Get it on Google Play
Download on the App Store

जीवनकलेची साधना


               मागील लेखात आपण पहिले कि या सर्व क्रिया जीवामार्फत हि चालत नाही कारण जीव हा निद्रेच्या सुखानंदात निमग्न असतो. तर मग आम्ही असे हि म्हणून शकतो कि या सर्व क्रिया शरीरातील मेंदू मार्फत चालत  असतात. कारण शाळा - कॉलेजातील पुस्तकातून हेच शिकविले जाते, कि मेंदू हा  शरीराचा राजा आहे व मेंदूच ह्या सर्व क्रिया करतो. मेंदू हा शरीराचा राजा म्हटल्यावर इंद्रिये हि प्रजा ठरते. आता आपण विचार करा. मेलेल्या माणसाच्या डोक्यात मेंदू असतोच. म्हणजेच राजा आहे. इंद्रिये म्हणजे प्रजा आहे. असे असताना (इंद्रियाची कामे) व्यवहार का बरे बंद पडला ? तो राजा (मेंदू) का बरे आता गप्प पडला ? तर मग आपण म्हणतो कि तसे नाही. काही तरी शरीरातून निघून गेले ! मग, ते ;जे काहीतरी' निघून गेले तो राजा कि मेंदू राजा ?
              काही विद्वान लोक  म्हणतात, "वरील सर्व क्रिया ह्या अनिच्छावर्ती क्रिया' आहेत व याच अनिच्छावर्ती क्रियेमुळे अन्नाचे पचन होते, रस-रक्त -मांसशक्ती बनते." आता याचाच जरा विचार करा, इच्छावर्ती क्रिया-हातापायाची हालचाल, डोळ्याची उघड्झाक , तोंडाची हालचाल या क्रिया- आपण आपल्या (जीवाच्या) इच्छाशक्तीमार्फात करतो म्हणून त्यांना इच्छावर्ती क्रिया असे नाव दिले. ज्या सर्व क्रिया जीवा मार्फत (जीवाच्या इच्छेमार्फात ) चालतात त्यांना इच्छावर्ती क्रिया म्हणतात. कारण क्रिया इच्छेशिवाय घडतच नाही. क्रिया म्हटले म्हणजे कर्त्याची इच्छा आलीच. तेंव्हा, असे असताना  अनिच्छावर्ती क्रिया असतील तरी कशा ? असं वाटते कि त्या विद्वानांना अनिच्छावर्ती क्रियेचा कर्ताच सापडला नसेल. म्हणूंन असे म्हणणे सुद्धा पूर्ण पणाचे वाटत नाही. नव्हे ते साफ चुकीचेच आहे. कारण वरील सर्व क्रिया देखील इच्छावर्तीच आहे, व त्या सर्व त्या देवा मार्फात चालेल्या क्रिया आहेत. अन्नाची पचनक्रिया करणे, रस-रक्त-मांस बनविणे, शक्ती देणे, देहाचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करणे या सर्व क्रिया ज्या चैतन्यशक्ती मार्फत चालतात ती चैतन्य शक्ती म्हणजेच देव होय. संत तुकाराम महाराज अगदी सोप्या भाषेत सांगतात ,-
                         ०१.  चाले हे शरीर कोणाचिया सत्ते  l 
                                 कोण बोलविते हरिविण  ll 
                                 देखवी ऐकवी एक नारायण l 
                                 तयाचे भजन चुकू नका ll       
                         ०२. आत्मा नारायण सर्वाघटी आहे l 
                               (मग) आपणामध्ये काय कळो नये ll 
तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
                         ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान  l
                         सर्व घाटी पूर्ण एक नांदे ll  
 उपरिनिद्रिष्ट संतांच्या सिद्धांतावरून, आपल्या शरीरात देव आहे, हे सिद्ध होते