Get it on Google Play
Download on the App Store

मंदोदरी....एक शापित देवता

“आणि खाली मान घालून ती ढासळलेल्या..खंडलेल्या..उद्धवस्त झालेल्या लंके कडे निघाली...नवीन सोनेरी अंकुराने सोन्याची नवी लंका उभी करण्यासाठी....” विभीषणाने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या पाठमोऱ्या थोर पतीव्रतेला हात जोडले...?? या वाक्यासरशी मी हातातले पुस्तक बंद केले आणि माझे डोळे पुसले...आज कितीतरी दिवसांनी एकाद्या पुस्तकाचा शेवट मला रडवून गेला..विचारमग्न करून गेला...कृ. प. देशपांडे लिखित “मंदोदरी” कादंबरी आज वाचून सम्पवली..सुरवातीला मी त्यात इतकी गुंतेल असं वाटलंच नाही...पण जस जशी वाचत गेले तस तशी मंदोदरी मध्ये आणि तिच्यातल्या रावणाच्या “बायको” मध्ये अगदी खोलवर गुंतले..रावणापेक्षा त्याची बायको च मनात ठाण मांडून बसली..(मला रावण आवडतो..तो कसा होता..दुष्ट होता की सुष्ट होता..या इतिहासात मला सध्या जायचे नाहीये..तो एक पूर्ण वेगळा विषय आहे..जसा मला दुर्योधन आवडतो तसाच रावण सुद्धा फार आवडतो..एक अर्जुन सोडला तर महाकाव्यांचे खलनायक च मला जास्त भुरळ घालतात..?)
मंदोदरी....अगदी खरं बोलायचं तर आपल्याला किती माहिती आहे तिच्या बद्दल?? आणि माहिती असायचं कारण सुद्धा नाहीये ना.. ना ती रामायणाची नायिका आहे..ना खलनायिका.. महाभारत च्या द्रौपदी प्रमाणे तिच्या सोबत कोणत्याही कथा जोडलेल्या नाहीत..ना तिच्या मुळे रामायण घडलंय.. मंदोदरी म्हणजे रावणाची दुर्दैवी बायको..बस इतकीच काय ती तिची ओळख आपल्या पैकी बऱ्याच जणांना आहे..इतके दिवस मला पण तेवढीच ओळख होती तिची..लहानपणी आई पाच पतिव्रता कोण ते शिकवायची..त्यात अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, आणि मंदोदरीवणाच्या बायकोच कशाला कौतुक या श्लोकात..राग यायचा बालबुद्धी ला अनुसरून..पुढे जसजशी वाचनाची आवड वाढत गेली तसतशी रामायणापेक्षा महाभारताकडेच जास्त ओढले गेले....महाभारता सोबत च एकेकट्या द्रौपदी, गांधारी, कुंती, सत्यवती, सुभद्रा सर्व वाचल्या..इतकंच काय कर्णपत्नी वृषाली सुद्धा वाचली..पण मंदोदरी मात्र आता वाचली..म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते तसच असावं कदाचित...
मंदोदरी हि मयदैत्य आणि हेमा अप्सरा याची अनन्य साधारण सुंदर कन्या..लहानपणीच मंदोदरी मातृप्रेमाला मुकली... मयदैत्याने आई आणि बापाच्या मायेने वाढवलेली... तरुणपणी रावणाला तिची भुरळ पडून रावणाची भार्या आणि लंकेची पट्टराणी झालेली... लग्न करून आल्या आल्या मिळालेल्या सासूच्या प्रेमळ उपदेशाप्रमाणे आयुष्यभर रावणाच्या अविवेकीपणाला आवर घालायचा प्रयत्न करणारी... त्याच्या दानवी वागण्या पासून त्याला कायम मागे खेचणारी... रावणाला आवर घालतांना सुद्धा त्याचा पुरुषार्थ जपणारी... संतापी आणि अहंकारी असलेल्या रावणाचा अहंकार पोटात घालून त्याच्यावर जिवापाड प्रेम आणि माया करणारी... सीतेला रावणाच्या महालातून काढून अशोकवनात तिला सुरक्षित ठेवणारी... तिच्या सुरक्षेची माते प्रमाणे सर्वतोपरी काळजी घेणारी... त्यासाठी वेळप्रसंगी रावणाला सुद्धा माघार घ्यायला लावणारी... शूर्पणखे सारखी राक्षसी आणि दुष्ट नणंद जाणून बुजून आपलं सौभाग्य आणि आपल्या आयुष्याची धूळधाण करते आहे हे माहिती असून सुद्धा तिच्यावर माया करणारी... तिला समजून घेणारी... दर वेळी रावणाचा रोष ओढावून सुद्धा “सर्वनाश टाळण्यासाठी सीतेला रामा कडे परत पाठवा.” अशी त्याची मनधरणी करणारी... रावणाचा हट्टीपणा पाहून फोफावणाऱ्या राक्षसी वृत्तीचा अंत होऊन पुन्हा नवी सुरवात व्हावी या साठी अगदी शेवटचा पर्याय म्हणून विभीषणाला रामा कडे पाठवणारी... आणि बायको हि “क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते.” हे पदोपदी शिकवीणारी आणि पटवून देणारी मंदोदरी तेव्हा वाचली असती तर समजलीच नसती... तेवढी पात्रता कदाचित त्या वयात नव्हतीच... त्या साठी त्या भूमिकेत शिरता यायला हवं... (याचा अर्थ मंदोदरीच्या भूमिकेत शिरता यावं म्हणून नवरा रावणच असावा असा नाही ह...????) गमतीचा भाग वेगळा... मंदोदरी हि एक रूपक आहे...”पुरुषाला मोहाचा शाप असतो तर स्त्री ला मर्यादेच वरदान असत.” हे आपल्याला मंदोदरी शिकवते... नवऱ्याच्या चुका पोटात घालून संसार वाचवता येतो... कधी कधी नवरा चुकला तर त्याला चुचकारून, आंजारून गोंजारून वेळप्रसंगी रागावून योग्य मार्गावर आणायचा प्रयत्न करता येतो... नवऱ्याच्या चुकांची जाणीव करून देताना त्याच्या सेल्फ कॉन्फिडन्सला पण जपावं लागत... आणि अगदी नाहीच साधलं तर नवीन सुरवात सुद्धा करावी लागते... हे सगळं सगळं मंदोदरी शिकवते... कधी कधी बायकांना प्रश्न पडतो “हे सगळं मीच का करू?? माझ्या एकटीचा आहे का संसार?? मग मीच का?” तर “हो... हे तूच करायचं आहेस... कारण तूच हे करू शकते” त्यात काही कमीपणा नाहीये... आपला नवरा आणि पर्यायाने आपलं घर जर वाचत असेल तर कसला आलाय कमीपणा...” हे ऊत्तर मंदोदरीच्या पूर्ण कथेतून मिळतं... प्रत्येक बाईने थोडी थोडी मंदोदरी आत्मसात केली तर केवळ गैरसमज आणि माफ करता येण्यासारख्या चुकांनी मोडणारे क#285327348

मराठी फॉर्वर्डस

Contributor
Chapters
माझं डोकं दुखत होतं. दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे बघा बरं पटतय का? ऑटोभास्कर ऑटोभास्कर 2 ऑटोभास्कर 3 ।।।गज़ल ।।। काय गंमत आहे नाही शिर्षक-नात्यातील संदर्भ *सामाजिक कविता* भक्ती ॥ झाड आनंदाचं ॥ पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप.. श्रावण बाळाने 〰️ प्रवास 〰️ *मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* घसरतात ते पाय... आणि दिशा दाखवतात ते चरण... ! ली ! श्रीपाद कृष्ण कोल्हटकर Online ती ही असते, Online मी ही असतो *दोन घास* पुस्तके का व कशी वाचावी लॉक डाउन बंद करा *राजा . . गोसावी* उधारी ्याला कधीही तिथं मिळाली नव्हती. शास्त्रज्ञ barc #285327342 आत्मविश्वास एक कप चहा – स्वाती पाटील घोरपडी #285327346 #285327347 मंदोदरी....एक शापित देवता #285327349 घुसखोरी सर्पमित्र जिभेचा व्यायाम