कलेक्टर कडून सूचना
लवकरच कोरोना 3rd स्टेज ला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :
१. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.
२. वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.
३. पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.
४. जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.
५. सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.
६. पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.
७. ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.
८. ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, में महिना वगैरे नंतर बघुया.
९. घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.
१०. फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.
११. झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.
१२. पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.
१३. चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.
१४. बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.
१५. कपड्याना इस्त्री घरीच करा.
१६. सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.
१७. दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या
स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..
आपल्याला नक्की माहीत नाहीत ते उपचार, सूचना दुसऱ्याना (व्हाट्सअप) देऊ नका.
जिल्हा माहिती कार्यालय,