Get it on Google Play
Download on the App Store

खुनाची वेळ प्रकरण १२

 

प्रकरण १२ खुनाची वेळ

“ सर. मिसेस टोपे ला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमी बद्दल का नाही सांगितले? “ – सौम्या

“ कोणती बातमी? “

“ पळशीकर चा कोट गाडीत सापडल्याची.”

“ ते मी इन्स्पे.होळकर वर सोपवल आहे.”

“ तो तिला फार मोठा धक्का ठरेल., तुम्ही तिला अप्रत्यक्ष रित्या सुचवायला हवं होत की हा एक सापळा असल्याचे कानावर येतंय.”

“ नाही, नाही.”

“ का बरं ?”

“ ती सापळा खरे तर आदिती साठी रचला होता. पळशीकर जेथे कुठे असेल तर बाहेर येईल किंवा मेला असेल तर कोणीतरी बोलेल हा हेतू होता. तो जर मिसेस टोपे चा सहारा घेऊन लपला असेल तर ती बोलेल.”

“ तो तिच्या आधारावर लपला असेल खरंच?’’ सौम्या ने विचारले.

“ माहीत नाही मला., ते सगळ आपण देऊ सोडून, आपण आदिती हुबळीकर ला जाऊन भेटू अत्ता.”

दोघेही तिला भेटायला गेले .पाणिनी ने सौम्या ची ओळख करून दिली, सुरवातीच्या औपचारिक गप्पा मारल्यावर तिने पाणिनी  ला विचारले,” तुम्ही मला ते पत्र का पाठवले?”

“ मला माहिती हवी होती म्हणून.”

“ एखाद्याला तो सापळा आहे असे वाटले असते.” ती म्हणाली.

“ मला सांग त्या पत्राला तू जे उत्तर दिलंस ते पळशीकर शी विचार विनिमय करूनच दिलंस , तर त्याच्याशी तू संपर्क कसा केलास?”

तिला डोळ्यातून येणारे अश्रू आवरायला फार त्रास झाला.

“ पोलिसांना त्याचे प्रेत सापडलं का?” तिने गहिऱ्या स्वरात विचारले.

“ मला कल्पना नाही, पोलीस मला नेहेमीच सर्व सांगतात असे नाही. मी पेपरात येणाऱ्या बातम्यावरच बऱ्याचदा अवलंबून राहतो. पण ते सापडणे सर्वांच्याच हिताचे आहे. पोलीस ते विचारायला कोणाकडेही येऊ शकतात, आलं नं लक्षात?”

“ मला धमकी का देता दर वेळी तुम्ही भेटता तेव्हा? पहिल्यांदा तुम्ही मला भेटलात तेव्हा असाच अनुभव आलं मला. दुसऱ्यावर अत्यंत वर्चस्व गाजवण्याचा स्वभाव आहे तुमचा.”

“ तू ज्या समाजात ऊठ-बस करतेस तेथे पुरुष स्त्रियांना मान देण्याचा वगैरे दिखाऊपणा करत असतील पण मी रोज जीवन मरणाच्या प्रश्नांशी झगडत असतो, मला असले खोटे शिष्ठाचार जमत नाहीत.”

“ बर ,मग? म्हणून काय?”

“ म्हणून मला जाणून घ्यायचंय की तू त्याला कसा संपर्क केला आहेस आणि त्याने तुला सर्वाधिकार दिले आहेत का? आणि किती प्रमाणात? “ – पाणिनी

“ तुम्हाला का वाटत मला सर्वाधिकार आहेत?”

“ सरळ आहे , मेलेल्या माणसाकडून कोणालाच निरोप येत नाही.”

“ तुम्हाला वाटतंय तो मेलाय? “

“पोलिसांना जो परिस्थिती जन्य पुरावा मिळालाय तो ,तेच दर्शवतो.”

“ काल रात्री नऊ  वाजता तो केवळ जिवंतच नाही तर व्यवस्थित होता.” – आदिती.

“ तुला काय माहिती? तू बोललीस त्याच्याशी?

“ हो.”

“ प्रत्यक्ष की फोन वर? ”

“ मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही.”

“ सौम्या तू इन्स्पे.होळकर ला फोन करावास हेच बरं, त्याला सांग आमच्या समोर एक साक्षीदार आहे, जो दावा करतोय की तो पळशीकर ला भेटलाय काल.”

“ नाही नाही, तुम्ही असे करू शकत नाही.” ती ओरडली

“ का नाही ? ”

“ पळशीकर ने तुम्हाला वकील पत्र दिलंय.”

“ त्याला वाचवण्यासाठी नाही वकीलपत्र. , एका स्त्री ला वाचवण्यासाठी”

“ कोण आहे ती “

“ अशी स्त्री जिची, ओळख माझ्या पासून सुध्दा लपवण्यासाठी पळशीकर ने प्रयत्न केले.”

“ मी फोन करू का सर इन्स्पे.होळकर  ना? “ सौम्या ने विचारले

“ कर, कर.”

सौम्या ने नाटकी पणे अगदी मृदू स्वरात तिला विचारलं “ मी तुमचा फोन वापरू शकते का? “

“ अजिबात नाही “ ती खेकसली.

“ सौम्या, अग बाहेरच्या दुकानात जाऊन कर ना. – पाणिनी

सौम्या लगबगीने उठली, दार उघडले, बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात आदिती हताश होऊन म्हणाली, “ थांब सौम्या, मी सांगते सर्व, पटवर्धनां ना काय हवंय ते. ”

“ पळशीकर ने मला मागच्या सोमवारी रात्री तीन च्या सुमाराला फोन केला तो म्हणाला की अत्यंत महत्वाच्या कामासाठी मला भेटायचं आहे. त्याने सांगिले की टोपे चा खून झालाय आणि परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर आरोप येवू शकतो “

“ त्याने कुठल्या स्त्रीचा उल्लेख केलं का? “

“ थेट असा नाही केलं उल्लेख पण असे सुचवले की त्यावेळी तो एकटा नव्हता तिथे. त्याने असेही सांगितलं की तो मेला नाही असे समजून तू त्या गैर व्यवहाराचा विषय लाऊन धरावा. आणि तो मेला आहे हे जनतेला कळण्या पूर्वी त्याच्या खात्यात पैशाची खोट आली होती हे सिध्द झाले पाहिजे.”

 असे का ते सांगितले त्याने?”

“ नाही. तो एवढेच म्हणाला की मी केव्हा कुठे होते , खुनाच्या आसपासच्या वेळेला, हे मला दाखवता आले पाहिजे”

“ म्हणजे तुझ्यावर आरोप येऊ शकतो असा त्याचा अंदाज आहे.”

“ हो “

“ तू त्याच्या बरोबर कसा संपर्क ठेवलास?”

“ तो शहराच्या बाहेर गेला नाहीये. इथेच हाईड हॉटेल मधे खोट्या  नावाने खोली घेऊन राहिलाय ”

“ तू त्याच्याशी फोन वर संपर्कात आहेस की वैयक्तिक? “

“ दोन्ही. काल पेपरला बातमी वाचल्यावर त्याला भेटायचा प्रयत्न केलं होता मी, मला सांगण्यात आलं की तो सकाळपासूनच दिसला नाहीये.खोलीत.” #

“सोमवारी रात्री टोपे ची एका स्त्री बरोबर भेट ठरली होती. ती अशी स्त्री होती की टोपे ला त्याचा खूप त्रास होत होता.ती भेट वेळेत व्हावी म्हणून त्याने घाईत ऑफिस सोडले होते.” – पाणिनी

तिचा चेहेरा निर्विकार होता. “ तुम्ही कोणाबद्दल आणि कशा बद्दल बोलताय मला माहित नाही. पाणिनी ”

“ तुला शेवटचे सांगतोय मी.तुला मोजून तीस सेकंदाचा अवधी देतोय मी.”

दहा सेकंद होताच तिचा बांध फुटला., “ भेटले मी त्याला , इथेच.”

“ पुन्हा खोटे.! इथे नाही भेटलीस त्याला. तो इथे दिसणे त्याला परवडण्यासारखे नव्हते. .त्याने तुला त्याच्या  बायकोच्या बंगल्यावर, जिथे त्याचे प्रेत नंतर सापडले , त्या बंगल्यावर, बोलावले.

  तू त्याच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होतास, तो तुला म्हणाला की तिथे आलीस तर सर्व गोष्टींचा खुलासा करीन.खरे की नाही.? ”

ती काहीही न बोलता शांत बसून राहिली.

“ पुन्हा तीस सेकंद देतो तुला, उत्तरासाठी. “ पाणिनी म्हणाला.

तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.ओठ घट्ट मिटून बसून राहिली. तीस सेकंद झाल्यावर पाणिनी उठून उभा राहिला.  “ चल  सौम्या जाऊ या. आदिती , तुला मी संधी दिली होती. “ 

त्याने सौम्या सह बाहेर पाउल टाकले आणि दार लावून घेतले.

 

( प्रकरण १२ समाप्त)