व्हायरस म्हणजे काय?
Virus म्हणजे एक अतिशय सूक्ष्म, सजीव नसलेला, जैविक कण असतो. उघड्या डोळ्यांनी बघणं अशक्य पण मायक्रोस्कोप मध्ये पाहिला जाऊ शकतो. मग प्रश्न उद्भवतो कि, सजीव नसूनही त्यांचं प्रमाण कुठल्याही प्राणी किंवा वनस्पतीमध्ये कसे वाढते? Virus तर प्रजनन करत नाहीत मग त्यांच्या प्रति (copy) कशा तयार होतात? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही सजीव शरीरात (प्राणी किंवा वनस्पती) पेशींच विभाजन ( Cell Division) चालू असतं.. म्हणजे एका पेशीपासून दोन, दोनाचे चार.... असं. सजीवांच्या पेशींवर रिसेप्टर असतात. या रिसेप्टरला व्हायरस जाऊन चिकटतात. त्यानंतर ते सजीव पेशींमध्ये जातात. व्हायरस एखाद्या पेशीमध्ये जातो, तीच विभाजन चालूच असत आणि त्यामुळेच व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासुन खूप साऱ्या संक्रमित पेशी तयार होतात.
व्हायरस म्हणजे एक प्रोटीनच आवरण असते आणि त्या आवरणात असलेला DNA किंवा RNA. आपल्या पेशी नेहमी DNA च्या कॉपी बनवत असतात. त्याचप्रमाणे पेशीत गेल्यावर व्हायरस मधला DNA किंवा RNA पेशीतील इतर मटेरियल वापरून स्वतः च्या खूप साऱ्या प्रति बनवतो. यातील प्रत्येक प्रत म्हणजे एक नवा व्हायरस. एका पेशीतील मटेरियल संपलं कि, हे व्हायरस पेशीभित्तीका ( Cell Wall) फोडून बाहेर येतात. ज्या प्राण्याच्या शरीरात हे सर्व काही चालू असत, तो हळूहळू आजारी पडतो. हळूहळू संपूर्ण शरीरावर व्हायरसचा ताबा येतो. मग लस किंवा antidote मिळाला तर ठीक नाहीतर मृत्यू नक्कीच. व्हायरसचा DNA प्राण्यांच्या DNA मध्ये घुसून DNA sequence बदलून अनुवांशिक बदल घडवू शकतो.