Get it on Google Play
Download on the App Store

भाग १

आज शितल - सागरच्या लग्नाची फस्ट अॅनवर सरी . दोघे मोठ्या उत्साहाने पार्टीची तयारी करत होते . मित्र - आप्तेष्ट मंडळी खूपजण येणार होते . पार्टी मोठ्या जल्लोषात होणार होती . पार्टीची सर्व तयारी आणि मित्र - आप्तेष्ट मंडळीची उठबस बघेपर्यंत संध्याकाळ कधी झाली कळलेच नाही . पार्टीसाठी खास मोठा हॉल भाड्याने घेतला होता . तिकडे शितल व सागर दोघे नटून थटून गेले . सर्व मंडळी उंची पोशाख घालून तसेच चकमकणाऱ्या सोन्या - हिऱ्‍यांच्या दागिने घालून इकडून तिकडून सळसळत होती . पण त्या सर्वांपेक्षा वेगळा , आकर्षक , सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे होते ते शितल - सागरचा पोशाख . पार्टीची वेळ झाली . सर्व मित्र - आप्तेष्ट मंडळी त्या हॉलमध्ये एकत्र आली .

सागरचा एक जिवलग मित्र माईक घेऊन स्टेजवर आला तो काही अनाऊन्स करणार . इतक्यात त्या लोंकाच्या घोळक्यातून एक म्हातारी आजी बाई स्टेजवर येऊन म्हणाली , " अरे , मेल्यांनो एवढं सगळं नटून थटून आलात . तुम्हाला एक काजळाचा ठिपका लावता आले नाही का ? तुम्हाला कुणाची तरी नजर लागली तर ..... " असे म्हणून तिने दोघांच्या गालांवर काजळाचा ठिपका लावला अन् गेली . लोकोमध्ये एकच हास्य खेळून गेले .

" शांती .... शांती .... शांती लॅडिज अॅन्ड जॅन्टलमॅनस जसे की , तुम्हाला माहितच आहे की , आज माझा मित्र सागर ह्याच्या लग्नाची फस्ट ॲनवरसरी आहे . तेव्हा इकडे आम्ही काही कार्यक्रम आयोजीत केले आहेत . तत्पूर्वी आपले सागर आणि शितल दोघे एकमेकांना हार घालतील , केक कापतील आणि वर जे रंगबेरंगी फुगे आहेत ते फोडतील . शितलच्या आई - वडिलांनी गुलाबाच्या विविध रंगानी सजवलेला हार दोघांना आणून दिला . तो हार त्यानी एकमेकांना घातला . फोटो काढण्यात तर आलेच . त्याच बरोबर शुटींगही सुरु केली . मोठ्या हृदयाच्या तांबड्या रंगाच्या सिहांसनावर दोघांना बसविण्यात आले . थोड्या वेळाने गोल पायऱ्यांचा , चॉकलेटी रंगाचा , वर छोटासा दिल काढलेला , त्यात ह्या दोघांचे नांव लिहलेला , लांबलचक केक त्यांच्या दोघांच्या समोर ठेवण्यात आला . रिबिन बांधलेल्या सुरीने दोघांनी मिळून केक कापले . वर रंगबेरंगी फुगे होते ते फोडल्यावर चकमकांचा वर्षाव झाला . त्यांनतर त्यांना गिफ्ट देण्यात आले . नंतर लोकांना खाद्दपदार्थ ( डिनर ) देण्यात आले . इकडे स्टेजवर जॉक , ड्रामा , डान्स वैगरे प्रॉग्रेम सागरच्या सर्व मित्रांनी मिळून केले . हास्य विनोदात वेळ कसा गेला कळलंच नाही .

रात्रीचे एक वाजले . लोक हळू हळू सगळे निघून गेले . सागर , शितल तिचे आई - बाबा घरी परतले . शितलने आपल्या आई बाबांना हातरून घालून दिले . आणि ती झोपली . सागरही दिवसभर धावपळ करून थकला होता . त्यालाही लगेच झोप लागली.

शितल

रुपा लक्ष्मण रेडकर
Chapters
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४