Get it on Google Play
Download on the App Store

रहस्यभेदक

मधुकर दादरवरच एका आड रस्त्यावरील घरांत दोन खोल्या भाडयाने घेऊन तेथे राहत असे. त्याच्या वरच्या मजल्यावर घरमालक राहत असे. त्याची व घरवाल्याची चांगलीच जानपछान असल्यामळे तो बाहेर गेला असतां घरवाला केव्हां केव्हां त्याच्या जागेत येऊन बसत असे. आज बाहेरून घरी येतांच दोन अपरिचित व्यक्ति त्याच्या नजरेस पडल्या. ___“ मधुकरराव," मधुकर बाहेरून खोलीत येतांच तेथेच बसलेला घरवाला त्या दोघांचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने म्हणाला, “ हे इथं बसलेले हे दांडेकर मास्तर व पलीकडे बसलेले त्यांचे एक मित्र रामसिंग, यापलीकडे यांची मला फारशी माहिती नाही. त्यांना इथं आणन बसवल्याला थोडाच वेळ झाला.” __घरवाल्याने परिचय करून देतांच मधुकराने त्या दोघांकडे पाहून 

आदराने नमस्कार केला व प्रत्येकाकडे काही वेळ नीट न्याहाळन पाहिले. रामसिंग व दांडेकर मास्तर या दोघांच्या चेहयांत व शरीरांत जमीनअस्मानाचा फरक होता. मास्तर जितके अशक्त तितकाच, किंबहुना अधिक, रामसिंग शरीराने धट्टाकट्टा व दिसण्यांत बऱ्यापैकी दिसत असे. त्याचा चेहरा वाटोळा गरगरीत असून त्याचे डोळे घारे व पाणीदार होते. चेह-यावर कावेबाजपणाची व विनोदी स्वभावाची झांक मारत असे. त्याला पाहतांच हा चांगलाच विनोदी असावा असा पाहणाऱ्याचा समज होई. असो. 

 

मधुकर त्या दोघांकडे पाहत असतांच दांडेकर मास्तरांनी त्याला रामसिंग हा कोण आहे याची माहिती करून दिली. तो 'रहस्यभेदक' असून त्याचे काम गुन्हे पकडण्याचे आहे हे त्यांनी त्यास कळविले. मधु कराने ती त्यांची माहिती स्वस्थचित्ताने ऐकून घेतली. परंतु त्याच वेळी त्याला आश्चर्य वाटल्याखेरीज राहिले नाही. 

“ यांना तुम्ही माझ्याकडे कां आणलं ? " मधुकराने रामसिंगाकडे पाहून मास्तरांस विचारले. 

"हा खून कुणाच्या हातून घडला याचा शोध लावण्यासाठी. खुनी मनुष्याचा शोध लावायला मी इतका उत्सुक का आहे हे तुम्हाला कादरसाहेबांनी सागितलं असेलच !” । 

" याच कामासाठी ह्यांना तुम्ही इथं आणलंत ?” मधुकराने प्रश्न केला. __ " मग दुसरं कोणतं काम असणार ?" मास्तर दीनवाणीने म्हणाले, " माझी व बिचाऱ्या सरलेची दोन वेळांच भेट झाली व तेवढया अल्पशा वेळांत तिनं मला फार प्रेमानं वागवल्यामुळं तिच्याबद्दल मला जिव्हाळा वाटत होता. तिच्या रक्तानं हात विटाळणाऱ्या दुष्टाचा पक्का सूड उगवला पाहिजे, अशी माझी फार इच्छा आहे." 

" तशी इच्छा तर सर्वांचीच आहे !" 

" मी मध्येच बोलतों म्हणन रागवू नका हं.” रामसिंग म्हणाला, "सर्वानाच अशी इच्छा असेल असं मला काही वाटत नाही. आता त्या खुनांची गोष्ट बहुतेकाच्या डोक्यांतून निघून गेली असून जो तो पूर्वी प्रमाणंच आपापल्या कामांत गढून गेला आहे. हे लोक बेसावध असतांनाच खुनी शोधून काढायचं काम आपण माझ्याकडे सोपवा. कारण मास्तरांना पैसे द्यायचं सामर्थ्य नाही म्हणून आपणांस सांगत आहे. यांच्या सांगण्यावरून मी माझ्या तपासाच्या कामाला सुरवातही केली आहे." 

" मग त्यापासून कांहीं तम्हांला आशा वाटते का? " मधुकराने विचारले, " खुनी मिळण्याचा काही संभव आहे ?" 

 

" तसा मी एकदोन गोष्टींचा मेळ बसवला आहे." रामसिंगाने आपलें नोटबुक बाहेर काढून म्हटले, “ व आणखीही पुराव्याच्या शोधांत मी आहेच. मला पुरेसा पुरावा मिळाल्यानंतर मी त्याला पक ण्याच्या मार्गास लागणार. पण," त्याने तें नोटबुक बंद करून म्हटले, " ते काम मी हाती घ्यावं अशी आपली इच्छा नसेल तर यांतील पानं मी फाडून टाकीन." __ "छे छे ! असं मुळीच करूं नका. आपल्या हातून होईल तितका प्रयत्न करून तुम्ही खरा खनी शोधून काढावा असं माझं तुम्हांला सांगणं आहे. आपला सर्व खर्च मी सोशीन.” 

" आपलं काम माझ्या हातून झालंच असं समजा.” रामसिंग आनंदाने मान हालवीत म्हणाला, “हे आश्वासन म्हणजे थोडथोडक नाहीं ! हर प्रयत्नानं मी खरा खुनी शोधून काढीन.” __ " आता तुमची इच्छा पूर्ण झाली ना?” मधुकराने मास्तरकडे वळून विचारले. ___ " होय." औपचारिक रीतीने ते ताबडतोब म्हणाले, “ याबद्दल 

आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. आपले शब्द ऐकून मला फारच बरं वाटलं. अच्छा, आतां आमचं काम झाल्यामुळं आमच्या जाण्यास तुमची हरकत नसेलच. जातो तर ? घेऊं निरोप ?" 

“ नाही." मधुकराने मास्तरसाहेबांस अडवून म्हटले, " तुम्हाला एव्हां जातां येणार नाही. ज्या अर्थी रामसिंग तुमच्या नोकरीतून माझ्या नोकरीत आतां आले आहेत, त्या अर्थी माझ्या सांगण्याप्रमाणं त्यांना केलं पाहिजे. तुम्ही या खुनाच्या बाबतीत आजपर्यंत काय काय शोध लावले आहेत, ते जाणण्याची माझी इच्छा आहे.” ते रामसिंगाकडे वळून म्हणाले. __ " ठीक आहे. " पुन्हां आपलें नोटबूक बाहेर काढून उघडीत राम सिंग म्हणाला, “ वर्तमानपत्राच्या मजकुरावरून, माझ्या स्वतःच्या निरीक्षणावरून व मास्तरसाहेबांनी जी काही हकीकत मला सांगितली 

 

त्यावरून आणि कमळाकर महाले याजकडून मिळालेल्या बातमीवरून मी प्रथम खुनाच्या प्रकरणांतील बारीकसारीक गोष्टी समजावून घेतल्या .” __ " कमळाकर ? " ते नांव आठवण्याचा प्रयत्न करीत मधुकर म्हणाला, "हं, आतां आठवलं. खनाच्यान रात्री ज्याची मोटर हरवली तोच ना तो?" ___ " याहून तुमचा-त्यांचा चांगला परिचय आहे, रावसाहेब.” दांडे कर मास्तर मध्येच म्हणाले, " आपल्या भावी पत्नीची मैत्रीण शरय भवाने हिच्याशी त्याचं लग्न ठरलं आहे." 

" हे तुम्हांला कसं समजलं ? " 

" म्हणजे ? मी भवान्यांच्याच वाडीत राहतो. मी तर त्यांचा भाडोत्री असन कमळाकर व शरय या दोघांची व माझी चांगलीच ओळख आहे. नलिनीबाईही एकदा मला भेटल्या होत्या, आणि.---'' 

"आणि तिनंच तुम्हाला हे सर्व सांगितलं ?" मधुकर मध्येच म्हणाला. 

" छे छे ! मला ही बातमी कमळाकराकडून समजली व मलाही तें जरा चमत्कारिक वाटण्याचं कारण जिच्या घरांत सरलेचा बळी पडला तिच्या बहिणीशीच तुमचा विवाह होण्याचं घाटत आहे ! " 

"हा निव्वळ योगायोग म्हणायला हरकत नाही." मधुकर शांतपणे म्हणाला, "पण असं म्हणण्याचा तुमचा हेतु मला समजला नाही त्या खनाच्या अंगांत माझं काही तरी अंग असावं असं मला अप्रत्यक्षपणं कळवण्याचा तुमचा हेतु आहे का?'' ___“छे, तसं नाही.” दांडेकरांस गप्प राहण्यास खणावून रामसिंग मध्येच म्हणाला, " त्यांचा तसा हेतु नव्हता. कारण जगांत अशा त-हेचे योगायोग अनेक वेळां घडून येतात.” 

" बरोबर; माझंसुद्धा तेच म्हणणं आहे." मास्तर म्हणाले. मधुकर संशयित वृत्तीने त्या दोघांकडे आळीपाळीने पाहूं लागला. परंतु त्यांनी आपल्या चेहऱ्यावर मात्र कोणत्याही त-हेचा विकार त्यांना दिसू दिला नाही. 

 

काही वेळाने रामसिंगाने बोलण्यास सुरुवात केली, “ रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाची चावी फक्त गजाननरावांपाशीच असन त्यांनी ती कधीच आपल्या ताब्यातून जाऊ दिली नाहीं; तसंच ज्या लोहारानं ती किल्ली बनवली त्यानंही, तशी दुसरी किल्ली कधीच पुन्हा बनविली नाही हे शपथेवर सांगितलं. शिवाय त्या दरवाजाचं कुलपही विशेष प्रकारचे असून त्याच्या किल्लीशिवाय दुसऱ्या कोणत्याही चावीनं तें उघण्यासारखं नाही. असं असतांना सरलाबाई त्या बंगल्यांत कशा गेल्या, हाच बिकट प्रश्न आहे ! रत्नमहालांतील सर्व मंडळी त्या वेळी चौपाटीवर राहायला गेली होती हे तिला माहित कसं झालं, असं तुम्हाला वाटतं ?" 

" ते मला कसं सांगता येणार ? " मधुकर म्हणाला. 

" सर्वच कांहीं गोंधळ आहे !” रामसिंग म्हणाला, “ रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाची चावी एकटया गजाननरावांजवळ होती, हाच सर्वोत मुख्य मुद्दा आहे. अर्थातच त्यांच्याजवळून ती कुणीतरी नकळत घेऊन तिच्या ठशावरून तसली दुसरी चाबी केली असली पाहिजे. किंवा-" 

" किंवा काय ?" 

" मी सांगतो.” मास्तरसाहेव खिडकीजवळ उभे राहून मधून मधून त्यांचे संभाषण ऐकत होते, ते एकदम पुढे येऊन म्हणाले, " किंवा गजाननरावांनीच त्या स्त्रीचा खून करून रस्त्यावर भेटलेल्या पोलिस हवालदाराला झुलवीत दूर नेलं असावं.----बिचारी सरला मात्र विना 

कारण प्राणास मुकली.” 

" पण” मधुकर शांतपणे म्हणाला, " तो मनुष्य हवालदाराकडे बोलत असतां दिवाणखान्यांत गाणं चालू होतं. अर्थात् तोपर्यंत खून झाला नव्हता, हे तुम्ही विसरलां वाटतं !" ___ “ मुळीच विसरलों नाही.” मास्तर जरा हेटाळणीच्या स्वराने म्हणाले, “ उलट अर्थी तो मनुष्य त्या हवालदाराला झुलवीत झलचीत दूर नेत असतां व दिवाणखान्यांत गाणं चालू असता त्या स्त्रीला 

 

मरून तीन तास झाले होते, हे डॉक्टरनं सांगितलेलं माझ्या चांगलंच थानांत आहे." __ " पण तो माणस हवालदाराला झुलवीत नेत होता असं म्हणा यला तुमच्याजवळ काय पुरावा आहे ? कांहींच नसणार ! रामसिंग, तुमचं म्हणणं काय आहे या बाबतींत ?" 

रामसिंग आपली टिपणवही खिशांत ठेवून आपल्या जागेवरून उठून म्हणाला, "या गोष्टीवर अद्यापि उजेड पडत नाही. तथापि मी तो पाडण्याच्या आतां उद्योगासच लागणार आहे, व एखादा महत्त्वाचा शोध मला लागलाच तर आपल्याला मी अवश्य कळवीन." 

" पण तुम्ही आतां सुरवात कुठून करणार ?” मधुकराने अस्वस्थ पणे विचारले. 

" मी प्रथम रत्नमहालाच्या मुख्य दरवाजाच्या किल्लीपासूनच सुरवात करणार ! त्याखेरीज तसली किल्ली दुसऱ्या कोणाजवळच नव्हती असं ते सांगतातः तेव्हां त्या रात्री ते काय करीत होते, हे प्रथम शोधून काढणार." 

" ते चौपाटीवर होते.” " असं ते म्हणतात.” रामसिंग म्हणाला. 

" आणि रमाबाईही असंच सांगतात.' मास्तर मध्येच म्हणाले, "मला वाटतं त्या रात्री पोलिस शिपायाबरोबर बोलणान्या टोकदार दाढीवाल्या गृहस्थाला तुम्ही प्रथम हुडकून काढा.” रामसिंगाकडे वळून ते पुढे म्हणाले. 

“ पोलिसांनी एवढा प्रयत्न केला तरीही तो त्यांना शेवटी मिळाला नाही. " मधुकर शांतपणे म्हणाला, " व तो यापुढे मिळेल असंही मला वाटत नाही." 

यावर मास्तर काही बोलणार होते, परंतु तितक्यांतच रामसिंग स्यांना ओढीतच दरवाजाकडे जाण्याकरता निवाला, व आतां बाहेर पडणार, इतक्यांत रामसिंगाला काही आठवण होऊन तो म्हणाला, 

 

" मधुकरराव, आपण कधी सरलाबाईंच्या नवऱ्याला पाहिलं होतं का ?" 

" छे, कधीच नाही." " बरं, त्याचा फोटो तरी ?" . 

" नाही.” मधुकराने जरा अडखळतच उत्तर दिले, “ तो सुद्धा नाहीं !" 

" बरं, येतों आता. लवकरच पुन्हां येऊन त्या किल्लीविषयी काही तरी अधिक माहिती मी तुम्हाला सांगेन, " असे म्हणून रामसिंग 

मास्तरासह निघून गेला. 

ते निघून जातांच मधुकर एका खुर्चीवर बसला व त्याने आपले मस्तक आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यावर ठेवून हातांचे कोपरे पुढील मेजावर टेकले. झालेल्या गोष्टीमुळे त्याचे डोके अगदी त्रासन गेले होते व त्याच्या मनासही फारच त्रास झाला होता. मेजावर हात टेंकन बसला असतां तो आपल्याच विचारांत इतका गढून गेला होता की, कोणीतरी दरवाजा उघडून आंत येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवी पर्यंत त्याला समजलेच नाहीं ! खांद्याला स्पर्श होतांच तो एकदम दच कन उठून उभा राहिला. त्याने वळून पाहिले तो त्याच्या मागें नलिनी उभी होती !