावी निघून गेले . घरात शांतता पसरली . शांत घर कसे शितलला जणू खायलाच येत होते . तिला अतिशय कंठाळा आला होता . ती आराम खुर्चीवर गप्प निश्चिपपणे पडली . पूर्वी च्या सर्व आठवणी वहीच्या पानांसारखे तिच्या मनात परतत होते.

ती अगदी लहान होती . पाच - सहा वर्षाची होती . आई - वडिलांना एकलुती एक मुलगी . लाडात वाढलेली . अंबराई या गावात तिचे बालपण गेलेले . या गावात आंब्यांच खूप मोठं वन होते . त्याच्या थोड्या दूर अंतरावर लोकवस्ती होती . कधी कधी आंब्याच्या वनात ही एकटीच नाचत उड्या मारत  ' नाच रे मोरा आंब्याच्या वनात ... .. '   ' ये ऽ ये ऽ घारी माझ्या दारी ..... ' वैगरे गाणी गुणगुणायची . तिची आऊ ( आजी ) आण्णा ( अजोबा ) तिला कधी घराबाहेर पाठवायचे नाहीत . तिला घरची कामे करायला लावायचे . स्वतः आराम करायचे . तिचे आई - वडील दोघेही कामा निमित सतत घरा बाहेर राहात असल्याने ह्याची त्यांना जाणीव नसायची . अशा प्रकारे शितलची सतवणूक व्हायची . पण ती कधीच ह्याबद्दल आपल्या आई - वडिलांना सांगत नसे . उलट आऊच आणि अण्णाचं मोठेपण सांगे . कधी कधी आऊची आणि अण्णाची नजर चकवून ती शाळे ला जायची आणि तिथून अंब्याच्या वनात जायची.

शितल

रुपा लक्ष्मण रेडकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४