Get it on Google Play
Download on the App Store

शेजारती

नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी 'हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका' इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.